Jump to content

विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रचालकपदासाठी आवश्यक कौशल्ये

[संपादन]

नमस्कार,

प्रसन्नकुमार यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मी प्रचालकपदाला जरुरी अशा काही लक्षणांची यादी केली. ही मला वाटणारी व आठवणारी लक्षणे आहेत. जसे कृष्णाने अर्जुनास स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली होती तशी तुम्ही (मराठी विकिपीडिया संपादकगण) आम्हास (मराठी विकिपीडिया संपादकगण) ही सांगावीत ही विनंती. माझी यादी येथे दिली आहे. यात तुमची भर घालावी ही विनंती -

  • मराठी विकिपीडियावर बराच काळ (वर्षभर किंवा जास्त) कार्यरत असणे
  • एकंदर विकिपीडिया व मीडियाविकिवरील नियम व कार्यपद्धतीची माहिती असणे
  • क्लिष्ट साचे, वर्गवारी व तत्सम गोष्टींची माहिती असणे व ही माहिती इतरांना देणे
  • तेथील नेहमीच्या सदस्यांशी मेळ घालून अनेक छोटे उपप्रकल्प पार पाडणे
  • येथील लिखित व अलिखित नियमांची जाण असणे व ते लागू करण्यात पक्षपात किंवा भीड/लाज/भीती न बाळगणे
  • स्वतःवर करण्यात आलेली टीका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे
  • कितीही उद्धट, उर्मट व अविवेकी संदेशांना शांतपणे नियमांनुसार उत्तरे देणे
  • मराठी विकिपीडिया हा मराठीभाषकांची संपत्ती असून त्यांचा निर्णय अंतिम असतो याची जाण असणे

अभय नातू ०४:१७, ११ जुलै २०१० (UTC)

या विभागाचे शीर्षक मराठीखेरीजच्या भाषेतले होते त्यामुळे बदलले.त्याशिवाय वरीलपैकी शेवटच्या तीन कौशल्यांत बदल सुचवतो.

  • वैयक्तिक टिकेचे मुद्दे संयत रितीने हाताळता येणे.
  • सर्व प्रकारच्या संदेशांना, योग्य असेल तेथे उत्तरे देणे. त्यासाठी सभ्य प्रमाणभाषेचा, विकिपिडियावरील नियमांचा आणि पूर्वघटितांचा आधार घेणे
  • मराठी विकिपिडिया ही सर्व मराठी भाषकांची सामायिक संपत्ती आहे, याची येथील वर्तनात सदोदित जाणिव ठेवणे.

/ मनोज ०८:३३, १ ऑगस्ट २०१० (UTC)

मला वाटते येणार्‍या काळात प्रचालक पदासाठी समर्थन देताना सदस्यांनी प्रचालक पदासाठी विनंती करणारे सदस्यांचे योगदान अभ्यासताना खालील गोष्टी लक्षात घेतल्यास विकिपीडिया संस्कृतीच्या संवर्धनास हातभार लागेल. माहितगार ०७:२१, १२ जुलै २०१० (UTC)
  1. सदस्यास येथील विकिपीडिया:नामविश्व संकल्पनेचा परिचय झाला आहेका अथवा त्यांची सर्व नामविश्वातून त्यांना त्या नामविश्वातील संकेतांचे आणि उपयोगितेचे आकलन झाले आहे का खास करून:
    1. मुख्य लेख नाविश्वाच्यादृष्टीने शीर्षकलेखन संकेतांचा सर्वसाधारण परिचय झालेला असावा त्या अनुषंगाने पुर्ननिर्देशन , स्थानांतरण, नि:संदीग्धीकरण कार्याचा परिचय झालेला असावा असे काम केलेले असावे.
    2. पुरेशी प्रताधिकार सजगता असावी.
    3. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या परिघाची जाणीव
    4. विकिपीडिया लेखांच्या विकिकरणाचा अनुभव असावा.शुद्धलेखन/शुद्धलेखन विनंत्या,पुर्नलेखन,बदल,पानकाढा, संदर्भ विनंत्या करणे त्या अनुषांगाने चर्चांचा अनुभव असणे
    5. विकिपीडिया:प्रचालक/कामे या संदर्भाने विकिपीडिया:नामविश्व, विकिपीडिया:निर्वाह, विकिपीडिया:चावडी/प्रबंधकांना निवेदन ; विकिपीडिया:कारण ; विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रुटी, विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा ; विकिपीडिया:पहारा आणि गस्त या गोष्टींशी परिचीत असावे
  2. इतर नामविश्वात वर्ग: साचा: नामविश्वात किमान स्वरूपाचे काम झाले असावे,तसेच साचे कसे काम करतात आणि साचात शुद्धलेखनादी दुरूस्त्या करताना काय काळजी घेणे आवश्यक आहे याचे किमान स्वरूपी आकलन असावे.
    1. इतर मुख्यनामविश्वातील लेखचर्चा सदरातून तसेच सदस्य चर्चा सदरातून नवीन सदस्यांचे शंका निरसन मार्गदर्शन करण्याचा अनुभव असावा.
    2. विकिपीडियाचे इतर सहप्रकल्प खासकरुन कॉमन्स, ट्रान्सलेट विकि यांचा परिचय असावा
    3. मिडियाविकि नामविश्वातील सुधारणा चर्चेत सहभाग घेतला असेल तर चांगले
  3. स्टॅटीक आणि डायनॅमीक अंकपत्त्यातील फरक माहित असणे गरजेचे आहे.

प्रचालकपदासाठी अर्ज

[संपादन]

नमस्कार विकिपीडियन मंडळी, मी प्रसन्नकुमार आपणास ह्याद्वारे विनंतीअर्ज करतो कि मला मराठी विकिपीडियावरील प्रचालकपदाचे अधिकार मिळावेत,आपण याठिकाणी आपली प्रतीक्रिया/प्रतीसाद खाली ह्या अर्जाच्या शेवटी मांडून आपले मत कळवावे.तत्पूर्वी माझा लहानसा परिचय, मी गेल्या वर्षी १ सप्टेंबर २००९ रोजी मराठी विकिपीडियावर नाव नोंदवून संपादनास आरंभ केला.जवळपास ११ महिन्यांच्या अनुभवानंतर मी मराठी विकिपीडियावर चांगलाच रूळलो आहे, मला असे वाटते कि मी प्रचालकपदाची जबाबदारी घेऊन मराठी विकिपीडियावरील माझे योगदान अधिक चांगले करू शकेन,आत्तापर्यंत आपले सहकार्य लाभले आहेच ,इथून पुढे ते वृद्धिंगत होईल अशी आशा करतो.माझ्या योगदानाविषयी अधिक माहितीसाठी माझे सदस्यपृष्ठ पहावे :
सदस्य:Prasannakumar ,कळावे लोभ असावा.धन्यवाद.செ.प्रसन्नकुमार ०५:०५, ११ जुलै २०१० (UTC)

मार्ग सुचवा

[संपादन]
मराठी विकिपीडियाची वाचकाभिमूखता वाढवण्याच्या दृष्टीने दालन:विशेष लेखन आणि दालन:दिवाळी अंक प्रयोजन केले आहे. या प्रकल्पात अधीक सदस्य सहभागाची आवश्यकतातर आहेच त्या दृष्टीने विकिपीडिया:नवी दालने येथे काही सहाय्य सुद्धा उपलब्ध केलेले आहे.

दालन:विशेष लेखन मध्ये मासिक सदर आणि उदयोन्मूख लेख हे च्या वर्गीकरणाचे दुवे दिले आहे पण तसे करणे पुरेसे नाही कारण वाचक सरळ वाचनीय लेखनावांपर्यंत पर्यंत पोहोचणार नाही त्याला काळानुसार केलेल्या वर्गीकरणांना वळसा घालून लेख शोधावे लागतात.वाचनीयतेच्या दृष्टीने हि आदर्श स्थिती नव्हे.कृपया अधिक चांगला मार्ग सुचवावा माहितगार ०५:४३, १५ जुलै २०१० (UTC)

सहाय्य हवे

[संपादन]
दालन:विशेष लेखनच्या संदर्भाने खालील सहाय्यसुद्धा प्राधान्याने हवे आहे.माहितगार ०७:२६, १५ जुलै २०१० (UTC)
  1. साचा:विलेपाने सारणीच्या माध्यमातून विशेष लेखनाकडे दिशा निर्देशन करतो. साचाचे आणि संबधीत सारणीचे रंग दालन:विशेष लेखनशी दिसण्यास सुयोग्य सुशोभित करण्यात सहाय्य हवे आहे.
  2. विशीष्ट अलिकडील बदल चे दुवे देण्याचा प्रयत्न केला आहे. हे दुवे पुरेसे सयूक्तीक आहेत का हे तपासून घेणे.
  3. विशेषतः विकिपीडिया:मुखपृष्ठ नवीन माहिती प्रकल्पचे सांधलेले अलिकडील बदल मध्ये चक्क धूळपाटी,मदत केंद्र आणि पहारा आणि गस्त चे अलिकडील बदल दिसत आहेत आणि विशेष लेखनाचे अलिकडील बदल दाखवताना या तिन्हींचे बदल दाखवणे मुळीच अभिप्रेत नाही. कृपया कुणी उपाय सुचवावा अथवा सुयोग्य बदल करावा.

अलिकदील बदल मथळ्यातील नोंदी

[संपादन]

अलिकडीलबदल मथळ्यात सदस्यांना काही विशीष्ट गोष्टी सुलभकरण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण बदल केले आहेत.आपले मत प्रार्थनीय आहेच

त्या शिवाय साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथे मासिक सदर ,उदयोन्मूख लेख आणि प्रकल्प बावन्नकशीतील नोंदी संबधीत प्रकल्पाच्या सहमतीने, सहमती असलेले पुरेशी लेख नावे नसल्यास स्वतः प्रचालकांनी निर्णय घावयाचे अभिप्रेत आहे.

नवेलेख हवे/ भाषांतर हवे:/मराठी शब्द सुचवा हे तीन प्रकार शक्यतो साचा चर्चा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथील सहमती नुसार घ्यावयाचे आहेत.

साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या पान अती महत्वपूर्ण असल्यामूळे केवळ प्रचालकांकरिता सुरक्षीत केले आहे तर साचाचे चर्चा पान प्रवेशीत सदस्यांकरिता अर्ध सुरक्षीत केले आहे.

माहितगार ०७:५२, १६ जुलै २०१० (UTC)

शब्द सहमती हवी

[संपादन]
  • विकिपीडिया चा यूजर इंटरफेसचे पर्याय माझ्या पसंती विभागात पूर्वी skin शब्दा करिता आपण त्वचा हा शब्द वापरला होता कदाचित सुलभिकरणाच्या हेतून विकिपीडिया सॉफ्टवेअर मध्ये आता तो appearance असा वापरला आहे.appearance [मराठी शब्द सुचवा] माहितगार ०५:३८, १९ जुलै २०१० (UTC)
सध्याच्या मोनोबुक पेहरावातून विकिपीडीया येत्या काळात vector पेहरावात जाणार आहे.इतर शास्त्रीय संदर्भाने vector करिता सदिश आणि वाहक असे शब्द वापरलेगेले आहेत, तर vector [मराठी शब्द सुचवा] हि विनंती माहितगार ०५:३७, १९ जुलै २०१० (UTC)
  • appearance करिता → पेहराव हा शब्द सुचवत आहे
  • vector → सदिशमान / परिधान

जिमी वेल्सशी झालेली चर्चा

[संपादन]

नमस्कार,

जिमी वेल्सशी झालेल्या चर्चेचा तपशील मी येथे लिहिला आहे.

