"प्रतिभा पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ १११: | ओळ १११: | ||
सुशील मुर्मू याचा दयेचा अर्ज २००४पासून प्रलंबित होता. प्रतिभा पाटील यांनी मुर्मू याचा दयेचा अर्ज ९ फेब्रुवारी २०१२रोजी मंजूर केला आणि त्याची फाशी रद्द करून ती जन्मठेपेवर आणली. मुर्मू याला नरबळी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. स्वतःच्या भरभराटीसाठी मुर्मू याने झारखंड येथे नऊ वर्षांच्या मुलाचा बळी दिला होता. मुर्मूने घेतलेला नरबळी हे ’दुर्मिळातील दुर्मिळ' उदाहरण ठरायला हवे आणि त्यासाठी फाशीची शिक्षाच आहे, आणि असायला हवी होती. या उदाहरणात या नियमाला अपवाद केला जाता कामा नये, असे सर्वोच्च न्यायालयाने मुर्मू याला फाशीची शिक्षा ठोठावताना म्हटले होते. |

==माजी राष्ट्रपतींच्या हट्टासाठी धावणारा ’पांढरा हत्ती’== |

प्रतिभा पाटील या राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी खास अमरावतीसाठी नव्या गाड्या सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाकडे आग्रह धरला होता. यामध्ये आठवड्यातून पाच दिवस उणेपुरे पावणेदोनशे किलोमीटर अंतर धावणारी नागपूर-अमरावती इंटरसिटी एक्स्प्रेसचाही समावेश आहे.

प्रतिभा पाटील यांच्या हट्टापायी सुरू झालेली ही रेल्वेगाडी अत्यल्प म्हणजे सरासरी १० टक्क्यांहूनही कमी प्रवासी संख्येसह धावत होती. आर्थिकदृष्ट्या अजिबात सक्षम नसताना धावणाऱ्या या रेल्वगाडीमुळे राष्ट्रीय संपत्तीचे अक्षरश: कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सुरुवातीपासूनच तोट्यात असलेल्या या गाडीने रेल्वेचे भारी नुकसान केले आहे.

दर किलोमीटरला ६५० रुपये खर्च, एकूण अंतर ३६८ किलोमीटर आणि गाडी धावण्याचे एकूण दिवस ७५०, या हिशेबाने साडेतीन वर्षांत या गाडीला चालवण्याचा खर्च (ऑपरेटिंग कॉस्ट) १७ कोटी ९४ लाख रुपये होता. याउलट रेल्वेला या खर्चाच्या केवळ १.३१ टक्के, म्हणजे २३ लाख ६२ हजार ६६७ रुपये मिळाले. याचाच दुसरा अर्थ, रेल्वेचा निव्वळ तोटा १७ कोटी ७० लाख २१ हजार रुपयांचा होता.

एप्रिल २००९ ते सप्टेंबर २०११ या कालावधीत दोन्ही बाजूंच्या प्रवासाचा विचार करता प्रवाशांची टक्केवारी फक्त ५.०८ टक्के आणि मिळकतीचे प्रमाण ४.२५ टक्के होते, अशी माहिती मध्य रेल्वेच्या मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांनी माहिती अधिकाराखाली केलेल्या एका अर्जाच्या उत्तरात दिली आहे.

एकूण प्रवासी क्षमता : ४ लाख ६१ हजार;

प्रत्यक्ष प्रवास करणारे : २३ हजार ४३०

अपेक्षित उत्पन्न : ५.५५ कोटी रुपये.

प्रत्यक्ष मिळकत : २३.६२ लाख रुपये.

