भुवनगिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?भुवनगिरी
भुवनगिरी
तेलुगू : భువనగిరి
तेलंगणा • भारत
—  शहर  —
Map

१७° ३०′ ३६″ N, ७८° ५३′ २४″ E

भुवनगिरी is located in तेलंगणा
भुवनगिरी
भुवनगिरी
भुवनगिरीचे तेलंगणामधील स्थान

गुणक: 17°30′36″N 78°53′24″E / 17.51000°N 78.89000°E / 17.51000; 78.89000

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
७६.५३७ चौ. किमी
• ३२९ मी
हवामान
वर्षाव

• ७५८.२ मिमी (२९.८५ इंच)
प्रांत तेलंगणा
जिल्हा यदाद्रि भुवनगिरी जिल्हा
लोकसंख्या
घनता
५३,३३९
• ६९७/किमी
भाषा तेलुगू
संसदीय मतदारसंघ भुवनगिरी
विधानसभा मतदारसंघ भुवनगिरी
स्थानिक प्रशासकीय संस्था भुवनगिरी नगरपालिका
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

• 508116
• +०८६८५
• IN-BG
• TS-30[१]
संकेतस्थळ: भुवनगिरी नगरपालिका
  1. ^ https://www.transport.telangana.gov.in/html/registration-districtcodes.html

भुवनगिरी (Bhuvanagiri / Bhongir) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या यदाद्रि भुवनगिरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. भोंगीर शहर त्याच्या किल्ल्याशी संबंधित आहे जो एका वेगळ्या (अलिप्त) खडकावर बांधला गेला होता. असे मानले जाते की पश्चिम चालुक्य शासक त्रिभुवनमल्ल विक्रमादित्य - सहावा याने या ठिकाणी किल्ला बांधला होता ज्याला त्रिभुवनगिरी असे नाव देण्यात आले. हे नाव पुढे भुवनगिरी आणि भोंगीर झाले. हा किल्ला काकतिया राणी रुद्रमादेवी आणि तिचा नातू प्रतापरुध्र यांच्या कार्यकाळाशी संबंधित आहे.

१९१० मध्ये शहरामध्ये नगर पालिकेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर १९५२ मध्ये नगरपालिका म्हणून स्थापना करण्यात आली आणि अलीकडेच शासनाच्या आदेशानुसार रायगिरी, पागिडीपल्ली आणि बोम्माईपल्ली गावे या ग्रामपंचायती भोंगीर नगरपालिकेत विलीन करण्यात आल्या आणि शहराचा विस्तार झाला. हे राज्याची राजधानी हैदराबादपासून ४८ किलोमीटर अंतरावर आहे. भगवान यादगिरीचे प्रसिद्ध तीर्थयात्री लक्ष्मीनरसिंह स्वामी देवस्थानम जवळपास १३ किमी अंतरावर आहे.[१]

लोकसंख्या[संपादन]

२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १२,१९६ कुटुंबांसह ५३,३३९ होती. एकूण लोकसंख्येमध्ये २७,०७३ पुरुष आणि २६,२६६ स्त्रिया आहेत- लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे ९७० स्त्रिया.[२] ०-६ वर्षे वयोगटातील ५७१४ मुले आहेत, लिंग गुणोत्तर १,००० मुलेमागे ९५६ मुली आहे. सरासरी साक्षरता दर ८१.२४% होता.

८२.८९% लोक हिंदू आणि (१५.२२%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (०.९४%), शीख (०.०४%), बौद्ध (०.०४%), जैन (०.०२%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.८३%) यांचा समावेश होतो.[३][४]

तेलुगू भुवनगिरीमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.

भुगोल[संपादन]

भुवनगिरी हे १७°३०′३६″N ७८°५३′२४″E वर स्थित आहे. भुवनगिरीची सरासरी उंची ३२९ मीटर आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७५८.२ मिलिमीटर (२९.८५ इंच) आहे.[५][६]

पर्यटन[संपादन]

भुवनगिरी फोर्ट, हैदराबाद येथील रॉक क्लाइंबिंग स्कूल हे रॉक क्लाइंबिंगचे (मोठ्या खडकावर चढण्याचे) प्रशिक्षण केंद्र आहे.[७]

शहरात काही उल्लेखनीय स्थळ आहेत. भुवनगिरी किल्ला अशीच एक रचना आहे. भगवान यादगिरीचे प्रसिद्ध तीर्थयात्री लक्ष्मीनरसिंह स्वामी देवस्थान शहरापासून जवळपास १३ किमी अंतरावर आहे.

संस्कृती[संपादन]

प्रशासन[संपादन]

भुवनगिरी नगरपालिका ही शहराच्या नागरी गरजांवर देखरेख करणारी नागरी संस्था आहे. सध्या नगरपालिकेचे कार्यक्षेत्र ७६.५३७ किमी (२९.५५ चौरस मैल) मध्ये पसरलेले असून ३० प्रभाग आहेत. भुवनगिरी हे शहर भुवनगिरी विधानसभा मतदारसंघात येते. जो भुवनगिरी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[८]

वाहतूक[संपादन]

भुवनगिरी येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चे बसस्थानक आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते.

जवळचे रेल्वे स्थानक: भुवनगिरी

शिक्षण[संपादन]

हे देखाल पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Bhongiri Municipality". bhongirmunicipality.telangana.gov.in. 2022-02-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Basic Information of Municipality".
  3. ^ "Bhongir Municipality City Population Census 2011-2022 | Andhra Pradesh". www.census2011.co.in. 2022-02-07 रोजी पाहिले.
  4. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. Archived from the original (PDF) on 2016-06-15. 2022-02-07 रोजी पाहिले.
  5. ^ "Bhongir topographic map, elevation, relief". topographic-map.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-07 रोजी पाहिले.
  6. ^ ":: Rainfall Integration::". www.tsdps.telangana.gov.in. 2022-02-07 रोजी पाहिले.
  7. ^ "It's the climb!". The New Indian Express. 2022-02-07 रोजी पाहिले.
  8. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. Archived from the original (PDF) on 2016-06-15. 2022-02-07 रोजी पाहिले.