हलकेच सूचना/संदेश देउन आठवण करुन दिल्याबद्दल संकल्प द्रविड यांना धन्यवाद...नाहीतर हे काम अजून काही दिवस रेंगाळले असते.

अभय नातू १७:४३, १९ जुलै २०१० (UTC)

धन्यवाद , त्यातील मुद्यांवर अधीक चर्चा सर्वांनी मिळून केल्यास छान होईल. माहितगार १५:२२, २१ जुलै २०१० (UTC)

ह्या सहाय्य लेखांच्या भाषांतरास प्राधान्य हवे

[संपादन]

माहितगार १५:२२, २१ जुलै २०१० (UTC)

नेहमी वापरातील दोन साचांच्या नावांत महत्वपूर्ण बदल प्रस्ताव

[संपादन]
(मिडियाविकी:Edittools मध्ये उपलब्ध करून दिलेले ) {{पुनर्लेखन}} आणि {{बदल}} हे दोन नेहमी लागणारे साचे , मी स्वतः बर्‍याच कालावधीने वापरतो त्यामुळे या {{पुनर्लेखन}} नावाचा साचा पुनर्लेखन करण्यास सांगतो असे वाटते- (अशीच अडचण इतरही नवागत सदस्यांची होण्याची संभावना असावी)- पण त्या साचातील मजकुर प्रत्यक्षात अभिप्राय मागत असतो. त्या मुळे सध्याच्या पुनर्लेखन साचाचे नाव बदलून स्वच्छ 'अभिप्रायहवा" असे करावे असा प्रस्ताव ठेवत आहे.
{{बदल}} हा साचा प्रत्यक्षात पुनर्लेखन विनंती करणारा आहे. म्हणून साचाचे नाव "पुनर्लेखन विनंती" असे बदलावे असा प्रस्ताव ठेवत आहे.
बर्‍याच संपादकांकडून आधीच हे साचे वापरात असल्यामुळे आधी या प्रस्तावांना सर्वांचे अनुमोदन आणि सहमती हवी आहे.माहितगार ०६:२७, २२ जुलै २०१० (UTC)

प्रस्तावित बदलास अनुमोदन व सहमती. वि. नरसीकर (चर्चा) ०७:०८, २२ जुलै २०१० (UTC)

मेटावर चालू असलेली आत्तापर्यंतची चर्चा

[संपादन]
opting out request from mr wiki and mr wiktionary -मेटा विकिमीडिया फोरम येथे चालू असलेली चर्चा: मेटाने ग्लोबल सिसॉप मराठी विकिपीडियाकरिता आपल्या विनंती नुसार ऑफ केल्यामुळे काही प्रमाणत अमराठी विकिपीडियन्सच्या दखलंदाजीला रोक लागली असली तरी SWMT हा प्रकार एकुणच कोणत्याही अभ्यासपूर्णतेशिवाय दुसर्‍या विकिपीडियास तुमचा विकिपीडिया लहान आहे आम्हाला तुमची भाषा समजत नसलीतरी आम्ही येऊन संपादने करतो म्हणण्याचा प्रकार आहे.
मागेच अनवधानाने हनुमान माता अंजनीच्या लेखात अंजनीनावाच्या आमेरिकन पॉप सिंगरचे चित्र लावले गेल्याचे माझ्या स्मरणातून जात नाही.त्या करिता मला इंग्रजी विकिपीडियावर अंजनी (हनुमान माता) नावाचा वेगळा लेख निर्मिती करू द्यावी नाहीतर आंतरविकि दुव्यांमधून मराठी विकिपीडियातील अंजनी हनुमान माता लेखात पॉपगायिकेचे समर्थक तीचे चित्र पुन्हा पुन्हा लावत रहाणार असा बाका प्रसंग होता.आणि आपल्याला आपली मराठी मानसिकता,एखादा संघर्ष रस्त्यावर आलाच तर त्याला सांभाळण्याच्या आपल्या मर्यादा माहित असताना, SWMTचे काय फायदे असायचे असोत त्याच्याने होणारे नुकसान नको असे माझे व्यक्तीगत मत आहे.मेटावर अद्यापचालू खालील चर्चा आपल्या माहिती साठी सादर माहितगार ०६:३८, २३ जुलै २०१० (UTC)

Please some one help to communicate SWMT members following decesion of local community level by mr-wiki. Hope & request positive understanding and co-operation in following respect.Mahitgar (He who knows ,wants to know and and loves to keep others informed) 05:12, 16 July 2010 (UTC)

  • We at mr wiki community has been self sufficient in routin patrol of mr wiki and mr wiktionary,(We would still need meta support to controll only inter wiki spammsters ,as and when that happens), We still need support of steward/global sysop/SWMT at our sister projects namely mr wikibooks ,and mr wikiquote ,We wish steward/global sysop/SWMT team avoid edits at mr wiki and mr wiktionary other than those to control interwiki spammers. Mahitgar (He who knows ,wants to know and and loves to keep others informed) 14:54, 6 June 2010 (UTC)
With reference to above discussion we posted a poll at Marathi Languge Wikipedia in above respect at following page : Poll for Opting out of SWMT and Global Sysop Interferance , Opting out proposal has got 5 votes in support and none opposing.Please do the needfull at your earliestMahitgar (He who knows ,wants to know and and loves to keep others informed) 11:13, 14 July 2010 (UTC)
mrwiki has been added to the list of wikis where global sysops do not have access to the tools. For mrwiktionary you will need to discuss there first and then come back; as Laaknor said. Discussions shall be made on each project. Thank you.
--dferg ☎ talk 07:19, 16 July 2010 (UTC)
SWMT members are still editing on mr wiki and we need help in communication them that doing so is not favoured by mr wiki community Mahitgar (He who knows ,wants to know and and loves to keep others informed) 11:59, 16 July 2010 (UTC)
Ehm, sorry; but we can't (and will not) prevent anybody in good standing from editing the projects. That's not possible and won't be done. What we can do is dissabling global sysops from the wikis they've opted out, which has been done. --dferg ☎ talk 14:55, 16 July 2010 (UTC)
Who are editing, and what are they editing? I can't find any SWMT-members that have done any editing they shouldn't have in recentchanges... Laaknor 14:57, 16 July 2010 (UTC)
It is just a question of respecting and communicating a local level policy decesion and indipendance of local wiki to make and respect such decesions.
Kindly do note , probabably we are one of very few wikipedias which has a support/help page for विकिपीडिया:Marathi language support tools for non Marathi Language Wikipedians.But we want always to be ahead in defending principle of our local level indipendance.


In our view the way present SWMT fuctions has no feature of central way of understanding a local wiki.Present situation of SWMT is very much an organised way to proactively open promotion and no bar licence to individuals to edit without having any depth about local wikipedia policies and intrests.
While replying it self I do have an example where as you mention user:Hercule has placed a </nowiki>साचा:Delet</nowiki> tag on a page this is a uncontribution in question Truly where he placed delet template is an additional category page, may be still un-used but was created as part of a specific project.
It is not question that page needs to be deleted or not, the question is said user is not aware of a local project to which that category page is related to.Because simply he has neither checked where the page is linked, nor he would understand what is written on related project page in Marathi languge which he simply does not know.As a local decesion tomorrow we decide to delet that page or no, simply the other person was neither aware of our other project nor he can understand our language.
This is one case but am I( or for that matter other local wikipedians) expected to run behind them at their local local languge wikipedia talk page, his english languge user talk page and then at his meta talk page.And again if I am( means any other marathi fellow ) not fluent in english to explain non Marathi fellow, he will end up asking ten other people asking for support and rather than doing furter constructive work in his own wikipedia spends time in un productive activity of explaning in length.
Besides for an example in this case itself I am fighting alone to get a local decesion implemented.Even local wikipedians are not aware that the discussion has come to this page from earlier informed SWMT talk page.I need to go back and explan back at local central discussion page what we are discussing here. In each of further cases we are going to end up discssing the things at places other than local Marathi Languge Wikipedia,and that is not fun.


All those people who do not have any understang of local community level policies, decesions and langugaes need not interfere even if the things may be done in good standing or any editing they shouldn't have. It is just a question of respecting and communicating this is very much local level decesion and not recent one even for Local mr -wiki has indipendant bot policy.
Besides one of our Indian Sister Languge Hindi has same script as of Marathi Language and even 60% common vocabulory.But still since begining we do have clearcut policies beyond which we do not want edit indulgence from Non Marathi Language wikipedians.We Marathi Languge people culturally are very sensitive on certain aspects and specialy so about the way languge is written and its grammar, explaning certain cultural aspects which may take another book to be written how would accepting non-Marathi interferance may affect local wikipedia negatively at times.
We are opposed to the fact every now and then we/our editors run behind searching a non local wikipedian and spend time in explaining what was right and what was wrong.
We want and have given indipendance to extarnal wikipedians only upto interwikilinks and controlling spamsters who are spamming all the wikis and clearly not beyond.
If Wikimedia Foundation and Meta can realy take care of all our local language wikimedia needs without bothering about local policies and sentiments then,Please do take such a official decesion that local wikipedians do not have right to define local policies and please communicate the same to us, then onwards let others only develop entire Marathi language wikipedia, we will happily resign.
Thanks and regards
Mahitgar (He who knows ,wants to know and and loves to keep others informed) 06:24, 23 July 2010 (UTC)

पानकाढा साचा लावताना आणि लेख वगळताना घ्यावयाची काळजी

[संपादन]
आपण पुन्हा पुन्हा पानकाढा साचा लावत जातो आणि पुन्हा पुन्हा तोच तो लेख पुन्हा निर्माण झाल्याने वगळण्याचे कष्ट आणि वेळ दवडला जातो. किमान २०% पानांच्या बाबतीत तरी येथे काय जोडले तो डावीकडील दुवा तपासावा सहसा दुसर्र्या लेखात चुकीचा दुवा राहून गेल्याचे आढळून येईल. मासिक सदर पान वगळण्याच्या यादीत पाहिले आणि काय जोडलेगेले आहे तपासले तर चक्क मुखपृष्ठ पानाच्या वरच्या टोकावरूनच दुवा दिला आहे.एखाद्या सदगृहस्थाने तेथे काहीच वाचावयास नाही मिळाले आणि उत्पात केला तर त्याचे चुकले कुठे ?
असेच काहिसे सोनाली नावाच्या पानाबाब्त बघीतले, इतरही बर्‍याच पानांच्या बाबत हिच स्थिती आहे.माहितगार १४:३५, २३ जुलै २०१० (UTC)

भाषांतर

[संपादन]
  • Manual pages -

Operating Systems दुवा http://en.wikipedia.org/wiki/Template:Unix-like

  • AIX
  • BSD
  • DragonFly BSD
  • FreeBSD
  • GNU
  • HP-UX
  • IRIX
  • Linux
  • LynxOS
  • Mac OS X
  • MINIX
  • NetBSD
  • OpenBSD
  • Plan 9
  • QNX
  • Research Unix
  • SCO OpenServer
  • Solaris
  • System V
  • Tru64
  • UnixWare
  • VxWorks
  • Xenix
Operating Systems करिता मराठी विकिपीडियावर कार्य़प्रणाली हा शब्द वापरला गेल्याचे दिसते.नरसिकरजींनी ट्रांसलेट विकिवर कार्यन प्रणाली जहा शब्द वापरल्याचे आढळते. इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा येथे कुणी संचालन प्रणाली, कार्यप्रणाली(वापरप्रणाली) हिंदीत परिचालन प्रणाली हे शब्द टाकले आहेत.शब्द भांडारवर: संविधी (संगणन विधी) कार्यकारी प्रणाली/आज्ञावली, व्यवस्थापन आज्ञावली, संगणकाची कार्यप्रणाली हे शब्द सुचवले आहेत.
बाकी वरील बर्‍याच टर्म्स विशेष नामे दिसतात, विशेषनांमाचे केवळ मराठीकरण (लिपीबदल करावे)
उपरोल्लेखीत वर्गातील इंग्रजी विकिपीडियातील सर्व लेखातील सर्व टर्मस ना मराठी नावे हवी असतील तर तसे कळवावे.
माहितगार ०७:१३, ३१ जुलै २०१० (UTC)

वर्णनाचे वर्णन: कोणते कोशिय कोणते अकोशिय फरक कसा सांगावा ?

[संपादन]
एका अर्थाने कोश लेखनात लेख विषयाचे वर्णन असतेच, पण सर्व प्रकारच्या वर्णनांना कोशिय म्हणता येत नाही.जसे प्रवास वर्णने आहेत तसेच काही वर्णनात कथात्मकता दिसते. जसे थोरले बाजीराव पेशवे लेखाचे सद्य स्वरूप कथात्मकता आणि रंजन आहेच, अशा लेखन शैलीस विश्वकोशिय म्हणता येते नाहीच पण त्या पलिकडे एखादे दुसरे संपादक काही भर घालू इच्छीत असतील तर नेमके कुठे बदल करू असे होऊन जाईल.
चंगीझ खान हा लेख सुद्धा ऐतिहासिक व्यक्तीचे चित्रण करते पण यात विश्वकोशिय feel येतो.
एवढ्या प्रदीर्घ अनुभवाने हा फरक आपल्यातील जाणत्या विकिपीडियन सदस्यांना लक्षात येतोच पण विशेषणे टाकू नका हे मार्गदर्शन जेवढ्या सहज पणे सांगता येते तसे वर्णनात्मक लिहू नये असे सरसकट कसे सांगावे ? विश्वकोशीयतेस मंजूर वर्णन आणि ना मंजूर वर्णन यातील फरक नवागत सदस्यांना कसा एक्सप्लेन करावा हे मला सुचत नाही आहे. कुणी सांगू शकेल ?
माहितगार १५:०५, २ ऑगस्ट २०१० (UTC)
वेळोवेळीच्या चर्चांमध्ये हे व इतरही मुद्दे मी तसेच इतर सदस्यांनी मांडलेले आहेत. अजून कोणास काही आठवल्यास भर घालावी.
विश्वकोष लेखांतून वर्णनात्मक मजकूर पूर्णपणे नाहीसा होणे कठीण आहे पण त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काही उपाय --
पुरावा/संदर्भ नसलेले लिखाण काढून टाकावे.
लेखकाचे व्यक्तिगत मत असलेली विधाने बदलून किमानपक्षी third-person करावी - बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. पेक्षा चिमाजीअप्पाला बाजीरावाच्या तुलनेचा सेनापती समजले जाते. हे विधान बरे. दुसर्‍या विधानाला एखाद्या विद्वानाचा संदर्भ देता आला तर अतिउत्तम.
तुलनात्मक मजकूर/विशेषण लावताना मराठी विकिपीडिया विश्वकोष आहे हे लक्षात ठेवावे. गंगेच्या पात्राला महाभयंकर ओढ आहे. हे एखाद्या ऍमेझोन, नाइल किंवा मिसिसिपी पाहिलेल्या माणसाला नक्कीच चूक वाटणार.
मोघम वक्तव्ये (generalizations) बदलावी. मारवाडी/कोब्रा/ज्यू व्यक्ती कंजूष असतात. हे बरोबर नाही. मारवाडी/कोब्रा/ज्यू व्यक्तींना सामान्यतः कंजूष समजले जाते. हे ठीक (पण संदर्भांशिवाय बरोबरच असे नाही.)
व्यक्तिगत/विशिष्ट bias, दृष्टिकोन मजकूराय येऊ देऊ नयेत. स्टालिन/हिटलर/पॉल पॉट हा क्रूरकर्मा होता हे एकांडे विधान लंगडे आहे (जरी जगन्मान्य असले तरीही). स्टालिन/हिटलर/पॉल पॉट यांनी १, २, ३, इ. कृती केल्या.(येथे सविस्तर मजकूर असावा) त्यामुळे त्यांची जगातील क्रूर शासकांमध्ये गणना होते. हे ठीक.
अभय नातू १७:३८, २ ऑगस्ट २०१० (UTC)

विकिकोट

[संपादन]

विकिकोट वर साचे तयार करतांना असे लक्षात आले कि सध्य विकिवर असलेले कोणतेही साचे विकिकोटवर वापरता येत नाही. ह्या साठी काही उपाय योजना करता येउ शकेल का ?

Maihudon ०७:२५, १० ऑगस्ट २०१० (UTC)

पाहिले नाही पण .js आणि .css संबधीत पण गोष्टी असु शकतात तो अस्पेक्टही तपासलेला बरा.,
त्यावर (.js आणि .css ) वेळ खर्चकरण्यापूर्वी नवीन येऊ घेतलेले vector रूपड्याच्या अनुषंगानेच बदल केलेतर कामाची पुनरावृत्ती टळेल.
आणि vector रूपड्याची अमलबजावणीकरिता ट्रान्सलेटविकिवरील usability initiative ची राहिलेली भाषांतरे करून टाकणे एक प्राथमीकता आहे.

माहितगार ०७:५४, १० ऑगस्ट २०१० (UTC)

नवी प्रचालक सुचवणी

[संपादन]
सदस्य मै हि हू डॉन , आणि सदस्य नरसिकरजींनी विकिपीडिया प्रचालकपदाकरिता विनंती करावी असे वाटते . दोघांनाही विकिपीडियातील जबाबदार्‍यांची व्यवस्थित कल्पना आहे असा माझा विश्वास आहे.सोबतच नवीन व्हेक्टर स्किन लवकरच लागू होण्याची शक्यता दिसते , त्याचे कार्यान्वयन सुगमपणे होण्यात या दोघांचे प्रचालक म्हणून योगदान बरे पडेल असे वाटते
प्रसन्नकुमारजींची विनंती आली आहे, आपणासही प्रचालक हवे असतात आहेत पण विकि प्रकल्पांचा आवाका व्यवस्थीत लक्षात येण्यास प्रसन्नकुमारजींना थोडा अवकाश आहे असे वाटते

माहितगार ०६:१८, १७ ऑगस्ट २०१० (UTC)

माहीतगारांच्या सूचनेस अनुमोदन. डॉन व नरसीकरांना प्रचालक होण्यास उपयुक्त पडेल इतपत आवाका माहीत झाला असावा, असा माझाही अंदाज आहे.
प्रसन्नकुमारांनी विकिपीडियावरील विविध पैलूंचा अजून थोडा अभ्यास केल्यावर, त्यांच्या प्रचालकपदासाठी कौल देणे अधिक सयुक्तिक ठरेल, असे माझे मत आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०८:११, १७ ऑगस्ट २०१० (UTC)

प्रचालकपद

[संपादन]

माहितगार यांनी केलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद. मी नरसीकरांची चर्चा पाहिली त्यातील एक वाक्य माझे मराठीचे ज्ञान फक्त ७वा वर्ग पास ईतकेच आहे.(नंतर ईंग्रजी माध्यम.)मी शुद्धलेखनात कमी पडतो.माझ्या त्यात अनेक चुका होतात. नविन शुद्धलेखनाचे नियम मला अवगत नाहीत, माझ्यासाठी सुध्दा लागु होते.

मला स्वत:ला विकि खूप efficient system वाटते व हि system समजुन घेण्यात मला खूप interest आहे. कदाचित प्रचालक झाल्यानंतर मला हि system समजण्यास मदत होइल व सध्या साच्यामध्ये येणार्‍या अडचणी तसेच विविध ब्राउजर्स मध्ये येणारे formating errors मी कदाचीत योग्य रितीने सोडवू शकेल. ह्या कारणासाठी मी प्रचालक होउ इच्छितो.

मी आत्ताच यादी पाहिली त्यात असे जाणवले की सध्या विकि वर २२ सदस्य योगदान करता आहेत व ८ प्रचालक आहेत. त्यामुळे नविन प्रचालकाची गरज आहेका हाच मला पडलेला प्रश्न आहे.

Maihudon ०४:४१, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

कार्यरत प्रचालक

[संपादन]

मराठी विकिपीडियावर ७ प्रचालक आहेत -

  • Kaustubh ‎(प्रचालक) (Created on नोव्हेंबर २७, २००७ at ०२:५५)
  • Mahitgar ‎(प्रचालक) (Created on ऑगस्ट २२, २००६ at ००:३०)
  • Sankalpdravid ‎(प्रचालक)
  • अभय नातू ‎(प्रशासक, प्रचालक)
  • कोल्हापुरी ‎(प्रचालक)
  • श्रीहरि ‎(प्रचालक) (Created on मार्च १०, २००७ at ०३:१७)
  • सुभाष राऊत ‎(प्रचालक)

पैकी श्रीहरी दोन-तीन वर्षांत दिसलेले नाहीत, कौस्तुभही वर्षभर गायब आहे. सुभाष आणि कोल्हापुरी वारंवार लक्ष ठेवून असतात, तर येथे पडीक असलेले म्हणजे संकल्प, माहितगार आणि दस्तुरखुद्द, असे तीनच.

अभय नातू २१:०९, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

प्रचालकपद कौल

[संपादन]

विकिपीडिया:कौल/प्रचालक येथे डॉन व नरसीकर यांना प्रत्येकी सहा पाठिंब्याची मते तर शून्य विरोधी कौल मिळाले आहेत. पुढील ४८ तासांत काही विरोध न झाल्यास या दोन्ही सदस्यांना प्रचालकपद बहाल करण्यात येईल. तरी यावर तुमच्या काही नोंदी, टिप्पण्या असतील तर त्या त्वरित येथे किंवा कौलपानावर कळवाव्यात ही विनंती.

अभय नातू १६:३८, २१ सप्टेंबर २०१० (UTC)


डॉन आणि नरसीकर हे आता मराठी विकिपीडियावरील प्रचालक आहेत.

डॉन, नरसीकर, अभिनंदन आणि वाढीव जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी शुभेच्छा.

अभय नातू अभय नातू ०१:१९, २४ सप्टेंबर २०१० (UTC)

डॉनाचे व नरसीकरांचे अभिनंदन! मराठी विकिपीडियावर आपल्याकडून मोलाची कामगिरी घडावी, अश्या शुभेच्छा!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३६, २४ सप्टेंबर २०१० (UTC)
डॉन आणि नरसीकरांचे अभिनंदन, तुमचे विकिपीडियावरील काम असेच चालू रहावे ही शुभेच्छा! - कोल्हापुरी ०४:३३, २७ सप्टेंबर २०१० (UTC)

आंतरविकि दुवे

[संपादन]

मराठी विकिपीडियावर आंतरविकि दुव्यांची अवस्था दयनीय आहे. बहुधा सर्व वर्गांना आंतर्विकि दुवे दिलेले नाहीत. एखादा सांगकाम्या लावून कोणत्या वर्गांना हे दुवे नाहीत ते तपासता येईल काय?
अभिजीत साठे १९:२५, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

इंग्लिश आंतरविकि

[संपादन]

इतर भाषांतील दुवा माहिती नसताना मराठी विकिपीडियावरील वर्गाला आंतरविकि दुवा लावणे सांगकाम्याला अशक्य आहे. तरीही एखाद्या वर्गाला इंग्लिश (किंवा जर्मन, फ्रेंच, इ. मोठ्या विकिपीडिया भाषांतील) आंतरविकि दुवा दिला असता येथे already कार्यरत असलेले सांगकामे तो उचलतील आणि इतर सर्व आंतरविकि दुवे आपोआप देतील.

अभय नातू २१:०५, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

अभिजीत म्हणतात ते बरोबर आहे. वर्गपानांबद्दल प्रकल्पान्वये काम मराठी विकिपीडियत कमी होते हेही एक कारण आहे. पण तांत्रीक प्राधान्य पहावयाचे झाल्यास साचांचे आंतरविकिदुव्यांना ते सर्वाधीक मिळावयास हवे . साचा निर्मितीत प्रचंड वेळ खर्च होतो , आणि असलेलाच साचा पुन्हा निर्मितीत खर्च होणे म्हणजे उपलब्ध संपादनबळअच्या बाबतीत आधीच दुष्काळ आणि त्यात अधीकचा महिना असे आहे.त्या शिवाय इंग्रजी विकिपीडियावरील महाराष्ट्र, आनी भारतीय संस्कृती संदर्भातील सर्व लेखांना मराठी विकिपीडियात नवीन लेखांची निर्मिती आणि आंतरविकि दुव्यांचे बर्‍यापैकी मोठे किमान दहा एक हजार लेखा संदर्भाने काम प्रलंबीत असावे असा माझा अंदाज आहे.
विशेष:विनाआंतरविकि येथे आंतरविकिदुवे नसलेल्या लेखपानांची यादी सहज मिळते.विशेष:टोकाची_पाने येथील पानेही सहसा आंतरविकिदुवे नसलेली असतात. आंतरविकि दुवे देण्यावर खूप सांगकामे कार्यरत दिसले तरी अभयनी म्हटल्या प्रमाणे त्यांच्या कामाची सुरवात वस्तुतः केवळ संबधीत भाषा जाणणार्‍या विकिपीडियनने पहिला आंतरविकिदुवा नमुदकरून करावयाची असते.कारण बहुसंख्य सांगकाम्यांना फार कमी लिपींची माहिती असते नाही म्हणावयास काही जणांना हिंदी देवनागरी ची ढोबळ कल्पना आलेली असते पण अर्थ अर्थछटा आणि अर्थभेदांचे आकलन होतेच असे नाही,काही सांगकामे डिडक्टीव्ह ऍनालिसीस करून काम करत असतात पण त्यात चूका होऊ शकतात.
त्या शिवाय एखाद्या विकिपीडीयावर एखाद्या विषयास एकही चपलखल लेख नाही म्हणून दुवा चुकीच्या लेखपानात दिला गेल्याच्याही घटना घडतात, किंवा एकाच विषयास वाहून घेतलेले एखाद्या विकिपीडियावर एक पेक्षा अधीक लेख असणे, पुर्ननिर्देशनाच्या विवीध विकिपीडियातील विवीध पद्दहती यामुळे सुद्धा फरक पडतात.
मूळ संकेत सर्वभाषी विकिपीडियांनी इंग्रजी विकिपीडियावर आधी आंतरविकिदुवा द्यावा आणि तेथून सांगकाम्यांनी तो उचलावा असा होता कालांतराने तो विवीध कराणांनी मागे पडला आणि संबधीत भाषेतील लेखातूनच आंतरविकिदुवे उचलण्याकडे कल वाढला.
मी स्वतः मराठी विकिपीडियातील लेखांची निर्मिती करताना बर्‍याचदा इंग्रजी विकिपीडियातून आंतरविकिदुवादेऊन मग मराठी विकिपीडियात इंग्रजी विकिपीडियात करतो पन असे बंधन सर्वांना सर्व कली घालणे योग्य होणार नाही असे वाटते.
मराठी विकिपीडियास सवतःच्या अधीक सांगकाम्यांची/बॉट्स आवश्यकता निश्चित आहे पण आपल्याकडे इतर सुद्धा इअतर प्राधान्य कामे आहेत की सक्रीय सदस्य संख्या हवी तशी वाढत नाही आणि त्या शिवाय तरणोपाय नाही माहितगार ०५:२८, १९ ऑगस्ट २०१० (UTC)
  • किमान जाणकार सदस्यांनी ते लिहीत असलेले लेख त्रुटीरहीत केल्यास व त्यात आवश्यक दुवे दिल्यास किमान विशेष:विनाआंतरविकिया यादीत भर पडणार नाही.कालांतराने, योग्य ते काम करुन या यादीतील कलमांची संख्या कमी करता येईल.अभिजितने एक चांगला मुद्दा उचलल्याबद्दल त्याचे अभिनंदन.

वि. नरसीकर (चर्चा) ०५:५०, १९ ऑगस्ट २०१० (UTC)

मोहनदास करमचंद गांधी :

[संपादन]

मोहनदास करमचंद गांधी : स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी १) १९४६ मधील ब्रिटिश कॅबिनेट मिशनच्या शिफारशी नामंजूर करण्याची सूचना गांधीजींनी काँग्रेसला दिली. या शिफारशींमधील मुस्लिम बहुसंख्य राज्यांच्या एकत्रीकरणाबद्दल गांधीजी साशंक होते.

मृत्यू २) ३० जानेवारी १९३० ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यांचा मारेकरू नथुराम गोडसे हा एक पुरोगामी हिंदू होता

वरील दोन वाक्य थोडी विसंगत आहेत.... गांधीजींचा मृतू जर १९३० ला झाला तर त्यांनी १९४६ ला ब्रिटिश कॅबिनेट मिशनच्या शिफारशी नामंजूर करण्याची सूचना कशी दिली? माझ्या मते माहितींमध्ये काहीतरी चूक असण्याची शक्यता आहे.....

माझे नाव : शामल

माहिती बदलली. विसंगती दाखवल्याबद्दल धन्यवाद.
अभय नातू १४:५६, ३१ ऑगस्ट २०१० (UTC)

भारतीय पक्ष्यांची यादी

[संपादन]

पक्ष्यांच्या श्रेणी आणि कुळ नुसार अद्ययावत भारतीय पक्ष्यांची यादी आता उपलब्ध झाली आहे. यात १२५१ पक्ष्यांच्या समावेश असून यातील अनेक पक्षी महाराष्ट्रात / मध्य भारतात आढळतात आणि त्यांची मराठी नावे उपलब्ध आहेत. मात्र इतर अनेक पक्षी ज्यांची मराठी नावे नाहीत अशांसाठी फक्त लॅटीन आणि इंग्रजी नावे ठेऊन पूर्ण यादी तयार करावी का, या बद्दल ही चर्चा. ही यादी पक्ष्यांच्या डी.एन.ए. चाचणीनुसार आणि आंतरराष्ट्रीय यादीस धरून तयार करण्यात आलेली आहे. यात जुनी प्रचलीत नावे बदलली आहेत तसेच पक्ष्यांच्या श्रेणी आणि कुळ यातही बदल झालेले आहेत. मी यातील प्रत्येक पक्ष्याचे मराठी नाव शोधण्याचा प्रयत्न करीत आहेच, तोपर्यंत वरीलप्रमाणे लेख असावा का? gypsypkd (चर्चा) ०५:२०, ७ सप्टेंबर २०१० (UTC)

बरेच मोठे काम हाती घेतले आहे. सगळी नावे मिळेपर्यंत लेख असल्यास्थितीत ठेवावा. शक्यतो कामचालू साचाही लावावा.
अभय नातू १५:४१, ७ सप्टेंबर २०१० (UTC)

साचा:विस्तार

[संपादन]

मी सध्या विस्तार साच्यात एक् बदल केला आहे. सध्या साचा आपण {{विस्तार}} असा वापरतो व ज्या पानावर वापरले आहे ते पान वर्ग:विस्तार विनंती मध्ये जाते. जर एखादे पान समजा फुटबॉल वर आपल्याला हा साचा वापरायचा असल्यास आपण {{विस्तार}} किंवा {{विस्तार}} अश्या प्रकारे वापरू शकतो व त्यामुळे फुटबॉल पान वर्ग:विस्तार विनंती किंवा वर्ग:खेळ विस्तार विनंती वर्गात जाईल. ह्याचा उपयोग विस्तारासाठी योग्य आराखडा करण्यासाठी होउ शकेल.

तसेच माझा एक प्रश्न आहे कि समजा वर्ग:महिला टेनिस खेळाडू ह्या वर्गात काही किंवा सर्व खेळाडूंच्या पानावर जर {{विस्तार}} साचा वापरला असेल तर bot चा वापर करून आपण {{विस्तार}} किंवा {{विस्तार}} असा बदल करू शकतो का ?

Maihudon १०:३५, ७ सप्टेंबर २०१० (UTC)

अभय नातु यांचा सांगकाम्या रिकाम्याने खूप जलदगतीने उत्तम काम केले, त्यांचे अभिनंदन. वर्ग:विस्तार विनंती मध्ये अनेक लेख आहेत. त्याचे वर्गीकरण जर आपण अश्यारितीने करू शकलो तर नक्कीच आपण विकि विस्ताराचा एक उत्तम आराखडा आखु शकतो. वर्गीकरण साधे व सुटसुटीत असावे ह्या साठी सगळ्यांच्या सहभागाची / सूचनांची सध्या गरज दिसते आहे. सध्या साठी माझा असा विचार आहे कि आपण खालिल प्रकारे वर्गीकरण करू शकतो.

  • वर्ग:विस्तार विनंती
    • खेळ विस्तार विनंती
      • खेळाडू विस्तार विनंती
        • टेनिस खेळाडू विस्तार विनंती
        • क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
      • स्पर्धा विस्तार विनंती
      • खेळ इतर
    • उदाहरण १ (चित्रपट)
      • अभिनेते (उपवर्ग)
      • अभिनेत्री (उपवर्ग)

ह्या प्रकारे आपण ज्या सदस्याला ज्या विषयात रस आहे त्यातील सर्व विस्तारण्याजोग्या लेखांची माहिती एका जागी देउ शकतो. Maihudon ०७:०२, ८ सप्टेंबर २०१० (UTC)

वर्ग : विस्तार विनंती

[संपादन]

सध्या मराठी विकिवरील लेखांची संख्या ३०,८२५ आहे व वर्ग:विस्तार विनंती मधील लेखांची संख्या १३,२४२ आहे म्हणजे जवळजवळ ४०%. सध्या वर्गातील लेखांना वर्गीकरणाची गरज आहे. सांगकाम्या रिकाम्या हे काम फार उत्तम रितीने तसेच जलद करत आहे. मी माझ्या समजुतीनुसार काही बदल रिकाम्या कडून करून घेतले आहेत. परंतु ह्या वर्गात असणार्‍या लेखांना वर्गीक्रुत करण्यासाठी सर्वांच्या सहभागाची गरज आहे. ह्याचा उपयोग जर पहायचा असेलतर दालन:क्रीडा मधील तुम्ही काय करू शकता हे सदर पहावे, इथे इच्छुक सदस्याला आपण एकाच ठीकाणी विस्तारण्या जोग्या लेखांबद्दल माहिती देउ शकतो. अश्या प्रकारे आपण ह्या वर्गीकरणाचा फायदा करून घेउ शकतो.

ह्या साठी सर्वांच्या आक्रमक सहभागाची गरज दिसते आहे

Maihudon ०६:३०, १५ सप्टेंबर २०१० (UTC)

देवनागरी टंकन मदत

[संपादन]

i have checked the box above for devnagri but the marathi language is not appearing.when i type in the search box,only English letters appear. previously, when i checked the box, Devnagri appeared. can anyone help me getting out of it? ruchika

  1. मी आतासुद्धा मराठी विकिपीडियाची उपलब्ध देवनागरी टंकन पद्धत वापरूनच टंकन करत आहे आणि ते माझ्याकरिता व्यवस्थीत कामकरित आहे.
  2. आपण संगणक प्रणालीची पूर्ण कल्पना नसल्यास दुसर्‍या एखाद्या संगणकावरून प्रयत्न करून पहा.
  3. आपल्याला ब्राऊजर म्हणजे काय माहित असल्यास , तो कोणता ते सांगा अधीक सहाय्य सांगणे सोपे जाईल. कॅश म्हणजे माहित असल्यास आपल्या ब्राऊजरची कॅश रिकामी करून पहावी बहूधा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावयास हवा.
  4. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यास अथवा न झाल्यास दोन्हीही केस मध्ये आपला प्रतिक्रीया प्रार्थनीय आहे.

माहितगार ०५:४७, १० सप्टेंबर २०१० (UTC)

why the pages are opening so slowly?

[संपादन]

Anurag N.

तुमच्या संगणक आणि इंटरनेट कनेक्शनचा स्पीड कमी झाला नाही आहे याची खात्री करून घ्यावी.काही वेळा कोणतीही वेबसाईट भेट देणार्‍यांची संख्या त्याच्या मर्यादेपलिक्डे वाढल्यास लोड कमी होईपर्यंत मंदगती होऊ शकतात.विकिपीडियाची वेगाबाबतीतला परफॉर्मन्स ९९% पेक्षा अधिक काळ पूर्ण कार्यक्षमतेने काम करतो,तरीपण विकिपीडिया हि जगातील सर्वाधिक भेट दिल्या जाणार्‍या वेबसाईटस पैकी आहे त्यामुळे असे प्रॉब्लेम तात्पूरत्या काळाकरिता भेडसावू शकतात, असा प्रॉब्लेम आल्यास सहसा विकिपीडीयाच्या सहप्रकल्पांना भेट देऊन पहा तीथे सुद्धा वेग मंदावला असल्यास काही कालावधी थांबून नंतर विकिपीडियास पुन्हा भेट द्या माहितगार ०५:४७, १० सप्टेंबर २०१० (UTC)

मुंबई भेट

[संपादन]

मुंबई विकिपीडियन भेट: २० सप्टेंबर २०१०, सायंकाळी ०६.३०, वांद्रे - w:en:Wikipedia:Meetup/Mumbai/Mumbai1. 61.8.139.218 २०:१६, १३ सप्टेंबर २०१० (UTC)

कृपया , नाव लिहा संपर्क करणे सोपे जाईल.माहितगार ०५:२९, १४ सप्टेंबर २०१० (UTC)

सहमती हवी

[संपादन]
Wikipedia Meetups करिता इंग्रजी विकिपीडियात सध्या "विकिपीडिया मिलन" असा शब्दप्रयोग केला आहे. मराठी विकिपीडियात सध्या "विकिभेट" असा शब्द प्रयोग आहे. सर्वांना अधीक सुगम आणि सुलभ शब्द प्रयोग कोणता वाटतो ते लवकरात लवकर नमुद करा कारण संबधीत पानांच्या शीर्षके लवकरात लवकर बनवणे जरूरी आहे माहितगार ०८:४३, १४ सप्टेंबर २०१० (UTC)
विकिपीडिया मिलन या हिंदी वाटणार्‍या शब्दप्रयोगापेक्षा विकिभेट हाच शब्दप्रयोग जास्त मराठी तसेच सुलभही वाटतो.
अभय नातू १४:३४, १४ सप्टेंबर २०१० (UTC)
बरोबर. 'भेट' या शब्दाची अर्थच्छटा नेमक्या अर्थाची असल्याचे तोच आपल्याकडे वापरावा. आपल्याकडे मीलन या शब्दाचा शब्दश: अर्थ सर्वसाधारण भेटणे, मिसळणे असा असला, तरीही बर्‍याचदा त्याला प्रेमा-बिमाच्या संदर्भात किंवा जीवशास्त्रीय परागीभवन अथवा फलनाच्या संदर्भात वापरायचा कल सध्या दिसतो. त्यामुळे 'भेट' हा शब्दच चपखल वाटतो.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०९, १४ सप्टेंबर २०१० (UTC)

Wikimedia India Community Newsletter - 2010 September

[संपादन]
  • First edition of Wikimedia India Community Newsletter -

2010 September

अभिनंदनीय वृत्तपत्रिका!

[संपादन]

नुकत्याच म्हणजे जून २०१० मध्ये झालेल्या विकिमीडिया इंडिया शाखेच्या नोंदणीनंतर आणि विकिपीडियाचा संस्थापक जिमी वेल्साच्या भारतभेटीनंतर चालू झालेला हा उपक्रम दक्षिण आशियाई विकिपीडियांसाठी खूप उपयोगी ठरेलसा वाटतो. अन्य भाषक विकिपीडियांकडे राबवले गेलेले काही उपक्रम किंवा तत्सम कल्पना मराठी विकिपीडियावर राबवता आल्या तर बरे होईल. वृत्तपत्रिकेच्या सप्टेंबरातल्या अंकात जाहीर झालेले काही मुद्दे चिंतनीय आहेत :

  • बंगाली विकिपीडिया व बंगाली विकिसोर्स प्रकल्पांनी या वर्षी बंगाली वृत्तपत्र माध्यमांतून आपल्या कामाची व्याप्ती आणि माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचे जोरदार प्रयत्न केल्याचे दिसते. (पान क्र. १२)
  • मल्याळम विकिपीडियाने प्रारंभीपासून लेखांच्या गुणवत्तेवर भर देण्याची कार्यसंस्कॄती घडवली. अगदी आरंभीच्या काळातील सदस्यांनी ही कार्यसंस्कॄती व तिचे फायदे नवागत सदस्यांना हस्तांतरित केल्यामुळे मल्याळम विकिपीडिया खोलीच्या मानकानुसार आजघडीला जगात दुसर्‍या क्रमांकावर असून सर्व दक्षिण आशियाई विकिपीडियांमध्ये सर्वाधिक संपादने व आशयघनता असलेला विकिपीडिया आहे. त्यांनी विविध विषयांवर दालने/प्रकल्प चालवले असून, त्यामुळे विविध विषयांवरील लेख घडवले जाण्याची व सहयोगी तत्त्वावर कामे चालण्याची कार्यसंस्कॄती बनल्याचे चित्र दिसते (पान क्र. १९). अ़जून एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे १७ एप्रिल इ.स. २०१० रोजी केरळातील एर्नाकुलम येथे झालेल्या विकिभेटीस ८० सदस्य उपस्थित होते (पान क्र. २०). मल्याळम विकिप्रकल्पांना एवढा भक्कम प्रतिसाद मिळतोय, ही कौतुकास्पद आणि आपल्यासाठी अनुकरणीय बाब आहे (इथे एक विरोधाभास नोंदवावासा वाटतो : मराठी विकिपीडियावर आणि अन्य बंधुविकिप्रकल्पांवर गेली पाचेक वर्षे जेमतेम ८-१० सदस्य सातत्याने सक्रिय आहेत.).
  • तमिळ विकिप्रकल्पांनी तमिळ भाषक संमेलनांचा प्रकल्पप्रसारासाठी कल्पक वापर केल्याचे दिसते, एप्रिल इ.स. २०१० मध्ये झालेल्या जागतिक अभिजात तमिळ संमेलन व तमिळ इंटरनेट संमेलन यांच्या निमित्ताने त्यांनी जनजागृतीसाठी माहितीबूथ व लेखस्पर्धा असे उपक्रम आयोजले होते (पान क्र. २३, २४). विशेष म्हणजे तमिळनाडू राज्यशासनाने तमिल विकिप्रकल्पांसोबत त्यांचे सहाअयोजन केले (मराठी विकिप्रकल्पांसाठी महाराष्ट्र राज्यशासनासोबत खरोखरीचा परिणामकारक सहयोग होऊ शकेल का?).
  • तेलुगू विकिप्रकल्पांनी जनजागृतीसाठी हैदराबाद व विजयवाड्यातल्या पुस्तकप्रदर्शनांचा व्यासपीठ म्हणून वापर केला. तसेच आंध्रप्रदेशातील अन्य तीन शहरांमध्ये गेल्या दीडेक वर्षांमध्ये त्यांनी विकिअकादम्या (म्हणजे बहुधा कार्यशाळेसारख्या) चालवल्या आहेत (पान क्र. २५, २६).

