रवि (ज्योतिष)
हा भारतीय फलज्योतिषातील संकल्पनेप्रमाणे गणितीय संकल्पनांसाठी रवि हा ग्रह मानला गेला आहे. त्याला सूर्य असेही म्हणले जाते. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. सूर्य आत्माकारक ग्रह आहे ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे. आठवड्याच्या दिवसात भारतीय नावांमध्ये रविवार सूर्यासाठी समर्पित असतो.
इतिहास
[संपादन]सूर्य आणि त्याचे ज्योतिषीय महत्त्व वैदिक काळाच्या सुरुवातीच्या काळात वेदांमध्ये नोंदले गेले. अथर्ववेदात सूर्य आणि विविध शास्त्रीय ग्रहांचा संदर्भ इ.स.पूर्व १००० पासून लिखित स्वरूपात आढळतो. शक कालगणने मध्ये सूर्याचा उपयोग आहे.
प्रभाव
[संपादन]भावानुसार आणि राशी प्रमाणे रवीचे प्रभाव दिसतात. उदा. मेष राशी मध्ये रवी असेल तर हा रवी तयोद्धा असतो. म्हणजे जातकाची प्रवृउत्ती लढाऊ असते. जातक शास्त्रामध्ये पारंगत, कलेत प्रसिद्ध, युद्धाचे शौकीन, उग्र, कर्तव्याशी जोडलेले, प्रवासाचे शौकीन, मजबूत हाडे, सत्कर्म, शौर्यकारक कृत्ये, द्विपक्षीय आणि रक्तरंजित विकार, तेजस्वी आणि सामर्थ्यशाली असतात. यासाठी नक्षत्र आणि नक्षत्र पाद हे पण पाहणे महत्त्वाचे असते. राशीनुसार रवीचा प्रभाव पुढील प्रमाणे आहे.
राशी - जातकाच्या आयुष्यावरील परिणाम
- मेष: योद्धा आणि शास्त्रामध्ये पारंगत
- वृषभ: कलात्मक, डोळ्याचे आजार दर्शवितो
- मिथुन: विद्वान, अत्यंत संपन्न, सेवाभावी, प्रतिभावान, ज्योतिषी
- कर्कः सद्गुणी, कफ आणि पित्त त्रास, परिश्रम, सन्मान
- सिंहः राजस, अत्यंत पराक्रमी, साहसाकडे कल, साहसी खेळ, शारीरिकदृष्ट्या बळकट, वर्तन राजेशाही
- कन्या: विद्वान, वेदशास्त्री, लेखक, सेवा, वाहनांची दुरुस्ती, गायन, वाद्य वादनात कुशल
- तूळ: सेवा भाव, मितभाषी, सोने व इतर धातू विकण्यापासून उदरनिर्वाह, सेवा-विचार
- वृश्चिकः शस्त्र आवड, स्त्री शक्तीचे प्रतिनिधित्व, कुटुंबा बद्दल अत्यंत प्रेम
- धनु: श्रीमंत, राजाला प्रिय, आदरणीय, शांत, मदत करणारे, शक्तीवान
- मकर: यशस्वी, फिरण्याची आवड
- कुंभ: भाग्यवान, स्थिर, विचार पूर्वक कृती
- मीन: स्त्रियांना आवडणारे, आनंदी, शिकलेले, व्यापाराद्वारे श्रीमंत, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून मिळणारा फायदा
जर कुंडलीमध्ये सूर्याचा प्रभाव थेट आत्मकारक म्हणून किंवा लग्न स्थानावर नसेल तर त्याचा मोठा प्रभाव दिसू शकत नाहीत. तथापि, जेव्हा सूर्य महादशा किंवा अंतर्दशेमध्ये सक्रिय होतो, तेव्हा सूर्याचे हे गुण प्रामुख्याने आणि दृश्यमान होतात.
सूर्य कुंडली मध्ये कोठेही असला तरी त्याचा परिणाम सामान्यत: जीवनातील खालील भागात दिसून येतो:
- स्वरूप आणि शारीरिक वैशिष्ट्ये
- निसर्ग, आवडी
- आचरण
- संपत्ती
- नैसर्गिक प्रतिभा छंद
- आरोग्य विकार आणि आरोग्याचा त्रास
- संतती
तांत्रिक माहिती
[संपादन]- अनुकूल भाव
- प्रतिकूल भाव
- बाधस्थान
- अनुकूल राशी
- प्रतिकूल राशी
- मित्र ग्रह
- सम ग्रह
- नवीन ग्रहाशी
- मूल त्रिकोण
- स्वराशीचे अंश
- उंच्च राशी - मेष राशी
- नीच राशी
- मध्यम गती
- संख्या
- देवता
- अधिकार
- दर्शकत्व
- शरीर वर्ण
- शरीरांगर्गत धातू
- तत्त्व
- कर्मेन्द्रिय
- ज्ञानेन्द्रिय
- त्रिदोषांपैकी दोष
- त्रिगुणापैकी गुण
- लिंग
- रंग
- द्र्व्य
- निवासस्थान
- दिशा
- जाती
- रत्न
- रस
- ऋतू
- वय
- दृष्टी
- उदय
- स्थलकारकत्व
- भाग्योदय वर्ष
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
फलज्योतिषातील ग्रह व राशी
| |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|