भारतीय कृषी विमा कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय कृषी विमा कंपनी ही भारत सरकारने राष्ट्रीय कृषि विमा योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन केलीली विमा कंपनी आहे. ही कंपनी अंदाजे ५०० जिल्हयात शेती आणि इतर संबंधित विषयांसाठी विमा योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी करते. हीची स्थापना २० डिसेंबर २००२ रोजी करण्यात आली. या कंपनीचे भागभांडवल रु. २०० कोटी आहे. या कंपनीसाठी भारतीय सर्वसाधारण विमा निगम, राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक, नॅशनल इन्शुअरन्स कंपनी, न्यू इंडिया इन्शुअरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुअरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया इन्शुअरन्स कंपनी यांनी एकत्र भागभांडवलाची उभारणी केलेली आहे.