मराठी विकिप्रकल्पांना यातून बोध घेऊन विकासासाठी काही उपक्रम राबवता येतील.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:२७, २५ सप्टेंबर २०१० (UTC)

मल्याळम विकिचे श्री.षिजू अलेक्स यांच्याशी माझे अशात दूरध्वनीवरून संभाषण झाले.त्यांनी मल्याळम विकिपीडियाची ऑफलाईन सिडी काढून वितरीत केल्याचा सक्रीय लेखक आणि लेखन वाढण्यात प्रत्यक्ष फायदा झाल्याचे सांगितले.दक्षीणेत सर्व भाषी विकिपीडियांनी कार्यशाळा आयोजित केल्याचे नमुद केले, पण सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात कामकरणार्‍या स्थानिक विकिपीडीयन्सनी प्रॉजेक्टर , लॅपटॉप व इंटरनेट डाटाकार्ड इत्यादी उपलब्ध करून दिल्यामुळे आणि फिल्डवर्कलातयार असलेल्या स्वयंसेवी विकिपीडीयन्समुळे हे घडू शकले आहे.त्यांच्या सुरवातीच्या विकिभेटींना जेमतेम पाचेक लोकांची उपस्थिती असे पण विकिभेटीतील सातत्यामुळे हि उपस्थिती वाढत गेल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.माहितगार ०७:४२, २६ सप्टेंबर २०१० (UTC)
मराठी विकिपीडियावरही दर्जा वाढवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. लेखसंख्या आता चांगल्यापैकी आहे त्यामुळे नवीन रिकामे लेख वाढवण्यापेक्षा असलेल्या लेखांमध्ये जास्त माहिती घालणे, त्यांचे परीक्षण (review) करणे, या गोष्टींना महत्त्व देणे गरजेचे आहे. नवीन सदस्य आल्यावर त्यांना नवीन लेख तयार करण्याऐवजी जुन्या लेखांत बदल करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी काहीतरी उपक्रम जाणीवपूर्वक राबवायला हवा. - कोल्हापुरी ०४:२५, २७ सप्टेंबर २०१० (UTC)
कोल्हापुरी यांच्या दर्जाबाबतच्या मुद्द्याशी सहमत. कुठलाही नवा लेख तयार करताना किमान इतक्या कॅरॅक्टर्सचे कंटेट त्यात असतील तरच तो नवा लेख म्हणून जतन केला जाईल अशी तांत्रिक सुविधा निर्माण करता येईल, असे वाटते. असे झाले तर रिकामे लेख तयारच होणार नाहीत. सदस्यात नवा आणि जुना असा भेद त्यासाठी केला जाऊ नये. त्याने परस्परसंबंधांच्या नव्या समस्या पुढे येतील तसेच नव्यांच्या सहभागावर परिणाम होऊ शकतो असे वाटते. -मनोज २३:१८, १ ऑक्टोबर २०१० (UTC)
विकिमीडियावरील सांख्यिकीत alternate count हा एक रकाना असतो. त्यात कमीतकमी २०० वाचनीय अक्षरे (विकिकोड, मथळे, साचे, इ. सोडून) असल्यास लेख धरला जातो.
नवीन व जुन्या सदस्यांत भेद करण्यास कारण म्हणजे अनेकदा उपद्व्यापी गृहस्थ, मराठी जाणणारे अथवा न जाणणारे, येताजाता पानांवर घाण करुन जातात. अशावेळी ती घाण उपसणे ही जुन्या सदस्यांना डोकेदुखी ठरते. असे असूनही नवीन सदस्यांना सगळ्या मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या जाताता. काही प्रगत (किंवा जास्त impact असणार्‍या), जसे स्थानांतरण, इ. सुविधा सदस्य दहा दिवस जुना झाल्यावर आपोआप मिळतात.
अभय नातू ०५:५९, २ ऑक्टोबर २०१० (UTC)

help please

[संपादन]
  • माझे मत शंका सूचना सहाय्य विनंती:

I need help on an incident and have a query related to that

- Somebody has redirected राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा २०१० page (a new page by me) to a page titled २०१० राष्ट्रकुल खेळ . What I DO NOT understand is this : the text I'd written here is CUT and Pasted at a place on the page २०१० राष्ट्रकुल खेळ without my name in contribution HISTORY of that page. Now if it is decided to delete page राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा २०१० (and I am sure it will be, as there should not be two articles on one subject.) there will be no trace available on my account contribution history that can show I'd contributed that part. This is, I am afraid, an injustice. What Should I do and What Wikipedia Marathi officials can do for it? Please help and Guide.

- When I searched topic before starting new page राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा २०१०, Only a page titled राष्ट्रकुल खेळ Was there, as far as I remember. Can SOMEBODY keep pages away from site search? or this is an issue with the Marathi search? Thanks. - मनोज १८:३१, २६ सप्टेंबर २०१० (UTC)

हे पहा - [१]
अभय नातू १७:३९, २७ सप्टेंबर २०१० (UTC)

पाहिले. पण राष्ट्रकुल क्रिडास्पर्धा २०१० चे (याला सोयीसाठी पान अ म्हणूया) पान तुम्ही दाखवताय मुळात ते आर्टिकलच आता २०१० राष्ट्रकुल खेळ (याला सोयीसाठी ब म्हणूया)इकडे पुननिर्देशित केलेय केलेय. एवढेच नाही, तर कुणीतरी अ वर मी लिहीलेला मजकूर घेऊन तो ब वर चिकटवला.(आता या प्रकाराला अनेक वाईट नावे आहेत, पण ते असो.)पण त्यामुळे बच्या इतिहासात माझ्या योगदानाची नोंद नाही. आणि अ हे पान आताच कोरे केलेय. काही दिवसांनी सर्वसहमती घेऊन ते काढूनही टाकले जाऊ शकते (असली कोरी पाने केवळ रिडायरेक्टसाठी विकिपीडीयाने का सांभाळावीत?). अशा वेळी माझ्या योगदानाची नोंद कुठेच राहणार नाही. हाच माझा मुद्दा वर पुरेशा स्पष्टपणे मांडला आहे. तुम्ही दुवा दिलेले नाव अ च्या इतिहासात आहे, हे मला आधीपासून माहिती आहे. पण ब च्या इतिहासात (माझा मजकूर वापरूनही) माझे नाव नाही. आणि अ फारकाळ राहण्याची शाश्वती नाही. अशावेळी योगदानाची नोंद कुठेच न राहाणे हा अन्याय नाही का? यात मदत कशी करणार? - मनोज १८:५५, २७ सप्टेंबर २०१० (UTC)

१. "तुमचा" मजकूर घेउन कोणीतरी दुसरीकडे चिकटवला नाही तर या पानाचे स्थानांतरण झाले. म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही तयार केलेल्या पानाचे शीर्षक बरोबर वाटले नाही (याला अनेक कारणे असू शकतात) म्हणून त्याने त्याचे शीर्षक बदलले. तुम्हाला याबद्दल आक्षेप असेल तर त्या पानाच्या चर्चा पानावर किंवा चावडीवर शीर्षकाबद्दलचा मुद्दा मांडा व त्या व्यक्तीशी संवाद साधा.
२. तुम्ही येथे लिहिलेल्या मजकूरावरील हक्क, दावे, इ. मजकूर साठवल्याक्षणी सोडता. म्हणजे तुम्ही लिहिलेला मजकूर हा कोणीही, कधीही, कसाही बदलू शकतो हे तुम्ही मान्य केलेत. मग अन्याय वगैरे कसा होतो?
३. अनेकदा एकच पान अनेक प्रकारे शोधले जाऊ शकते. अशा वेळी सगळ्यात उचित शीर्षक ठेवून इतर नावांकडून पुनर्निर्दशन ठेवले तर वेगवेगळ्या शीर्षकाची अनेक पाने तयार होत नाहीत. तसेच शोधतानाही ते पान सापडण्याची शक्यता वाढते. सहसा पुनर्निर्देशनाची पाने काढली जात नाहीत.
अभय नातू १९:५०, २७ सप्टेंबर २०१० (UTC)
सहसा पुनर्निर्देशनाची पाने काढली जात नाहीत हे आपण स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद. माझा मुद्दा मजकुरावरील दाव्याबाबत नाही, तर योगदानाच्या नोंदीबद्दल आहे. कारण या नोंदींचा उल्लेख वैयक्तिक कामगिरी सांगताना केला जातो हे मी वाचले आहे. पदे आणि स्टार वैगरे देतानाही (माझ्याबाबत याची शक्यता आता अंधुकच आहे) आणि वाद होतात त्यावेळी अनुभवाचा आवर्जुन उल्लेख केला जातो हेही मी पाहिले आहे- मनोज ०२:१३, २८ सप्टेंबर २०१० (UTC)
काही अपवादात्मक स्थिती वगळता माझे योगदान येथे सुद्धा आपल्या योगदानाची नोंद असते.माहितगार ११:०४, २८ सप्टेंबर २०१० (UTC)
म्हणजे एखादे पान विकिपिडियावरून काढले (वगळले- डीलिट केले)तरीही त्यावरच्या योगदानाची नोंद माझे योगदान येथे दिसत राहाते? तसे असेल तर ही माझ्यासाठी नवी माहिती आहे आणि माझ्या वरच्या मुद्द्याचे समाधान करणारी आहे, माहितगारजी. -मनोज ०८:५३, २९ सप्टेंबर २०१० (UTC)
सदस्य:मनोज,कोणतीही शंका माझ्या दृष्टीने लहान नाही, आपल समाधान होईल अशा पद्धतीने सविस्तर माहिती पुरवणे मला जरूर आवडेल. खासकरून What Wikipedia Marathi officials can do for it?मधील Marathi officials या अनुषंगाने इतर माध्यमांनीही माहिती मागितली,ह्या दृष्टीने माझा सविस्तर माहिती लिहिण्याचा मनोदय आहे. खरेतर Wikipedia officials अशी कोणतीही संकल्पना अस्तीत्वात नाही. एका अर्थाने विकिपीडियाला विकिपीडिया एवढाच चेहरा आहे समुदाय किंवा घटकांना एक विशीष्ट चेहरा नाही.जी काही थोडी माहिती मिळते किंवा मिळविली जाते त्याचे अन्य उद्देश आहेत.आणि त्या बद्दल लिहिण्याकरिता मला अधीक कालावधी लागेल.माहितगार १०:४४, १ ऑक्टोबर २०१० (UTC)

कोशलेखन

[संपादन]

विकिपीडियावर लेखन कसे करावे याबाबतच्या वेगवेगळ्या पानांवरच्या सूचना वाचताना एक बाब प्रकर्षाने लक्षात येते. ती म्हणजे कोशलेखनाचा अनुभव असणारांची संख्या सदस्यांत अल्प असावी किंवा नसावीच. वास्तविक कोशलेखन ही प्रस्थापित ज्ञानशाखा आहे. मराठीतही कोशलेखन विपुल झाले आहे. त्याची मूलभूत तत्वे आणि प्रमाणित पद्धती आहेत. भाषेचा डौल सांभाळून अर्वाचीन मराठीतही त्यानुसार उत्तम लेखन करता येऊ शकते. विकिपीडियासारख्या ज्ञानकोशासाठी कोशलेखकांचे साह्य घेता येईल. विशेषतः मुंबई आणि पुणे शहरांतल्या विकिकरांना त्यासाठी प्रयत्न करता येतील. इंग्लिश विकिपीडियावर अशी कोशलेखनाची प्रमाणित पद्धत वापरून अत्याधुनिक ज्ञानशाखांबाबतही पाने लिहीली गेली आहेत, हे मी वाचतो. मराठीत हे करणे अशक्य ठरू नये. -मनोज ०५:०४, ३० सप्टेंबर २०१० (UTC)

सदस्य:मनोज , आपण समस्येची मेख बरोबर ओळखलीत,(आधीच लेखकांची उणीव त्यात,उपलब्ध सदस्यांना, काही शंकाचे शंका निरसन करण्यास वेळ लागतो अथवा प्राधान्य देणे इच्छा असूनही अवघड होते हे समजून घ्यावे हि या निमीत्तने नम्र विनंती).
विकिपीडियावर प्रत्येक व्यक्तीकडून ज्ञानाचे कण गोळाकरण्याचे आपण प्रयत्न करतो, ज्या समाजात कोश म्हणजेच पुरेशा प्रमाणात माहित नाही तेथे कोशलेखनाची मूलभूत तत्वे आणि प्रमाणित पद्धती आधी पासून माहित असणे अवघड आहे. आपण म्हणाला त्या प्रमाणे किमान सूचना लिहिण्याचा थोडा फार प्रयत्न झाला आहे.
कोशलेखनाची मूलभूत तत्वे आणि प्रमाणित पद्धती च्या माहिती बद्दल मराठी विकिपीडियावर आपण अधीक भर टाकू शकल्यास प्राधान्याने हवी आहे. कोशलेखकांच्या सहाय्याचे स्वागतच असेल. आणि आपण म्हणता तसे प्रयत्न करता येतील या मताशी मी सहमत आहे. माहितगार १०:५६, १ ऑक्टोबर २०१० (UTC)
पहिल्या वाक्यातील प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मनोज १९:१५, २ ऑक्टोबर २०१० (UTC)

संपादन, पुनर्लेखनाची यादी

[संपादन]

संपादन, दुरुस्त्यांसह प्रमाणलेखन, कोशीय भाषेत लेखन याची गरज असलेले लेख एकत्र कुठे पहायला मिळतील? मिळतील? यापुढे मी गोष्टींवर अधिक लक्ष द्यावे असे वाटते.त्याची गरज आहे किंवा कसे हेही प्रचालकांनी सांगावे. सर्वांकडून सूचना, माहिती आणि मदत अपेक्षित आहे.मनोज १९:१२, २ ऑक्टोबर २०१० (UTC)

मराठी विकिपीडिया मेलिंग लिस्ट

[संपादन]

नमस्कार!

