अनुराधापुऱ्याचे राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अनुराधापुर्‍याचे राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
अनुराधापुऱ्याचे राज्य
අනුරාධපුර රාජධානිය
इ.स.पू. ३७७इ.स. १०१७
Flag of Dutthagamani.pngदत्तगामनी व त्यानंतरच्या राजांच्या काळात वापरात असलेल्या ध्वजाचे पुनर्रचित चित्र
Important locations of Anuradhapura Kingdom.png
राजधानी अनुराधापुरा
शासनप्रकार राजेशाही
राष्ट्रप्रमुख प्रथम: पांडुकभय (इ.स.पू. ३७७ - इ.स.पू. ३६७)
अंतिम: पाचवा महिंद (इ.स. ९८२ - इ.स. १०१७)
अधिकृत भाषा सिंहला
क्षेत्रफळ ६५,६१० चौरस किमी

अनुराधापुऱ्याचे राज्य अर्थात अनुराधापुरा राज्य (सिंहला: අනුරාධපුර රාජධානිය; ) हे इ.स.पू. ३७७ ते इ.स. १०१७ या कालखंडात, म्हणजे सुमारे १३०० वर्षे अस्तित्वात असलेले श्रीलंकेतील एक राज्य होते. इ.स.पू. ३७७ सालाच्या सुमारास पांडुकभय राजाने अनुराधापुरा या नगरात हे राज्य स्थापले. अनुराधापुरा राज्याच्या कालखंडात श्रीलंकेच्या बेटावर अन्य भागांमध्ये छोटी छोटी अन्य राज्ये होती; मात्र ती बहुश: अनुराधापुऱ्याच्या सत्तेची मांडलिक होती. देवानामपिय तिस्सा राजाच्या कारकिर्दीत बौद्ध धर्म स्वीकारल्यापासून अनुराधापुऱ्यात थेरवादी बौद्ध पंथाचा संस्कृती, नीतिनियम, कायदे व राज्ययंत्रणेवर पगडा होता.