Jump to content

विकिपीडिया:वर्ग सुसूत्रीकरण/अडचणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)








वर्गीकरण करताना येणार्‍या अडचणी आणि उपाय

[संपादन]

#लेखांचे वर्गीकरण आपण कसे करतो, याबद्दल माझ्या मनात प्रचंड गोंधळ झाला आहे.

नवीन लेख बनवताना सहसा व्यक्ति शोध पेटीत लेख वर टिचकी मारून जातात त्यामुळे आपल्याला बनवावयाच्या लेखाच्या नामसाधर्म्याचा लेख अस्तीत्वात असेल तर त्याचा शोध आपोआपच उपलब्ध होतो.(पण जेव्हा नवा लेख बनवण्याचे विशेष बटन (प्रीलोडेड कंटंटने) वापरून बनवण्यास घेतला जातो तेव्हा मात्र पुनरावृत्तीची शक्यता अस्तीत्वात रहाते) सध्या मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतची काळजी घेताना लेखांच्या किंवा त्यांच्या वर्गीकरणांच्या पुनरूकती होऊ नयेत म्हणून काही प्रमाणात अप्रत्यक्ष नियमन होते आहे असे आढळून येते.बरेच इतर भाषीय विकिपीडियन विशेष:नवीन_पाने हे पान आर.एस.ए‍स. (फीड)अथवा ऍटम रसदी वर लक्ष ठेवून नियमन करतात असे दिसून येते.(विकिपमीडीया सॉफट्वेअर पातळीवर, वर्गीकरण प्रक्रीयेचे सुलभीकरणाचे चांगले प्रयत्न होत आहेत पण तेसुद्धा वर्गीकरण करणार्‍या व्यक्तिवर अवलंबून असेल)
विकिंमध्ये लेखांच्या (नावांसहीत) निर्मितीत आणि वर्गीकरणात बरचस उपलब्ध स्वातंत्र्या मुळे काहीसा गोंधळ होण्याची शक्यता असते हे खरे आहे.या वर इंग्रजी आणि इतर भाषी विकसीत विकिपीडिया विकिपीडिया:प्रकल्प अंतर्गत सुसूत्रिकरण आणि नि:संदिग्धीकरण, वर्ग सुसूत्रीकरण इत्यादी तत्सम प्रकल्पांच्या माध्यमातून सदस्यांच्या सहयोगाने खूप चांगले नियोजन करत असतात.मराठी विकिपीडियात सदस्यांनी या चर्चा मुख्यत्वे परस्पर सदस्य चर्चा पानांवर केल्यामुळे त्या एकत्रीत स्वरूपात सहज उपलब्ध होत नाहीत अशी अडचण आहे.मराठी विकिपीडियात काम करणार्र्या सदस्यांनी समन्वयाकरिता प्रकल्पांचा उपयोग करण्याच्या दृष्टीने सजग व्हावयास हवे असे वाटते.अर्थातच त्या शिवाय अधीक (सदस्य) संपादन बळाचीसुद्धा आवश्यकता अधोरेखीत होते.
तोपर्यंत लेखांना शोधण्याचे वर ऊल्लेखीलेले मार्ग आणि होता होईतो संबधीत आपल्याकडून तरी विवीध संबधीत प्रकल्पांना होता होईल तेवढा हातभार लावणे हा मार्ग अधीक प्रशस्त असेल असे वाटते. इतर सदस्य इतर काही मार्ग सूचवू शकतील तर स्वागतच आहे.
विकिपीडिया:प्रकल्प/हवे असलेले लेख आणि करावयाच्या गोष्टींची यादी या गोष्टी सर्व लेख आणि समन्वय प्रकल्प तसेच चावडी आणि मदतकेंद्र येथून इंटीग्रेटेड स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. याचे मला दोन तीन फायदे दिसतात, बरेच सदस्य लेख किंवा माहिती हवी होती अशी विनंती करतात या विनंत्या सुयोग्य पानावर अधीक व्य्वस्थीतपणे स्वीकारता येतील. अशा विनंती करतानाच नवागत सदस्यांचा प्रकल्प संकल्पनेशी परिचयसुद्धा राहील. अविश्वकोशीय स्वरूपाच्या विनंतीबद्दल अधीक सूयोग्य मार्गदर्शन उपलब्ध होऊन अविश्वकोशीय स्वरूपाच्या लेखनाचे प्रमाण कमी होईल; मोठ्याप्रमाणावर साधारणतः ५०० च्या पेक्षा अधीक संपादने करणार्‍या सर्व सदस्यांना करावयाच्या गोष्टींची यादी आधी अद्ययावत करण्याचे महत्त्व लक्षात आणून द्यावयास हवे करावयाच्या गोष्टींची यादी आधी अद्ययावत करण्याने अधीक लोकांचा सहभाग लाभून श्रम आणि वेळेची बचत व एकट्यावर येणारा तसेच व्यक्तिगत जीवनात विकित वेळ दिल्याने येणारा ताण कमी टाळता येईल प्रकल्पांना अधीक चांगली दिशा आणि समन्वय प्राप्त होईल.असे वाटते इतरांची या विषयावर काय मते आहेत ते जाणून घेणे आवडेल.