विकिमीडिया मेलिंग लिस्ट पानावर दिलेल्या अन्य विकिपीडियांवरील मेलिंग लिस्टांप्रमाणे मराठी विकिपीडियासाठी नवीन मेलिंग लिस्ट कशी बनवायची, याबद्दल कुणाला काही माहीत आहे काय?

मराठी विकिपीडियासाठी नवीन मेलिंग लिस्ट बनवण्याची उद्दिष्टे :

  • नियमितपणे विकिपीडियावर अथवा चावडीवर चक्कर टाकू न शकणार्‍या सदस्यांना त्यांच्या मेलबॉक्सात इथल्या घडामोडींविषयी किंवा अन्य महत्त्वाच्या घडामोडींविषयी माहिती पोचवणे.
  • मध्यंतरी मराठी विकिपीडियासाठी ऑर्कुट कम्युनिटी चालू केली होती; परंतु ऑर्कुट कम्युनिटीच्या पानावर अथवा खुद्द ऑर्कुटावर सदस्यांना नियमित यायला जमतेच असे नाही. हीच अडचण फेसबुक किंवा अन्य ठिकाणच्या समुदायांसाठीही येऊ शकते. मात्र आपापले मेलबॉक्स तपासण्याची वारंवारता तुलनेने अधिक असते.

मल्याळम, तमिळ, इंग्लिश वगैरे विकिपीडियांच्या सदस्य समुदायांनी या मेलिंग लिस्ट सुविधांचा वापर लक्षणीय प्रमाणात केल्याचे दिसते. मराठी विकिपीडियनांनीही या सुविधेचा उपयोग करून घ्यायला हवा. ही सुविधा कशी सुरू करावी, याबद्दल मला माहिती हवी आहे. कुणाला माहीत असल्यास, कृपया इथे नोंदवावी.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:५४, ४ ऑक्टोबर २०१० (UTC)

इतर बरेच भाषिक विकिपीडियन विकिमिडीयाची मेलिंग लिस्ट वापरतात हे खरे असले तरी, अभय नातुंनी सुरू केलेली याहू(ग्रूप्)वरील मेलिंग लिस्ट पुरेशी कार्यरत आहे.मी विकिमिडीयाच्या इंडिया मेलिंग लिस्टवर आहे.तेथील बरेच लोक मराठी विकिपीडियनांनी विकिमिडीयावर मेलिंहग लीस्ट सुरू करावी असा आग्रहही करतात परंतु आतापर्यंत मला तशी इच्छा झाली नाही याची बरीच कारणे परंतु यूजर फ्रेंडली नेस आणि विवीध सुविधांच्या (Poll,Calender,file attachments आणि अधीक) बाबतीत तसेच सर्व उपलब्ध मेलिंग लिस्ट प्रकारात याहू(ग्रूप्) मला तरी खूप उजवी वाटत आली आहे.विकिमिडीया सारखी मेलिंग लीस्ट तांत्रीकज्ञान दृष्ट्या सक्षम आणि त्या दृष्टीने इनिशीएटीव्ह असलेल्या लोकांना ठिक आहे, पण सर्व सामान्यांना याहू फेसबुक हे सोपे आहेत.फेसबुक ग्रुपवर कुणी असेल तर त्यांना कार्यक्रम इव्हेंट त्यांच्या इमेल बॉक्स मध्ये पोचती करता येते.

शिवाय विकिमिडीयाची मेलिंग लिस्ट वापरावयाचीच झाल्यास उपयोग सुलभतेकरिता त्याचे सर्व संदेश ट्रांसलेट चविकिवर जाऊन भाषांतर पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याचे गरज पडेल.

माहितगार १०:१४, ४ ऑक्टोबर २०१० (UTC)

मला वाटते याहू मेलिंग लिस्ट बरीच बद्ध यंत्रणा ठरते. कारण याहूग्रुप लॉगिन व त्या मेलिंग ग्रुपाचे सदस्यत्व असल्याशिवाय तुम्हांला तिथले ईमेल वाचतादेखील येत नाहीत. तुलनेने विकिमीडिया मेलिंग लिस्ट खुली (वाचनासाठी) असते; त्यामुळे अन्य भाषक विकिपीडियनांबरोबर सहकार्य करणे/मागणे/देणे सोपे ठरते. खेरीज लोक विकिमीडिया मेलिंग लिस्ट पोर्टलावर कधीतरी गेले, तर त्यांना इतर मेलिंग लिस्टांवर काय चालले आहे, तेही पाहायची संधी लाभते... माझ्या मते त्यामुळे अन्य विकिपीडियांवरील उत्तमोत्तम गोष्टी समजण्यास उपयोगच होईल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:३८, ४ ऑक्टोबर २०१० (UTC)
एकापेक्षा जास्त मेलिंग लिस्ट असल्यास गोंधळ होण्याचा संभव जास्त आहे.
याहू ग्रूपवरील चर्चा सर्व (याहू सदस्य नसलेल्याही) वाचकांना खुली करता येते.
याहू सदस्यत्व नसतानाही याहू मेलिंग लिस्ट/ग्रूपचे सदस्य होता येते.
अन्य भाषकांसाठी मराठी विकिपीडियावरील सदस्यांशी संवाद साधण्यासाठी मेलिंगलिस्ट व्यतिरिक्त इतर मार्ग (चावडी, दूतावास), इ. आहे. या मार्गांनी आलेल्या संदेशांना लगेच उत्तर दिले जाते.
विकिपीडिया मेलिंग लिस्ट वापरण्यासाठी आपल्यांपैकीच (आधीच तोकडे असलेले) resources वापरावे लागतील.
असे असता विकिपीडिया मेलिंग लिस्टच्या फंदात पडू नये असे माझे मत आहे.
अभय नातू १६:३०, ४ ऑक्टोबर २०१० (UTC)
याहू मला हल्ली कमी आवडण्याचे कारण वेगळे आहे ते म्हणजे याहू सुविधा मराठीत उपलब्ध नाहीत तरी सुद्धा एकुण सुविधांचा फायदा पहाता याहूग्रूप खूपच उजवे ठरते,सध्या आपल्या याहू ग्रूप मेलिंग लिस्टवरील इमेलचा सब्जेक्ट हा आपोआप गुगल एसएमएस चॅनलवरील सदस्यांना आपो आप पोहचतो,विकिपीडियाविषयक सजगता आणि सहाय्य अ‍ॅटोमेटेड फाईल्स सेंडींगच्या माध्यमातून याहू ग्रूपवरून पाठवणे सोपे आहे.
अभय म्हणतात त्या प्रमाणे वस्तुतः याहू ग्रूप मेलिंग लिस्ट करिता याहू आयडीची आवश्यकता आहेच असे नाही, तो गैरसमज आहे, एवढेच नाही तर मॉडरेटरना तुमचा याहू आय्डी नसलेला इमेल पत्ता सरळ याहू ग्रूप मेलिंगलिस्टला जोडता येतो, पण हे प्रत्येकास सांगत बसणे अवघड होते, मल्टीपल मेलिंग लिस्ट आणि ग्रूप्स हि पूर्णपणे टाळता येतील असेही वाटत नाही कारण प्रत्येकाचे आंतरजालीय सोशल नेटवर्कींग प्राधान्यक्रम वेगळे असतात आणि (आंतरजालीय) पिढी दर पिढी बदलत जातात.
विकिमीडीया मेलिंगलिस्ट भविष्यात करावयाचेच म्हटले तरी तुर्तास किमान ट्रासलेट विकिवरून संबधीत (सहाय्य) पानांचे भाषांतर करून घ्यावे आणि नवख्या व्यक्तीस सहाय्य पुरवेल मराठी विकिपीडिया आणि मेलिंग लिस्ट चर्चांचा परस्पर संदर्भ देउ शकेल इतपत सातत्याने वेळ देणारा आणि माहिती असणारा मॉडरेटर उपलब्ध होई पर्यंत थांबावे असे मलाही वाटते.तो पर्यंत इंडिया लिस्टवर नाव नोंदवले तर किमान विकिमीडीया मेलिंग लिस्टची तोंड ओळख होईल.माहितगार ०७:१८, ५ ऑक्टोबर २०१० (UTC)

अनुराधापुरा

[संपादन]

दक्षिणी भारतात किंवा श्रीलंकेत 'पुरा'ने शेवट होणारी मदनपुरा, कामाठीपुरा, इस्लामपुरा यांसारखी शहरातील वस्त्या दाखवणारी गावांची नावे नाहीत. पुरम्, पट्टम्, पत्तनम्, नगरम्, नाडा , ऐ , नै, लै हे शब्द नामाच्या शेवटी येणारी गावे निश्चितपणे दक्षिणी भारतात आहेत. त्यामुळे अनुराधापुरा हे गाव दक्षिणेत असण्याची शक्यता नाही. त्यामुळे अनुराधापुर्‍याचे राज्य हे शीर्ष़क बदलले पाहिजे. J ०८:१९, ४ ऑक्टोबर २०१० (UTC)

आपले म्हणणे बरोबर आहे परंतु तो नियम करता येऊ शकत नाही.उदाहरणार्थ,नागपूरात बंगाली पंजा,बांगला देश अशा प्रकारची नावे असलेल्या वस्त्या आहेत. त्या अर्थातच नंतर वसलेल्या आहेत.त्या लोकांनी त्यांचे गावाचे/जातीचे नाव लावले.'पुरा' हा शब्द हिंदी आहे, वस्तीच्या शेवटी लावण्यात येतो.मध्य प्रदेशात अशी 'पुरा'कारांत वस्त्याची अनेक नावे आहेत. वि. नरसीकर (चर्चा) ०८:५२, ४ ऑक्टोबर २०१० (UTC)

नियम नसला तरी संकेत आहेच. नागपुरा या नावाचे गाव नाही. पण वस्ती असू शकेल. पण तीसुद्धा भारताच्या मध्य किंवा उत्तर भागात, दक्षिणेला नाही. त्यामुळे श्रीलंकेत अनुराधापुरा नावाचे गाव नसावे. जे आहे त्याचे नाव अनुराधापूर आहे. त्यामुळे लेखाचा मथळा अनुराधापूरचे राज्य, असा हवा, अनुराधापुर्‍याचे असा नको. J १६:३२, ४ ऑक्टोबर २०१० (UTC)

गुजरातमध्ये छोट्या वस्तीच्या नावाला तसेच उपनगरांना पुरा प्रत्यय लावतात, उदा. बेहरामपुरा, गायत्रीपुरा, इ.
पुराकांत नावे असलेली गावे/वस्त्या आहेत हे बरोबर परंतु J यांचा नावांना प्रत्यय लावण्याबद्दलच्या मताचे मी समर्थन करतो. अनुराधापुरा हे नाव असले तरी अनुराधापुराचे किंवा अनुराधापुरातील असेच शीर्षक पाहिजे. अनुराधापुर्‍याचे राज्य हे शीर्षक बदलून अनुराधापुराचे राज्य असे केले पाहिजे.
अभय नातू १६:३६, ४ ऑक्टोबर २०१० (UTC)

creating the Sanskrit Wikisource

[संपादन]

I have submitted the proposal for creating the Sanskrit Wikisource. It is available at: http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_new_languages/Wikisource_Sanskrit

For time being, I have added only you two as the users interested in Sanskrit wikisource. If you know any one else interested in Sanskrit wiki source, please send me their details. Also make sure you cast your vote in the Arguments in favour section.

