जायफळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
जायफळाचे वनस्पतिशास्त्रीय चित्र

वनस्पतिशास्त्रानुसार जायफळ (शास्त्रीय नाव: Myristica, मायरिस्टिका ; इंग्लिश: Nutmeg, नटमेग ;) हे मायरिस्टिका प्रजातीत मोडणार्‍या अनेक जातींच्या वृक्षांसाठी योजले जाणारे नाव आहे. व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची जात म्हणजे 'मायरिस्टिका फ्रॅग्रन्स' होय. ही जात मूळची इंडोनेशियातील मोलुक्का द्वीपसमूहातील बांदा बेटांवरची आहे. जायफळाच्या झाडापासून जायफळ व जायपत्री अशी दोन प्रमुख मसाल्याची उत्पादने मिळतात.

जायफळे

जायफळ हे जायफळाच्या झाडाचे बी होय. याचा आकार अंडाकृती असून ते २० ते ३० मि.मी. (०.८ ते १ इंच) लांब आणि १५ ते १८ मि.मी. (०.६ ते ०.७ इंच)रुंदीचे असते. त्याचे वाळल्यावर वजन ५ ते ७ ग्रॅम (०.२ ते ०.४ औंस) असते. जायपत्री म्हणजे या बीची वाळलेली, लालसर रंगाची साल होय. जायफळाचे झाड लावल्यापासून ७ ते ९ वर्षांनी त्याला पहिल्यांदा फळे धरतात व २० वर्षांनंतर झाड पूर्ण जोमाने उत्पादन देऊ लागते. मसाल्यांमध्ये सहसा जायफळाची पूड वापरली जाते. एकाच झाडापासून दोन मसाल्याचे पदार्थ निर्मिणारे हे एकमेव झाड आहे.

याव्यतिरिक्त तैलार्क, तैलीय रेसिने, जायफळाचा स्निग्धांश (बटर) इत्यादी व्यापारी उत्पादने या झाडापासून मिळतात.

जायफळ किसणीवर सहज किसता येते.

मायरिस्टिका फ्रॅग्रन्स ही जायफळाची सर्वसाधारण जात इंडोनेशियातील बांदा बेटांव्यतिरिक्त, मलेशियातील पेनांग बेटावर तसेच कॅरिबिअन भागातील ग्रनाडा येथे आढळून येते. दक्षिण भारतात केरळामध्ये ही जात जोपासली जाते. जायफळाच्या इतर प्रमुख जाती न्यू गिनी येथील पापुअन नटमेग मायरिस्टिका अर्जेंटिया आणि भारतातील बाँबे नटमेग मायरिस्टिका मलाबारिका या होत.[१]

संदर्भ व नोंदी[स्रोत संपादित करा]

  1. सकाळ मधील लेख. साप्ताहिक सकाळ. (मराठी मजकूर)

बाह्य दुवे[स्रोत संपादित करा]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत