ॲक्चुरिअल सोसायटी ऑफ इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲक्चुरिअल सोसायटी ऑफ इंडिया ही भारतातील ॲक्चुरिअल व्यावसायिक बनण्यासाठी परीक्षा घेणारी संस्था आहे. या संस्थेच्या मानद सभासदाला ॲक्चुरी असे म्हटले जाते.[१]

ॲक्चुरी[संपादन]

विमा कंपन्यांमध्ये ॲक्चुरींच्या[मराठी शब्द सुचवा] कामाचे स्वरूप हे विम्याच्या नवनवीन योजना बनवणे, विम्याचा हप्ता ठरवणे, विमा कंपनीच्या कायद्याकडे लक्ष ठेवणे, दुरुस्तीच्या सूचना करणे, विम्याचे दावे पूर्ण करण्यासाठी पुरेशा निधीची तरतूद असण्याकडे लक्ष ठेवणे, अशा प्रकारचे असते. भविष्यातील अनिश्चित घटनांचा आर्थिक परिणाम ठरवण्याचे काम ॲक्चुरी कुशलतेने करतात. विमा क्षेत्राबरोबरीनेच व्यापारी बँका, गुंतवणूक कंपन्यांमध्ये ॲक्चुरींची गरज असते. रिटायरमेन्ट फंड, मोठ्या कंपन्यांच्या एम्प्लॉयी बेनिफिट फंड व असेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक जोखमीचे काम असणाऱ्या विविध कंपन्यांमध्ये ॲक्चुरींना मोठी मागणी असते. निवृत्तीवेतन, गुंतवणुकी, तसेच प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट, बँकिंग, हेल्थ केर आदीच्या नवीन योजना ठरवणे, त्यातील जोखमींचा (रिस्क) अंदाज बांधणे व नियोजन करणे हा त्यांच्या कामाचा भाग आहे.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Institute of Actuaries of India (IAI) Archived 2011-09-28 at the Wayback Machine.