==संदर्भ == |

[http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=259102:2012-11-01-19-23-14&catid=25:2009-07-09-02-01-06] पांढरा हत्ती |

==निवृत्तीनंतर== |
==निवृत्तीनंतर== |
२१:२९, ९ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
प्रतिभा देवीसिंह पाटील | |
१२ वे भारतीय राष्ट्रपती

विद्यमान | |
पदग्रहण जुलै २५, इ.स. २००७ | |
पंतप्रधान | मनमोहन सिंग |
उपराष्ट्रपती | हमिद अन्सारी |
मागील | डॉ. अब्दुल कलाम |
कार्यकाळ ८ नोव्हेंबर २००४ – २३ जुलै २००७ | |
मागील | मदनलाल खुराना |
पुढील | ए.आर. किडवाई |
जन्म | १९ डिसेंबर, १९३४ नंदगाव, जळगाव, महाराष्ट्र |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पती | देवीसिंह राजसिंह पाटील |
प्रतिभा पाटील (डिसेंबर १९, इ.स. १९३४ - हयात) या भारतीय प्रजासत्ताकाच्या १२ व्या राष्ट्रपती आहेत. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर जुलै २५, इ.स. २००७ रोजी त्यांनी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला आहेत.
राष्ट्रपतीपदापूर्वी त्या राजस्थानच्या १६व्या राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स. १९६२ ते इ.स. १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार होत्या.
जीवन
भारताच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षा आणि काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या असणाऱ्या श्रीमती प्रतिभाताई देवीसिह पाटील (शेखावत) यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यात झाला. घरची श्रीमंती त्यात पाच भावात एकच लाडकी बहीण त्यामुळे लहानपण लाडाकोडात गेलं. एम.जे. कॉलेज, जळगाव येथून एम. ए. पदवी घेतल्यानंतर शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई येथून एल.एल.बी. ची परीक्षा देऊन त्या कायदेतज्ज्ञ झाल्या.[१].
इ.स. १९६२ साली त्या जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या. त्यांची एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली. ७ जुलै १९६५ ला अमरावतीच्या शेखावतांच्या घरात प्रवेश केला. पहिल्यांदाच मंत्री झाल्या आणि सतत वीस वर्षे त्या निरनिराळ्या खात्याच्या मंत्री होत्या. आरोग्य, पर्यटन, संसदीय कार्य, गृहनिर्माण, समाजकल्याण व सांस्कृतिक, सार्वजनिक आरोग्य व समाजकल्याण, दारूबंदी व पुनर्वसन, शिक्षणमंत्री, विधान सभेवर फेरनिवड, विधान मंडळ नेतेपदी निवड १९७९ ते ८० या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
इ.स. १९८५ साली राज्यसभेवर निवडून गेल्या व राज्यसभेच्या उपाध्यक्षा म्हणून निवडून आल्या. तो त्यांचा कार्यकाल संपल्यावर अमरावतीहून १९९१ साली प्रथमच त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून आल्या. १९८९ ला त्या मध्यप्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाही होत्या. १९७८ ला एदलाबाद मतदार संघातून त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या.
नैरोबीत आंतरराष्ट्रीय समाजकल्याण परिषदेस भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्या गेल्या होत्या.प्रिटोरिया येथील महिला परिषद, म्युनिक येथील महिलांची जागतिक परिषद तसेच १९८५ मध्ये दक्षिण अमेरिकेत बोलेव्हिया येथे झालेली परिषद अशा सर्व ठिकाणी त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापून स्त्रियांना चरितार्थाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. पाळणाघर मदत योजना स्थापन केली. महिला बँकांची स्थापना केली. आदिवासी विकास योजना,वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि ज्योतिबा फुले महामंडळ इ. महामंडळांची स्थापना केली. जळगाव येथे एक सुसज्ज रूग्णालय उपलब्ध करून दिले. अंधांसाठी संस्था काढून कार्य उभे केले. जळगाव येथे इंजिनियरींग कॉलेज काढले.
स्वीकारलेली पदे
- १९६२ पासून महाराष्ट्राच्या आमदार
- १९६७ ते ७२ : आरोग्य, पर्यटन, गृहनिर्माण, संसदीय कामकाज या खात्यांच्या राज्यमंत्री
- १९७२ ते ७४ : समाजकल्याण मंत्री
- १९७४ ते ७५ : आरोग्य आणि समाजकल्याण मंत्री
- १९७५ ते ७८ : शिक्षण, सांस्कृतिक, पुनर्वसन मंत्री
- १९७९ ते फेबुवारी १९८० : विधानसभेत विरोधी पक्षनेत्या
- १९८२ ते ८५ : शहरविकास आणि गृहनिर्माण मंत्री
- १९८३ ते ८५ : नागरी पुरवठा आणि समाजकल्याण मंत्री
- १९८५ ते ९० : राज्यसभेवर निवड
- १९८८ ते ९० : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्ष
- १८ नोव्हेंबर १९८६ ते ५ नोव्हंेबर १९८८ : राज्यसभेच्या उपसभापती
- १९९१ : लोकसभेच्या खासदार
- ८ नोव्हेंबर २००४ : राजस्थानच्या राज्यपाल
कौटुंबिक पार्श्वभूमी
१९६५ मध्ये डॉ. देवीसिंग शेखावत यांच्याशी विवाह. एक मुलगा आणि एक मुलगी. प्रतिभा पाटील एक उत्तम टेबलटेनिस खेळाडू होत्या. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याचा अभ्यास केला होता.
विवाद
राष्ट्रपतीपदासाठी नामांकन झाल्यापासून प्रतिभा पाटील यांच्याविषयी बरेच विवादास्पद मुद्दे उघडकीस आले. त्यांच्या उमेदवारीचा अर्ज करण्याच्या एक दिवस आधी जळगावमधील काँग्रेसच्या मयत कार्यकर्त्याच्या पत्नी रजनी पाटील यांनी असा आरोप केला की प्रतिभा पाटील यांनी त्यांच्या राजकीय स्थानाचा फायदा घेऊन त्यांचे भाऊ जी. एन. पाटील यांना पतीच्या खून प्रकरणातून वाचवले.[२] त्यानंतर अनेक वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांनी त्यांच्या कुटुंबाशी निगडित प्रतिभा महिला सहकारी बँक या संस्थेतील आर्थिक गैरव्यवहार (भारतीय रिझर्व बँकेने रद्द केलेला परवाना आणि पाटील कुटुंबीय चालवत असलेल्या साखर कारखान्यांकडून झालेली कर्जबुडी इत्यादि) उघडकीस आणले.
हे विवादास्पद मुद्दे रजनी पाटील यांनी, तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम व सोनिया गांधी यांना लिहिलेली पत्रे, बँकेच्या कर्मचारी संघटनेने लिहिलेली पत्रे, न्यायालयीन निकाल, भारतीय रिझर्व बँकेचे अहवाल आणि महाराष्ट्रातील विधानसभेतील नोंदी यांच्या आधारे उघडकीस आणले गेले.
दयाळू प्रतिभा पाटील
प्रतिभा पाटील यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत अनेक निर्घृण गुन्हेगारांचे गुन्हे माफ केले. राष्ट्रपती प्रतिभा पाटील या आजवरच्या सगळ्यांत ’दयाळू' राष्ट्रपती ठरल्या. त्यांनी २३ जणांची फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेपेवर आणली. आधीच्या ३० वर्षांत म्हणजे १९८१ पासून मंजूर करण्यात आलेल्या दयेच्या अर्जांच्या तुलनेत हे प्रमाण ९० टक्के होते.
सुशील मुर्मू याचा दयेचा अर्ज २००४पासून प्रलंबित होता. प्रतिभा पाटील यांनी मुर्मू याचा दयेचा अर्ज ९ फेब्रुवारी २०१२रोजी मंजूर केला आणि त्याची फाशी रद्द करून ती जन्मठेपेवर आणली. मुर्मू याला नरबळी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. स्वतःच्या भरभराटीसाठी मुर्मू याने झारखंड येथे नऊ वर्षांच्या मुलाचा बळी दिला होता. मुर्मूने घेतलेला नरबळी हे ’दुर्मिळातील दुर्मिळ' उदाहरण ठरायला हवे आणि त्यासाठी फाशीची शिक्षाच आहे, आणि असायला हवी होती. या उदाहरणात या नियमाला अपवाद केला जाता कामा नये, असे सर्वोच्च न्यायालयाने मुर्मू याला फाशीची शिक्षा ठोठावताना म्हटले होते.
माजी राष्ट्रपतींच्या हट्टासाठी धावणारा ’पांढरा हत्ती’
प्रतिभा पाटील या राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी खास अमरावतीसाठी नव्या गाड्या सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाकडे आग्रह धरला होता. यामध्ये आठवड्यातून पाच दिवस उणेपुरे पावणेदोनशे किलोमीटर अंतर धावणारी नागपूर-अमरावती इंटरसिटी एक्स्प्रेसचाही समावेश आहे.
प्रतिभा पाटील यांच्या हट्टापायी सुरू झालेली ही रेल्वेगाडी अत्यल्प म्हणजे सरासरी १० टक्क्यांहूनही कमी प्रवासी संख्येसह धावत होती. आर्थिकदृष्ट्या अजिबात सक्षम नसताना धावणाऱ्या या रेल्वगाडीमुळे राष्ट्रीय संपत्तीचे अक्षरश: कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सुरुवातीपासूनच तोट्यात असलेल्या या गाडीने रेल्वेचे भारी नुकसान केले आहे.
दर किलोमीटरला ६५० रुपये खर्च, एकूण अंतर ३६८ किलोमीटर आणि गाडी धावण्याचे एकूण दिवस ७५०, या हिशेबाने साडेतीन वर्षांत या गाडीला चालवण्याचा खर्च (ऑपरेटिंग कॉस्ट) १७ कोटी ९४ लाख रुपये होता. याउलट रेल्वेला या खर्चाच्या केवळ १.३१ टक्के, म्हणजे २३ लाख ६२ हजार ६६७ रुपये मिळाले. याचाच दुसरा अर्थ, रेल्वेचा निव्वळ तोटा १७ कोटी ७० लाख २१ हजार रुपयांचा होता.
एप्रिल २००९ ते सप्टेंबर २०११ या कालावधीत दोन्ही बाजूंच्या प्रवासाचा विचार करता प्रवाशांची टक्केवारी फक्त ५.०८ टक्के आणि मिळकतीचे प्रमाण ४.२५ टक्के होते, अशी माहिती मध्य रेल्वेच्या मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांनी माहिती अधिकाराखाली केलेल्या एका अर्जाच्या उत्तरात दिली आहे.
एकूण प्रवासी क्षमता : ४ लाख ६१ हजार;
प्रत्यक्ष प्रवास करणारे : २३ हजार ४३०
अपेक्षित उत्पन्न : ५.५५ कोटी रुपये.
प्रत्यक्ष मिळकत : २३.६२ लाख रुपये.
संदर्भ
[१] पांढरा हत्ती
निवृत्तीनंतर
निवृत्तीनंतर प्रतिभा पाटील यांना पुण्याच्या खडकी भागात बंगला हवा होता. त्यांनी निवडलेला लष्कराच्या ताब्यातला बंगला आणि त्याचे आवार आकाराने अवाढव्य होते. जनतेचा विरोध पाहून त्यांना तो नाद सोडावा लागला.
त्यानंतर, महाराष्ट्र राज्य सरकारच्या मालकीचा पुण्यातील ' रायगड ' हा बंगला वर्षाला एक रुपया नाममात्र भाड्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे (६ एप्रिल २०१३ची बातमी).
प्रतिभा पाटील यांनी लिहिलेली पुस्तके
प्रतिभा पाटील यांनी एकूण १५ पुस्तके लिहिली आहेत. त्यांत मराठीतील ’भारत जागवा’, हिंदीमधील ’भारत जगाओ’ या पुस्तकांचे प्रत्य्की ६ खंड, ’जब मैं राष्ट्रपति थीं’ (२ खंड) आणि ’स्त्री उत्कर्ष की ओर’ या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमध्ये प्रतिभाताईंनी देश-विदेशांत दिलेली हिंदी-मराठी-इंग्रजीतील भाषणे व अन्य व्याख्याने समाविष्ट करण्यात आली आहेत.
संदर्भ व नोंदी
बाह्य दुवे
- अधिकॄत चरित्र (इंग्लिश मजकूर)
- भारतीय संसदेच्या संकेतस्थळावरील माहिती (इंग्लिश मजकूर)
मागील: अब्दुल कलाम |
भारतीय राष्ट्रपती जुलै २५, इ.स. २००७ – - |
पुढील: - |