इंद्राणी
Appearance
(शची या पानावरून पुनर्निर्देशित)
इंद्राणी ही इंद्रपत्नी व एक सूक्तद्रष्टी आहे. हिला ऐन्द्री, शक्री , वज्री ,पुलोमजा व शची या नावांनीदेखील ओळखले जाते. ऋग्वेदात हिच्या अनेक ऋचा आहेत. तिला अखंड सौभाग्यवती मानलेले आहे. म्हणून लग्नात वाङनिश्चयाच्यावेळी वधूकडून तिची पूजा करवितात. विदर्भात इंद्राणीचे मंदिर आहे. इंद्र-इंद्राणी काही लोकांच्या कुलदेवता आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हेही बघा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]वृषाकपि इंद्रपत्नी इंद्राणी देवीला वेदात संबोधले गेले आहे.ऋग्वेद व अथर्ववेदात विस्ताराने वृषाकपी सूक्त आले आहे.. श्रौत सोमयागात या देवतेसाठी सप्तहौत्रातला ब्राह्मणाच्छंसी नावाचा ऋत्विज पुरोहित या देवतेसाठी सोमरसाचे हवन करण्यापूर्वी वृषाकपी देवतेच्या प्रसन्नतेसाठी शस्त्र शंसन म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने प्रणवांची योजना करून म्हणत असतो..तसेच बीड माजलगाव जवळ मंजरथ येथे गोदावरी नदी पात्रात वृषाकपीचे पुराणकालीन मंदिर देखिल आहे..