"सुलोचना लाटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
दुवा |
|||
ओळ ७१: | ओळ ७१: | ||
|- |
|- |
||
|} |
|} |
||
==अन्य चित्रपट== |
|||
* एकटी |
|||
* गुलामी (हिंदी) |
|||
* पायदळी पडलेली फुले |
|||
* पारिजातक |
|||
* माझं घर, माझी माणसं |
|||
* मुक्ती (हिंदी) |
|||
* मोलकरीण |
|||
* सुजाता (हिंदी) |
|||
==उल्लेखनीय== |
==उल्लेखनीय== |
||
१४:२४, २९ जुलै २०१८ ची आवृत्ती
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
सुलोचना लाटकर | |
---|---|
सन २०१० मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराचे वेळी सुलोचना लाटकर | |
जन्म | ३० जुलै १९२८ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
पुरस्कार | 'चित्रभूषण' व 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित |
टिपा हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री |
हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना (लाटकर). त्यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला. भालजी पेंढारकरांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. सन १९४३ ला त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री/ घरंदाज आई म्हणून काम केले.
कै.भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाच्या तालमीत तयार झालेल्या सुलोचनाबाईंची प्रतिमा लाखो चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. सोज्वळ, शांत आणि घरंदाज भूमिका त्यांनी पडद्यावर जिवंत केल्या. शेकडो मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अशा भूमिका केल्या. त्यांनी अन्य भूमिकाही केल्या आहेत.
१९४३ ला हिंदी चित्रपट सृष्टीत सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर यांच्या बरोबर अभिनयाची सुरुवात करून पुढे राजकपूर, शम्मीकपूर, शशीकपूर या कपूर घराण्याच्या दुसऱ्या पिढीबरोबर आणि नंतर, कपूर घराण्याच्या तिसऱ्या पिढीच्या रणधीर कपूर, ऋषी कपूर, गीता बाली, बबिता, नीतू सिंग यांच्या बरोबरही त्यांनी हिंदी चित्रपटातील काळ गाजवला. २५० हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
निवडक चित्रपट
वर्ष | मथळा | अभिनय | भाषा |
---|---|---|---|
१९५७ | अब दिल्ली दूर नही | बेला | हिंदी |
१९५९ | सांगत्ये ऐका | सखारामची पत्नी | मराठी |
१९५९ | दिल देके देखो | जमुना | हिंदी |
१९६१ | संपूर्ण रामायण | कैकेयी | हिंदी |
१९६३ | बंदिनी | हिंदी | |
१९६४ | मराठा तितुका मेळवावा | जीजाबाई | मराठी |
१९६५ | साधी माणसे | मराठी | |
१९६६ | देवर | शकुंतला एम सिंग | हिंदी |
१९६८ | संघर्ष | शंकरची पत्नी | हिंदी |
१९६८ | सरस्वतीचंद्र (चित्रपट) | कुमुदची आई | हिंदी |
१९६८ | आदमी (१९६८) | शेखरची आई | हिंदी |
१९७० | कटी पतंग | दिनानाथ यांची पत्नी | हिंदी |
१९७० | जॉनी मेरा नाम | सोहन व मोहनची आई | हिंदी |
१९७० | मैं सुंदर हुं | सुंदरची आई | हिंदी |
१९८६ | काला धंदा गोरे लोग | हिंदी |
अन्य चित्रपट
- एकटी
- गुलामी (हिंदी)
- पायदळी पडलेली फुले
- पारिजातक
- माझं घर, माझी माणसं
- मुक्ती (हिंदी)
- मोलकरीण
- सुजाता (हिंदी)
उल्लेखनीय
महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा २००९ चा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च पुरस्कार अभिनेत्री सुलोचना यांना दिला गेला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |