"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ४४: | ओळ ४४: | ||
==विविध पंचांगे== |
==विविध पंचांगे== |
||
* आनंदी वास्तू ( |
|||
* इंडियन एफेमेरीज (इंडियन नॉटिकल अल्मानक- भारत सरकारचे पंचांग) |
* इंडियन एफेमेरीज (इंडियन नॉटिकल अल्मानक- भारत सरकारचे पंचांग) |
||
* कालनिर्णय पंचांग |
* कालनिर्णय पंचांग |
||
ओळ ५८: | ओळ ५९: | ||
* मारवाडी पंचांग |
* मारवाडी पंचांग |
||
* राजंदेकर पंचांग - [[विदर्भ]] |
* राजंदेकर पंचांग - [[विदर्भ]] |
||
* रामनारायन पंचांग - मध्य प्रदेश -(इ.स.१९३३पासून) |
|||
* रुईकर पंचांग - [[कऱ्हाड|कराड]] |
* रुईकर पंचांग - [[कऱ्हाड|कराड]] |
||
* रुपेश ठाकुर प्रसाद पंचांग |
|||
* लाटकर पंचांग - [[कोल्हापूर]] |
* लाटकर पंचांग - [[कोल्हापूर]] |
||
* सनातन पंचांग |
|||
* सीमंधर स्वामी जैन पंचांग |
* सीमंधर स्वामी जैन पंचांग |
||
* श्री सुभा़ष हिंदी पंचांग (इ.स. १९७१पासून) |
|||
==भारतीय राष्टीय पंचांगातील महिने== |
==भारतीय राष्टीय पंचांगातील महिने== |
११:५१, ७ एप्रिल २०१६ ची आवृत्ती
हिंदू पंचांग हे फार जुन्या काळापासून भारतात प्रचलित असलेल्या हिंदू पद्धतीच्या दैनंदिन कालगणनेचे कोष्टक आहे. भारतांतील राज्याराज्यांत वेगवेगळी हिंदू पंचांगे चालत असली तरी त्यांत काही समान गोष्टी आहेत. या सर्व पंचांगांत दैनंदिन कालगणनेची पाच अंगे आहेत. ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग व करण. या पाच अंगांची माहिती यात असते म्हणून या कोष्टकाला पंचांग म्हणतात.
पंचांगात वर दिलेल्या पाच बाबींशिवाय आणखीही बरीच माहिती असते. यात सर्व ग्रहांचे योग वर्तवलेले असतात. पंचांगात नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक, खगोलशास्त्रीय व ज्योतिष्यांना लागणारी माहिती दिलेली असते. विवाह-मुंज मुहूर्त, वधूवरांचे गुणमेलन कोष्टक, अवकहडा चक्र, व्रते, धार्मिक सण, उत्सव, जयंत्या, पुण्यतिथ्या, यात्रा, रोजची ग्रहस्थिती, ग्रहणांची माहिती, धार्मिक कृत्यांविषयीचे निर्णय आदी गोष्टी पंचांगांत सापडतात. पंचांगात हिंदूंव्यतिरिक्त अन्य भारतीयांच्या दैनंदिन कालगणनेची थोडक्यात दिलेली माहितीदेखील असते. भारतीय राष्ट्रीय पंचांग हे हिंदूंच्या पंचांगांपेक्षा काही बाबतीत वेगळे असते.
तसेच,
- गर्भाधान संस्कार * बारसे * मुंज * विवाह * गुणमेलन * मुहूर्त * सण * वार * व्रत वैकल्ये * मकरसंक्रांत * ग्रह उपासना * नवग्रह स्तोत्र * चंद्र व सूर्य यांचे उदयास्त, नक्षत्रभ्रमण आणि त्याची ग्रहणे * ग्रहपीडा * दाने व जप * भूमिजन * पायाभरणी * गृहप्रवेश * वास्तुशांती * अशौच निर्णय * हवामान व पर्जन्यविचार * नांगरणी- पेरणीपासून ते धान्य भरण्यापर्यंत * संतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या * जत्रा * यात्रा * मासिक भविष्य * राजकीय व सामाजिक भविष्ये * धर्मशास्त्रीय शंका समाधान * शाखा उपशाखा * त्यांचे गोत्र वंशावळ * ९६ कुळी मराठा समाजातील वंश गोत्र देवक * कोकणस्थ, कर्हाडे आणि क्वचित् देशस्थ ब्राह्मणांची आडनावे आणि गोत्रे * ज्योतिर्गणितासाठी आवश्यक असलेली ग्रहगती * रोज पहाटे साडेपाच वाजताची ग्रहस्थिती * गणिताची आकडेमोड वाचवणारी कोष्टके * ग्रहदशा * ग्रहांच्या अंतर्दशा * लग्नसाधन * नवमांश * अवकहडा चक्र * राशींचे घातचक्र इत्यादी अनेक गोष्टींचा माहितीकोष म्हणजे पंचांग.
तिथी
चंद्र व सूर्य यांच्यामध्ये बारा अंशांचे कोनात्मक अंतर पडण्यासाठी जो अवधी लागतो त्याला तिथी म्हणतात. तिथीचा संबंध हा धार्मिक कृत्याशी असतो.
तिथीचा क्षय व वृद्धी
पंचांगात एखादी तिथी पाठोपाठच्या दोन सूर्योदयांच्या वेळी आलेली असते तर एखाद्या तिथी कोणत्याच सूर्योदयाच्या वेळी नसते. याचे कारण चंद्र व पृथ्वी यांची परस्परावलंबी सापेक्ष गती. ही कधी थोडी कमी तर कधी थोडी जास्त असते. सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते ती त्या दिवसाची तिथी म्हणून पंचांगात दिलेली असते. एखादी तिथी सूर्योदयानंतर चालू होते व दुसर्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी संपते. त्यामुळे त्या तिथीचा क्षय झाला असे समजतात. तर कधीकधी, एका सूर्योदयाला चालू झालेली तिथी दुसर्या दिवशीच्या सूर्योदयानंतरच संपते, त्यामुळे ती तिथी पंचांगात लागोपाठ दोन दिवशी दाखवावी लागल्याने तिची वृद्धी झाली असे म्हटले जाते.
वार
वार हा प्राचीन भारताने जगाला दिलेला विचार आहे. होरा या कालविभागापासून वाराची उत्पत्ती झाली. एका अहोरात्रीचे म्हणजे दिवसाचे २४ समान भाग केले असता त्यातील एक भाग म्हणजे होरा. हल्लीच्या तास या अर्थानेही हा भाग घेतला जातो. प्रत्येक होर्याला कुठलातरी ग्रह अधिपती असतो. त्याचे नांव वाराला दिले आहे.
सूर्यसिद्धान्त या ग्रंथात भूगोलाध्याय या विभागात पुढील वर्णन आहे.
मन्दादधः: क्रमेण स्युश्चतुर्था दिवसाधिपा:। होरेशा: सूर्यतनयादधोधः क्रमशस्तथा॥
तसेच
"उदयात् उदयेत् वारः" एका सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी तो वार असा या सूत्राचा अर्थ आहे.
धार्मिक सोयींसाठी हिंदू पंचांगात सूर्योदयापासून दिवसाचा व वाराचा प्रारंभ होतो असे समजले जाते. मुसलमानी हिजरी पद्धतीनुसार सूर्यास्ताला नवीन वार सुरू होतो तर, इंग्रजी गेगोरियन आंतरराष्ट्रीय कालगणनेनुसार मध्यरात्री बारा वाजता नवीन वाराची सुरुवात होते. असे असले तरी, तिन्ही पद्धतींनुसार सूयोदयापासून सूर्यास्तापर्यंत एकच एक समान वार असतो.
"आमंदात् शीघ्रपर्यंतम् होरेशा:" असे वारांचे सूत्र आहे. म्हणजे मंद ग्रहापासून शीघ्र ग्रहापर्यंत होर्यानुसार.
मंदग्रह ते शीघ्र ग्रह असे आहेत -- शनी (ज्योतिष), गुरू (ज्योतिष), मंगळ (ज्योतिष) , रवी (ज्योतिष), शुक्र (ज्योतिष), बुध (ज्योतिष), चंद्र (ज्योतिष).
प्रत्येक ग्रहाचा एक होरा असतो.
शनिवारी पहिला होरा अथवा तास हा शनीचा, पुढील तास गुरूचा, तिसरा मंगळाचा, चौथा रवीचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा. याप्रमाणे तीन वेळा २१ होरे झाल्यावर २२वा पुन्हा शनीचा, २३वा गुरूचा, २४वा मंगळाचा येतो. असे २४ तास पूर्ण होतात. त्यानंतर दुसरा दिवस रवीच्या होर्याने सुरू होतो शनिवारनंतर रविवार येतो. पुन्हा २४ होरे मोजले की तिसर्र्या दिवसाचा पहिला होरा चंद्राचा म्हणजे सोमाचा. म्हणून रविवारनंतरचा वार सोमवार.
नक्षत्रे आणि राशी म्हणजे अवकाशातील विशिष्ट पट्ट्यातील ठळक तारका समूह. सूर्य, चंद्र आणि ग्रह आकाशातून ज्या पट्ट्यातून फिरत फिरत पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात त्या पूर्ण पट्ट्याचे ३६० अंश कल्पून त्या मार्गाचे ३०-३० अंशाचे बारा भाग पाडलेले असतात. त्या एका भागाला रास किंवा राशी म्हणतात. तसे २७ भाग पाडले तर प्रत्येक भागात एक अशी २७ नक्षत्रे होतात. म्हणजे एक भाग हा १३ अंश २० कलांचा होतो. ही नक्षत्रे म्हणजे अवकाशातील विशिष्ट तारका अथवा तारकासमूह. त्यातील एका ठळक तार्याला त्या नक्षत्राचा योगतारा म्हणतात. सव्वा दोन नक्षत्रांची एक राशी होते.
योग
चंद्र व सूर्य यांच्या संयुक्त गतीची बेरीज १३ अंश २० कला होण्यास जेवढा कालावधी लागेल त्याला योग म्हणतात. असे एकूण २७ योग आहेत.
करण
करण हादेखील असाच कालावधी आहे. तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण अशी एकूण सात करणे आहेत. बल, बालव, कौलव, तैतिल, गर, वणिज, विष्टी. एखाद्या तिथीचा पूर्वार्ध म्हणजे एक करण व उत्तरार्ध म्हणजे पुढचे करण. ही करणे एका पाठोपाठ एक अशी येतात. शिवाय अजून ४ करणे आहेत. ती स्थिर आहेत. वद्य चतुर्दशीच्या उत्तरभागी येणारे शकुनी; अमावास्येच्या पूर्वभागी चतुष्पाद; उत्तरभागी नाग आणि प्रतिपदेच्या पूर्वभागी येते ते किंस्तुघ्न, अशी ही जास्तीची चार करणे आहेत.
प्रकार
पंचांगाचे मुख्य दोन प्रकार सायन आणि निरयन.
विविध पंचांगे
- आनंदी वास्तू (
- इंडियन एफेमेरीज (इंडियन नॉटिकल अल्मानक- भारत सरकारचे पंचांग)
- कालनिर्णय पंचांग
- कृष्णमूर्ती पंचांग
- गजेंद्रविजय पंचांग
- जन्मभूमी पंचांग - गुजरात, मुंबई
- टिळक पंचाग - पुणे
- ढवळे पंचांग - मुंबई
- तीर्थंकर वर्धमान जैन पंचांग
- दाते पंचांग - सोलापूर
- बंगाली पंचांग
- महेंद्र जैन पंचांग (बंद झाले)
- मॉडर्न जैन पंचांग
- मारवाडी पंचांग
- राजंदेकर पंचांग - विदर्भ
- रामनारायन पंचांग - मध्य प्रदेश -(इ.स.१९३३पासून)
- रुईकर पंचांग - कराड
- रुपेश ठाकुर प्रसाद पंचांग
- लाटकर पंचांग - कोल्हापूर
- सनातन पंचांग
- सीमंधर स्वामी जैन पंचांग
- श्री सुभा़ष हिंदी पंचांग (इ.स. १९७१पासून)
भारतीय राष्टीय पंचांगातील महिने
हे हिंदू पंचांगांतील महिन्यांपेक्षा वेगळ्या दिवशी सुरू होतात. महिना सुरू होण्याचा दिवस :-
- १) चैत्र ३०/३१ दिवस २२ मार्च; लीप वर्ष असताना २१ मार्च. ज्या इसवी सनाला ४ने भाग जातो, ते लीप वर्ष.
- २) वैशाख ३१ दिवस
- ३) ज्येष्ठ ३१ दिवस
- ४) आषाढ ३१ दिवस
- ५) श्रावण ३१ दिवस
- ६) भाद्रपद ३१ दिवस
- ७) आश्विन ३० दिवस
- ८) कार्तिक ३० दिवस
- ९) मार्गशीर्ष ३० दिवस
- १०) पौष ३० दिवस
- ११) माघ ३० दिवस
- १२) फाल्गुन ३० दिवस
राफेल’चे एफेमेरीज हे खर्या अर्थाचे सायन पंचांग असते. पाश्चात्त्य ज्योतिष हे सायनाधारित आहे.
कालनिर्णय हे निरयन पंचांग आहे.
सूर्यसिद्धान्तावरून बनवली जात असलेली काही भारतीय पंचांगे
- सूर्यसिद्धान्तीय आदित्य पंचांग
- ऋषिकेश पंचांग
- गणेश आप्पा पंचांग
- राजेश्वरशास्त्री यांचे धारवाड पंचांग
- पारनेरकर महाराज पुरस्कृत पारनेर पंचांग
- वंटी कुप्पल पंचांग, वगैरे.
- काशी विश्वविद्यालय प्रकाशित पंडित मदनमोहन मालवीय पुरस्कृत विश्वपंचांग
- दक्षिणेकडील शृंगेरी शंकराचार्यांच्या शारदा पीठावरून प्रसिद्ध होणारे पंचांग
- महाराष्ट्रातील एकमेव धर्मशास्त्रसंमत सूर्यसिद्धान्ताधारित देशपांडे पंचांग
- उत्तरादि मठाचे सूर्यसिद्धान्त पंचांग
- हालाडी पंचांग
मराठी पंचांग छापायची सुरुवात
शके १९३८मध्ये (इ.स. २०१६) या वर्षी छापील पंचांगाचा शतकोत्तर अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. पूर्वी छपाईची कला उपलब्ध नसल्याने पंचांगे ही हस्तलिखित तयार करून त्यातील माहिती तोंडीच सर्वाना करून दिली जात असे. पहिले मराठी छापील पंचांग १६ मार्च १८४१ रोजी गणपत कृष्णाजी पाटील यानी शिळाप्रेसवर छापून प्रसिद्ध केले. त्यासाठी त्यानी संपूर्ण पंचांग स्वत:च्या अक्षरात लिहिले होते. त्या पहिल्या छापील पंचांगाचे गणित रखमाजी देवजी मुले यांनी केले होते. छापील पंचांगाच्या शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त या नूतन शकवर्षात 'पंचांग' या विषयावर दा.कृ. सोमण हे पंच्याहत्तर व्याख्याने देणार आहेत.
कालगणना
- ६० वर्षे (संवत्सरे) = १ संवत्सर चक्र
- ३६० संवत्सरे म्हणजे अथवा मानवी वर्षे = १ दिव्य वर्ष
- १२०० दिव्य वर्षे = १ कलि युग
- २४०० दिव्यवर्षे = १ द्वापर युग
- ३६०० दिव्य वर्षे= १ त्रेता युग
- ४८०० दिव्य वर्षे= १ कृत युग
- ४ युगे = १ महायुग
- ७१ महायुगे = १ मनु
- १४ मनु= १ कल्प (ब्रह्मदेवाचा एक दिवस)
- ३६००० कल्पे= ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य
- १००० ब्रह्माची आयुष्ये= विष्णूची एक घटका
- विष्णूच्या १००० घटिका म्हणजे १ शिवनिमिष
- १००० शिवनिमिषे = १ महामाया निमिष
हेही पाहा
बाह्य दुवे
- http://www.marathimati.com/panchang/. Missing or empty
|title=
(सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |