Jump to content

मुंबई उच्च न्यायालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बॉम्बे हायकोर्ट या पानावरून पुनर्निर्देशित)
मुंबई उच्च न्यायालय
अपीलीय न्यायालये
ह्याचा भागमुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प संपादन
स्थापना१४ ऑगस्ट 1862 संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानमुंबई जिल्हा संपादन
स्थानफोर्ट संपादन
भौगोलिक गुणक१८°५५′५२″N ७२°४९′५०″E संपादन
कार्यक्षेत्र भागमहाराष्ट्र, गोवा, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव संपादन
Foundational textLetters Patent for the High Court of Judicature for the Presidency of Bombay, 1865 संपादन
वारसा अभिधानpart of UNESCO World Heritage Site संपादन
Street addressFort, Mumbai, Maharashtra 400032 संपादन
डाक संकेतांक400032 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.bombayhighcourt.nic.in/ संपादन
Map

मुंबई उच्च न्यायालय (अधिकृत नाव: बॉम्बे हायकोर्ट[१], इंग्रजी: The High Court of Bombay) हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालयापैकी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसोबत दिव -दमण आणि दादरा आणि नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालाच्या न्यायक्षेत्रात येतात. उच्च न्यायालयाची कायम खंडपीठे महाराष्ट्रात नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे तर गोव्यात पणजी येथे आहे आणि नुकतेच नवीन निर्माण झालेले फिरते पिठ, कोल्हापूर येथे असून, हे फिरते-पीठ कोल्हापूर, सांगली सातारा, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर अशा सहा जिल्ह्यांसाठी असणार आहे.[२]

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर केवळ सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथेच दाद मागता येऊ शकते, तसेच उच्च न्यायालयने दिलेला निकाल, उच्च न्यायालयाच्या न्याय-क्षेत्रास बंधनकारक असतो.

नावांची गम्मत

[संपादन]

१९९५ मध्ये शहराचे नाव बॉम्बेवरून बदलून मुंबई करण्यात आले, तरीही न्यायालयाची एक संस्था म्हणून जुनीच परंपरा कायम ठेवत त्याचे नाव 'बॉम्बे हाय कोर्ट' असेच ठेवण्यात आले. ​तथापि, या न्यायालयाचे नाव बदलून 'मुंबई उच्च न्यायालय' करण्यासाठी ५ जुलै २०१६ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने एका विधेयकाला मंजुरी दिली. याच विधेयकानुसार कलकत्ता आणि मद्रास उच्च न्यायालयांची नावे बदलून ती अनुक्रमे 'कोलकाता उच्च न्यायालय' आणि 'चेन्नई उच्च न्यायालय' अशी करण्याचा प्रस्ताव होता. हे विधेयक सध्या भारताच्या संसदेत मंजुरीसाठी प्रलंबित असून, ते अद्याप पूर्णपणे लागू झालेले नाही.[३][४]

कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग

[संपादन]

बृहन्मुंबई महानगरपालिकेने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मुंबई येथील चर्चगेट परिसरातील मुंबई उच्च न्यायालय व राजाबाई क्लॉक टॉवर येथे त्यांची स्मृती लोकांमध्ये जिवंत ठेवण्यासाठी आणि लोकांना स्फूर्ती मिळावी म्हणून एका रस्त्याचे कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग असे नामकरण केलेले आहे.[५]

कायम खंडपीठे

[संपादन]
  1. नागपूर
  2. औरंगाबाद
  3. पणजी, गोवा
  • कोल्हापूर (सर्किट बेंच)

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "High Court Of Bombay | Official l of e-Committee, Supreme Court of India pm| India" (इंग्रजी भाषेत). 2022-04-20 रोजी पाहिले.
  2. ↑ "Collegium Resolutions | SUPREME COURT OF INDIA". main.sci.gov.in. 2022-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-20 रोजी पाहिले.
  3. ↑ "Cabinet renames high courts in Kolkata, Mumbai, Chennai". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2016-07-05. 2022-04-20 रोजी पाहिले.
  4. ↑ "Names of Calcutta, Madras, Bombay HCs may not change in near future: Govt". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2016-12-14. 2022-04-20 रोजी पाहिले.
  5. ↑ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, मंगळवार,१७ डिसेंबर २०२४

अधिकृत संकेतस्थळ

[संपादन]