Jump to content

"आंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६: ओळ १६:
[[चित्र:Disease_free_Mango.jpg|इवलेसे|कच्चा आंबा]]
[[चित्र:Disease_free_Mango.jpg|इवलेसे|कच्चा आंबा]]
[[चित्र:आंबा.JPG|thumb|पिकलेला आंबा]] ‎
[[चित्र:आंबा.JPG|thumb|पिकलेला आंबा]] ‎
'''आंबा''' हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक [[झाड]] व [[फळ]] आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात [[कोकण]]चा राजा म्हणतात. [[एप्रिल महिना|एप्रिल]]-[[जून]] हा या फळाचा मोसम आहे. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधे मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा [[जीवाश्म|जीवाश्मांचा]] इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.<ref>[http://www.fao.org/inpho/content/compend/text/Ch20sec1.htm www.fao.org अध्याय २०, आंबा]</ref>आंबा हे फळ आह्रे .
'''आंबा''' हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक [[झाड]] व [[फळ]] आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात [[कोकण]]चा राजा म्हणतात. [[एप्रिल महिना|एप्रिल]]-[[जून]] हा या फळाचा मोसम असतो. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधे मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा [[जीवाश्म|जीवाश्मांचा]] इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.<ref>[http://www.fao.org/inpho/content/compend/text/Ch20sec1.htm www.fao.org अध्याय २०, आंबा]</ref>


दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात. आंबा हे [[भारत]] आणि [[पाकिस्तान]] देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि [[फिलिपिन्स|फिलिपाईन्सचे]] राष्ट्रचिन्ह आहे.
दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात. आंबा हे [[भारत]] आणि [[पाकिस्तान]] देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि [[फिलिपिन्स|फिलिपाईन्सचे]] राष्ट्रचिन्ह आहे.


भारतात आंब्याच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, फर्नांडीस, रायवळ इ. जाती आढळतात.
जगाच्या आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंब्याचे उत्पादन एकट्या भारतात होते. भारतात आंब्याच्या जवळपास १३०० जातींची नोंद आहे. परंतु २५ ते ३० जाती या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. आंब्याच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, फर्नांडीस, रायवळ इ. जाती प्रसिद्ध आहेत.


== आंब्याचे झाड ==
== आंब्याचे झाड ==

२१:२१, १२ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

आंबा
झाडाला लागलेल्या कैऱ्या
झाडाला लागलेल्या कैऱ्या
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: Magnoliophyta
जात: Magnoliopsida
वर्ग: Sapindales
कुळ: Anacardiaceae
जातकुळी: Mangifera
L.
कच्चा आंबा
पिकलेला आंबा

आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक झाडफळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम असतो. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधे मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा जीवाश्मांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.[]

दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात. आंबा हे भारत आणि पाकिस्तान देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे.

जगाच्या आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंब्याचे उत्पादन एकट्या भारतात होते. भारतात आंब्याच्या जवळपास १३०० जातींची नोंद आहे. परंतु २५ ते ३० जाती या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. आंब्याच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, फर्नांडीस, रायवळ इ. जाती प्रसिद्ध आहेत.

आंब्याचे झाड

आंब्याचे झाड (Mangifera Indica) हे साधारणपणे ३५ ते ४० मीटर उंच असते. त्याचा घेर साधारणपणे १० मीटर एवढा असतो. आंब्याची पाने सदाबहार असतात. पाने डहाळीला एकाआड एक येतात. आंब्याचे पान १५ ते ३५ सेंटीमीटर लांब तर ६ ते १६ सेंटीमीटर रुंद असते. कोवळी असताना पानांचा रंग हा काहीसा केशरी-गुलाबी असतो व तो जलदपणे उजळ आणि गडद लाल होतो. पाने जशी मोठी होतात तसा त्यांचा रंग गडद हिरवा होतो. आंब्याची फुले १० ते ४० सेंटीमीटर लांबीच्या गुच्छामध्ये येतात. प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० मिलीमीटर एवढी असते. आंब्याच्या फुलांना मोहोर असे म्हणतात. मोहोराला एक प्रकारचा मंद सुवास असतो. आंब्याचे फळ हे वनस्पतीशास्त्रातील "drupe" ह्या प्रकारातील असते. ह्या प्रकारात फळाच्या बाहेरील भागात गर असून आतमध्ये कडक कवच असते आणि ह्या कवचाच्या आत फळाचे बी असते. ह्या कवचाला आंब्याची कोय असे म्हणतात. आंब्याच्या जातीप्रमाणे त्याच्या फळांच्या आकारात बराच फरक असतो. साधारणपणे आंब्याच्या फळाचा आकार १० ते २५ सेंटीमीटर लांब तर व्यास ७ ते १२ सेंटीमीटर असतो. आंब्याचे फळाचे वजन २.५ किलोग्रॅम पर्यंत असू शकते. कच्च्या आंब्याला कैरी असे म्हणतात. कैरीचा रंग साधारणपणे हिरवा असतो. पूर्ण पक्व फळाचा रंग पिवळा, केशरी आणि लाल असा बदलता दिसून येतो. ज्या बाजूस ऊन लागेल तिथे लाल छटा जास्त दिसते तर सावलीच्या बाजूस बहुतकरून जास्त पिवळी छटा असल्याचे आढळते. फळाच्या मध्यभागी चपट्या आकाराची आणि लांबट बी (कोय) असते. आंब्यांच्या जातीप्रमाणे कोयीचा पृष्ठभाग हा धागेदार अथवा सपाट असतो. कोयीचे कवच १ ते २ मिलीमीटर जाड असून त्याच्या आत अतिशय पातळ असे आवरण असते ज्यात ४ ते ७ सेंटीमीटर लांबी, ३ ते ४ सेंटीमीटर रुंदी आणि १ सेंटीमीटर जाडीचे एकच बी असते. कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. कैरी चवीला आंबट असते. कैरी पिकल्यावर गोड लागते. आंबा भारतात सर्व ठिकाणी आढडून येते.

आंब्याचा मोहोर

आंब्याची आढी

कृत्रिमरीत्या आंबा पिकविण्यास 'आंब्याचा माच लावणे' किंवा आंब्याची आढी लावणे असे म्हणतात. यासाठी एखाद्या खोलीत वाळलेले तणस वा भाताचे वाळलेले गवत (पिंजर) पसरून त्यावर झाडावर पिकण्यास सुरुवात झालेल्या कैऱ्या ठेवतात. त्यावर पुन्हा गवत वा तणसाचे आच्छादन करतात.अशा प्रकारे साधारणतः १०-१५ दिवसात, झाकला गेल्यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेने आंबा पिकतो.

हा १०-१५ दिवसाचा अवधी कमी करण्यासाठी रसायने टाकून आंबा, केळी, चिकू इत्यादी फळे पिकविण्याचे एक तंत्र आहे. त्याने ३-४ दिवसात आंबा पिकतो. कॅल्शियम कारबाईड इत्यादी रसायनांचा वापर यासाठी करण्यात येतो. या पद्धतीत रसायनांचा काही अंश फळात जातो. ते मानवी आरोग्यास घातक ठरू शकते. आंबा पिकवण्याच्या दुसऱ्या पद्धतीत आंब्याची कैरी तोडून ती १ ते २ दिवस कैरी पानांत किवा धान्यात दाबून ठेवणे..

इतर

  • हा पूर्वाभाद्रपदा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
  • आंबा संशोधन केंद्ेर भारतामध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे आणि महाराष्ट्रातील वेंगुर्ला येथे आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

फळांचा राजा