Jump to content

इंद्राणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंद्राणी देवी

इ.स. १५००-१६०० च्या सुमारास नेपाळमधील इंद्राणी, जिला इंद्राची पत्नी म्हणून चित्रित केले आहे.

देवांची राणी - इत्यादींची अधिपती देवता

मराठीइंद्राणी
संस्कृतइन्द्राणी
निवासस्थानइंद्रलोक, अमरावती, स्वर्ग
लोकस्वर्ग
वाहनऐरावत नावाचा हत्ती,
शस्त्रवज्र, त्रिशूल, अस्त्र
वडीलपुलोमन
पतीइंद्र देव
अपत्येजयंत, जयंती
अन्य नावे/ नामांतरेऐन्द्री, शक्री, वज्री ,पुलोमजा, शची, देवराणी
या देवतेचे अवतारद्रौपदी
मंत्रॐ ऐंद्री नम:
नामोल्लेखऋग्वेद, ऐतरेय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, पद्म पुराण, स्कंद पुराण, वायु पुराण,

इंद्राणी जिला शची म्हणूनही ओळखले जाते, ही हिंदू धर्मातील देवांची राणी आहे. अतिशय सुंदर, गर्विष्ठ आणि दयाळू म्हणून वर्णन केलेली, ती असुर पुलोमनची मुलगी आणि देवांचा राजा इंद्र देवाची पत्नी आहे.

इंद्र व त्याची पत्नी शची ऐरावतावर स्वार होऊन जातांना

इंद्राणी ही इंद्रपत्नी व एक सूक्तद्रष्टी आहे. हिला ऐन्द्री, शक्री , वज्री ,पुलोमजा व शची या नावांनीदेखील ओळखले जाते. ऋग्वेदात हिच्या अनेक ऋचा आहेत. तिला अखंड सौभाग्यवती मानलेले आहे. म्हणून लग्नात वाङनिश्चयाच्यावेळी वधूकडून तिची पूजा करवितात. विदर्भात इंद्राणीचे मंदिर आहे. इंद्र-इंद्राणी काही लोकांच्या कुलदेवता आहेत.

हेही बघा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

वृषाकपि इंद्रपत्नी इंद्राणी देवीला वेदात संबोधले गेले आहे.ऋग्वेद व अथर्ववेदात विस्ताराने वृषाकपी सूक्त आले आहे.. श्रौत सोमयागात या देवतेसाठी सप्तहौत्रातला ब्राह्मणाच्छंसी नावाचा ऋत्विज पुरोहित या देवतेसाठी सोमरसाचे हवन करण्यापूर्वी वृषाकपी देवतेच्या प्रसन्नतेसाठी शस्त्र शंसन म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने प्रणवांची योजना करून म्हणत असतो..तसेच बीड माजलगाव जवळ मंजरथ येथे गोदावरी नदी पात्रात वृषाकपीचे पुराणकालीन मंदिर देखिल आहे..