Jump to content

महा मिनिस्टर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महा मिनिस्टर
सूत्रधार आदेश बांदेकर
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ७७
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दररोज संध्या. ६ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ११ एप्रिल – २६ जून २०२२
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम होम मिनिस्टर

महा मिनिस्टर हे होम मिनिस्टरचे नवे पर्व असून आदेश बांदेकर यात विविध शहरांत जाऊन महिलांमध्ये खेळ घेऊन एकमेव अंतिम विजेत्या महिलेला ११ लाखांची पैठणी देऊन सन्मान करणार आहेत.

केंद्र

[संपादन]

ही स्पर्धा महाराष्ट्रातील १० केंद्रांवर घेण्यात आली: नाशिक, ठाणे, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, पनवेल, अहमदनगर, रत्‍नागिरी, कोल्हापूर, नागपूर.

स्पर्धा

[संपादन]

प्रत्येक केंद्रावर ९० जणींची प्राथमिक फेरीसाठी निवड करण्यात आली. त्या ९० जणींमध्ये स्पर्धा घेऊन विजेतीची पुढील फेरीसाठी निवड करण्यात येत असून तिचा १ लाख २५ हजार रुपयांची पैठणी देऊन सन्मान केला जात असे. अशा १० केंद्रांच्या विजेत्या १० जणींमध्ये अंतिम स्पर्धा होऊन जी महाविजेती ठरेल तिला ११ लाखांची पैठणी दिली जाणार आहे.

विशेष भाग

[संपादन]
  1. महामिनिस्टर महाराष्ट्राची, जिंकणार पैठणी ११ लाखांची. (११ एप्रिल २०२२)
  2. नाशिकमध्ये खेळ रंगलाय, कोणत्या वहिनींचा मेळ जमलाय? (१७ एप्रिल २०२२)
  3. ठाण्यात धमाल रंगतेय, कोण सरस ठरतेय? (२४ एप्रिल २०२२)
  4. औरंगाबादमध्ये वहिनींच्या उत्साहाला उधाण आलंय, तिकडे नेमकं काय काय घडलंय? (०१ मे २०२२)
  5. ११ लाखांची पैठणी कोण जिंकणार, महाराष्ट्राची महामिनिस्टर कोण होणार? (२६ जून २०२२)

बाह्य दुवे

[संपादन]
संध्या. ६च्या मालिका
होम मिनिस्टर | साडे माडे तीन | कुंकू | जाडूबाई जोरात | महा मिनिस्टर | यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची