Jump to content

भारतीय आयुर्विमा महामंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय जीवन विमा निगम
Life Insurance Corporation of India
ब्रीदवाक्य ज़िन्दगी के साथ भी, ज़िन्दगी के बाद भी
प्रकार विमा कंपनी
उद्योग क्षेत्र विमा
स्थापना १ सप्टेंबर १९५६
मुख्यालय मुंबई, भारत
उत्पादने जीवनविमा, म्युच्युअल फंड, गृहकर्ज
महसूली उत्पन्न भारतीय रूपया १३.२५ निखर्व
मालक भारत सरकार
कर्मचारी १,१५,९९६
पोटकंपनी 66
संकेतस्थळ www.licindia.in

भारतीय आयुर्विमा महामंडळ (रोजच्या वापरातील संक्षेपः एलआयसी; इंग्लिश: Life Insurance Corporation of India) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.१८१८ मध्ये ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी ही भारतात जीवनविमा व्यवसाय सुरू करणारी पहिली विमा कंपनी ,१९२८ मध्ये भारतातील जीवन तसेच इतर विम्यांची सांख्यकीय माहिती गोळा करता यावी, यासाठी भारतीय विमा कायदा संमत करण्यात आला. १९५६ मध्ये विमा सेवा आणि निधी सेवा पुरविणाऱ्या सुमारे २४५ भारतीय तसेच परकीय कंपन्या भारत सरकारने ताब्यात घेऊन त्यांचे राष्ट्रीयकरण केले . १९ जून १९५६ला संसदेत एल आय सी कायदा संमत करून वरील कंपन्यांच्या एकत्रीकरणातून १ सप्टेंबर १९५६ला एल आय सीची स्थापना करण्यात आली .एलआयसीचे जीवनविम्याचे हप्ते हे उत्पन्नाचे प्रमुख साधन राहिले आहे. मुंबईमध्ये एलआयसीचे मुख्यालय असून तिची ८ क्षेत्रीय कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, २०४८ शाखा, ५४ ग्राहक सेवा केंद्रे व २५ महानगर सेवा केंद्रे आहेत.

गेले अनेक दशके एलआयसी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहे. सध्या १३,३७,०६४ इतके एलआयसी एजंट भारतभर कार्यरत आहेत.स्थापनेपासून गेल्या ६० वर्षात आणि उदारीकरणानंतरही जीवन विम्यात एल आय सीची मक्तेदारी राहिली आहे .

मुख्यतः जीवन विमा सेवा पुरवणाऱ्या एलआयसीने गेल्या काही वर्षांपासून इतर आर्थिक उत्पादने देखील बाजारात आणली आहेत. युलिप, म्युच्युअल फंड, गृहकर्ज इत्यादी सेवा सध्या एलआयसीमार्फत पुरवल्या जातात.

उद्देश ;

-जीवन विम्याचा प्रसार सर्वत्र ,विशेषतः ग्रामीण भागात करणे ,जेणेकरून देशातील प्रत्येक विमा उतरविण्यायोग्य व्यक्तीपर्यंत ही सेवा पोहचेल आणि वाजवी दरात त्यांना पुरेसे आर्थिक संरक्षण देता येईल

बोधवाक्य[संपादन]

योगक्षेमं वहाम्यहम्. ( तुमची समृद्धी ,आमचे कर्तव्य )हे भारतीय विमा मंडळाचे बोधवाक्य आहे.

हे बोधवाक्य गीतेमधून घेतले आहे. मूळ श्लोक असा :

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥ ... भगवद्गीता ९-२२

अर्थ : माझे चिंतन करीत अनन्यभावाने जे मला भजतात त्यांची काळजी मी बाळगतो.

बाह्य दुवे[संपादन]

  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2011-07-21. 2011-07-22 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)