Please let me know in case there are any issues

Shiju Alex

मराठी विकिसोर्स

[संपादन]

मल्याळम विकिपीडियावरील सदस्य षिजू अ‍ॅलेक्स यांनी माहीतगारांच्या सहकार्याने मराठी विकिसोर्स निर्मितीसाठी विकिमीडिया फाउंडेशनाला विनंती केली आहे : http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_new_languages/Wikisource_Marathi

जुन्या प्रताधिकारमुक्त मराठी साहित्याचे संकलन (ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, दासबोध व अन्य) करण्याचा उद्देश मराठी विकिसोर्स प्रकल्पाद्वारे साधला जाईल. दक्षिण आशियातील व जगभरातील बर्‍याच भाषांमध्ये विकिसोर्स प्रकल्प कार्यान्वित आहेत. वरील याचिकेवर जाऊन प्रस्तावित प्रकल्पाला दुजोरा द्यावा, अशी आपणा सर्वांना विनंती आहे.

(माहीतगार, अभय नातू, षिजू अ‍ॅलेक्स यांच्या वतीने)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:०९, ८ ऑक्टोबर २०१० (UTC)

पुणे विकिभेट सप्टेंबर इ.स. २०१० वृत्तांत व प्रकाशचित्रे

[संपादन]

नमस्कार मंडळी!

१८ सप्टेंबर इ.स. २०१० रोजी पुण्यात झालेल्या विकिभेटीचा वृत्तांत व संबंधित प्रकाशचित्रांची माहिती येथे उपलब्ध केली आहे : विकिपीडिया:विकिभेट/पुणे/पुणे २#भेटीचा वृत्तांत, बातम्या व प्रकाशचित्रे

माहीतगारांना व विकिभेटीस गेलेल्या सर्व सदस्यांना मनःपूर्वक धन्यवाद!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:२५, ८ ऑक्टोबर २०१० (UTC)

नाम में अंतर

[संपादन]

हिन्दी और मराठी दोनों ही भाषायें देवनागरी में लिखी जाती हैं पर फिर भी दोनों भाषाओं में किसी नाम विशेष को लिखते समय वर्तनी में अंतर क्यों होता है? पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरिया को मराठी में दानिश कनेरिया के स्थान पर दानिश कणेरिया क्यों लिखा गया है? जबकि उसका वास्तविक नाम दिनेश प्रभा शंकर कनेरिया ही है. मेरा आप सभी से प्रश्न है कि जिस प्रकार रोमन लिपि में लिखी जाने वाली सभी भाषाओं में व्यक्तिवाचक संज्ञा की वर्तनी में परिवर्तन नहीं होता उसी प्रकार क्या देवनागरी में लिखी जाने वाली सभी भाषाओं में भी किसी नाम विशेष की वर्तनी भी समान नहीं होनी चाहिए? Dinesh smita ०८:२३, ९ ऑक्टोबर २०१० (UTC)

आपके सवाल के लिए उपरोल्लेखीत विषय वस्तु की तरफ ध्यान आकृष्ट करने के लिए ,और मराठी लोंगोको पसंदीदा चर्चा विषय मुहया करानेके लिए धन्यवाद .मेरी खुदकी किसीभी भाषाकी वर्तनी सही कहलानेका हक नही रखती केवल मै आपको मराठी भाषा एवं मराठी विकिपीडिया नितीयोसे / भावनाओ से अवगत करा सकता हुं.
जंहा तक आपके पहिले सवाल का प्रश्न है,हिन्दी और मराठी दोनों ही भाषायें देवनागरी में लिखी जाती हैं पर फिर भी दोनों भाषाओं में किसी नाम विशेष को लिखते समय वर्तनी में अंतर क्यों होता है? तो उत्तर आपही के प्रश्न मे हि है की ये दोनो भाषांए विभीन्न है. हांलाकी ये दोनो भाषांए एकही प्राकृत से निर्मीत हुईं इन दोनो भाषाओने अपना हजार सालसे उपर स्वतंत्र विकसन प्रवास किया है.
दानिश 'कणेरिया, वाली बात दो मिनट के लिए बाजू मे रखे, और वर्तनी लेखन एवं उच्चाणो के बारे हिंदी और मराठी भाषई लेखन शैली और संस्स्कृती देखे, तो यह बात सौ फिसदी साफ होती है की मराठी भाषाई लोग और मराठी भाषा हिंदी भाषाई और हिंदी भाषा के मुकाबले मुल उच्चारण और लिखाईमे बहोत ही कम बदलाव करते है, इसके लाखो उदाहरण प्रस्तुत किए जा सकते है.
हां ये बात भी सही है की मराठी भाषामे उच्चारण के वक्त बहोत बार न का ण , त का ट, ल का ळ ऐसे (और भी है) बदल मराठी स्वाभाविक वैशिष्ट्योंके चलते/होते है. और कोई कारण नही है कि मराठी लोग अपनी भाषाकी वैशिष्ट्य अंशतःभी दूर करे और यही वैशिष्ट्य भारतकी अन्य बहोत सारी भाषाओमे दिखाई देता है.मराठी भाषाई लोग और मराठी विकिपीडिया सदस्य अपनी भाषाई वैशीष्ट्योके प्रती सिद्धांतः सजग, संवेदनशील है और हमे उम्मीद करते है कि दुसरी भाषाई लोंग यह अभिव्यक्ती स्वतंत्रता समझ ले.
सर्व विकि एवं भाषाई विकिपीडिया अपने तौर पर स्वतंत्र निती रखने का अधिकार भी रखते और प्रयोगभीकरते है, लेखन के तरीको के बारे मे मराठी विकिपीडियाकी अपनी स्वतंत्र निती है और आपने ध्यान दिलाए विषय वस्तुकी तरफ यंहा चर्चा अवं उचीत निर्णय मराठी विकिपीडीयन्स करेंगे, आप भी अपना योगदान इस चर्चा मे जारी रखनेके लिए आप का आनंदसे स्वागत है.
जादातर जंहा तक कोई "नाम" noun का लेखन है उस नाम का/शब्द का मुल भाषामे जैसे उच्चारण होता है वैसेही लिखा जाता है, यदी कोई व्यक्ती अपने नामकी उच्चारण लिखाई खुद होकर अलगसे करता है और उसका पता है तो वो खूद जैसे वर्तनी लिखता है उसे प्राधान्यता दि जाती है. हांलाकी यह बात सही है कोई शब्द या नाम का उच्चारण मराठी भाषामे बहोत प्रमाणपर अलगता से प्रयूक्त होता है तो स्वाभाविकता से उसके मराठी उच्चारणके मुताबीक लिखनेको प्राधान्यता दि जाती है.
अभी मुख्य विषय दानिश कनेरिया/दानिश कणेरिया/दिनेश प्रभा शंकर कनेरिया की तरफ आते है. यह नाम मराठी लोगो मे बहोत प्रचलीत है ऐसी वाली बात नही है.हम मराठी लोग दिनेश/दीनेश/दानिश/दानीश इसमे से कौनसा सही है कनेरिआ/कनेरीआ/कणेरिआ/कणेरीआ/कनेरिया/कनेरीया/कणेरिया/कणेरीया इसमेसे मुल सिंधी लेखन उच्चारण कैसाहै और खुद दिनेश/दीनेश/दानिश/दानीश कनेरिआ/कनेरीआ/कणेरिआ/कणेरीआ/कनेरिया/कनेरीया/कणेरिया/कणेरीया अपने नाम का लेखन कैसे करते है इसका पता विशावासपूर्ण संदर्भोसे चलने तक आपको यह चर्चा मराठी और मराठी विकिपीडीयापर चलती रहेगी ये आप अनुभव करेंगे. आपने विषय वस्तुकी तरफ ध्यान दिलाने पर आप निचे बहोत समय पर बहोत सारे वर्तनी पर्याय पर चर्चा यंहा देखेंगे/गी कि आपने हिंदी विकिपीडियापर कभी देखी न हो.
यदी आप केवल हिंदी भाषा मे कनेरिया लिखा जाता है न की कणेरिया तो आपकी दलील स्विकार होने कि उम्मीद कम है, हां कि आप खुद सिंधी है या सिंधी भाषा का ज्ञान रखती है या आपने सिंधी भाषाईयो से शब्द के मुल उच्चारण के प्रती मालुमात प्राप्त कि है या तो फिर आपको यह विश्वासपूर्णता से पता है की दिनेश कणेरिया जी अपना नाम खुदही कनेरिया लिखते है तो आपकी बात स्विकारणीय हो सकती है.
जंहातक दिनेश का दानिश होने कि बात है, तो उर्दू /(सिंधी का उर्दू लिपी) लेखनही दानिश हो रहा है या उर्दू मे दिनेश लिखकर भी गूगल ट्रांसलेटर जैसी सेवा दिनेश का दानिश कर रही है चूंकी उर्दू विकिपीडिया पर के लेख का गूगल ट्रासलेटरसे हिंदी भाषांतर दानिश कनेरिया दिखा रहा है. अभी आगे हमारे बाकी मराठी विकिपीडियन मित्रगण अपनी टिप्पण्णी करते रहेंगे
माहितगार १६:१७, ९ ऑक्टोबर २०१० (UTC)


Hi Dinesh, I guess Mahitgar has already addressed your query; but let me add to it : Having same set of alphabets does not necessarily imply having same spelling (particularly) for non-native names, because phonetics do differ across even those languages that share the same script. You can take an example of sound of ऐ and औ for example, which has different sound in Hindi I guess than the pronunciation native in Marathi. These differences in phonetics would reflect in spelling some foreign names, since Marathi and other Indian languages including Hindi have phonetic writing schemes.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:३१, १० ऑक्टोबर २०१० (UTC)

प्रा. माधव गाडगीळ

[संपादन]

नमस्कार,

मराठी विकिपीडियाचे स्नेही, प्रा. माधव गाडगीळ, यांच्या कार्याबद्दलचा लेख. श्री गाडगीळ यांनी विकिपीडियावरील जैवविविधतेबद्दल सदस्यांचे मार्गदर्शन केलेले आहे. टाइम्स ऑफ इंडियावरील लेख

अभय नातू १६:१९, ११ ऑक्टोबर २०१० (UTC)