Jump to content

बृहत्संहिता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बृहत्संहिता हा ज्योतिष शास्त्रावर असलेला ग्रंथ आहे. याचे लेखन वराहमिहिर यांनी उज्जैन येथे केले. या ग्रंथात ज्योतिषाच्या सर्व अंगांचा विचार केला आहे. त्यात राशी, नक्षत्र आणि ग्रह विचार प्रामुख्याने केला गेला आहे.

बृहत्संहिता हा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे. ज्योतिषासोबत यात मानवी जीवनास उपयुक्त असलेल्या इतर विषयांचे मार्गदर्शनही केलेले आहे. याच्या १४ व्या कूर्माध्यायात पर्जन्य गर्भलक्षण, गर्भधारण व वर्षण हे विषय आहेत.त्यात मार्गशीर्षदि मासात पर्जन्यवृष्टी कशी होईल ते सांगितले आहे. तसेच पर्जन्यमापनाची रीतही दिली आहे. उदकार्गल प्रकरणात पाण्याचा शोध घेण्याविषयी ठोकताळे सांगितले आहेत. श्री. शं. बा. दीक्षित म्हणतात, ‘सृष्टिज्ञानाच्या ज्योति:शास्त्र या एका शाखेवर ग्रंथ करणारे पुष्कळ झाले, परंतु त्याच्या अनेक शाखांवर विचार करणारा ज्योतिषी दुसरा झाला नाही. नानाप्रकारचे सृष्टिचमत्कार, पदार्थाचे गुणधर्म, त्यांचा व्यवहारातील उपयोग याकडे त्यांचे बारीक लक्ष होते. त्याने पूर्वसूरींची ऋणेही लपवून ठेवली नाहीत. जागजागी गर्ग, पराशर, असित, देवल इ. ऋषींची नावे देऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे अमुक विषय सांगतो, असे वराह स्पष्टपणे म्हणतो.

वराहमिहिराच्या ‘बृहत्संहिता’ या बृहत्ग्रंथाचा वृक्षायुर्वेद हा ५५ वा अध्याय आहे. यात एकूण ३१ श्लोक आहेत. यात झाडांची अभिवृद्धी, जमिनीची लागवडीचे दृष्टीने तयारी, बीजप्रक्रिया, रोपप्रक्रिया, झाडांसाठी जीवनसत्त्वे, झाडांवरील रोग, लागवडीचे तंत्र व सिंचन या गोष्टींचा विचार केला आहे.

वेद
ऋग्वेदयजुर्वेदसामवेदअथर्ववेद