नासदीय सूक्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


नासदीय सूक्त (ऋग्वेद, मंडल १०,सुक्त १२९) हे ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील १२९ वे सूक्त आहे. ‘नासदासीन्नो सदासीत्तदानीं’ या सुरुवातीच्या ओळीवरून ते नासदीय सूक्त म्हणून ओळखले जाते. विश्वाच्या उत्पत्तीचे हे सर्वात प्राचीन अनुमान आहे. यात एकूण सात ऋचा आहेत. या सूक्ताची रचना त्रिष्टुप् या छंदात असून देवता हे भाववृत्त आहे. यामध्ये विश्वाच्या निर्मितीचे श्रेय परमेश्वराला दिलेले नसून शोधण्यासाठी बुद्धीकल्पनाशक्ती यांचा वापर केलेला आहे. या सूक्तात विश्वाविषयी शंका आहेत तसेच त्याची उत्तरे बरोबर आहेत की नाहीत अशाही शंका आहेत. ब्रह्मामध्ये ‘काम’ निर्माण झाल्याने पुढे सृष्टी वाढत गेली असा विचार यात मांडला आहे. शंकराचार्य तसेच मध्वाचार्य यांनी याचा अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यावर सायण या विजयनगर साम्राज्यातील विचारवंताने, तेराव्या शतकात रचलेली टीका 'सायणाचे भाष्य' या नावाने उपलब्ध आहे. या नासदीय सूक्ताचे लोकमान्य टिळक यांनी गद्य भाषांतर केले होते. हिंदी रूपांतर प्रा. वसंत देव यांनी केले आहे. ते भारत एक खोज या दूरदर्शन मालिकेत शीर्षकगीत म्हणून वापरले गेले होते. या सूक्ताचा उल्लेख Carl Sagan ने त्याच्या Cosmos ह्या पुस्तकात केला आहे.

सिद्धान्त[संपादन]

जगदुत्पत्तीसंबंधी जे अनेक सिद्धान्त किंवा तर्क मांडले गेले आहेत त्यातील नासदीय सूक्त हा सर्वात प्राचीन सिद्धान्त असावा. जगदुत्पत्तीसंबंधी fuzzy logic च्या अंगाने प्रश्न निर्माण करून त्यासंबंधी काही तर्कसिद्धान्त मांडले आहेत. या सूक्तामधली कल्पनाशक्ती व अज्ञाताचा शोध घेऊ पाहणारी रचनाकर्त्यांची प्रतिभा यासाठी हे सूक्त नावाजलेले आहे. यातील अनेक सूक्तांचे कवी (ऋषी ) वेगवेगळे होते असे मानले जाते. काही ठिकाणी प्रजापतिपुत्र परमेष्ठी असा ऋषीचा उल्लेख आहे.

सूक्ताचे उदाहरण (पहिली द्विपदी/ ऋचा):

नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् ।
किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १ ॥

मराठी रूपांतरण

विश्वाची सुरुवात होताना ना होता मृत्यू, ना अमृतत्व होते. 
तसेच रात्र आणि दिवसांचे प्रकटणे नव्हते. 
सर्वत्र निर्वात पोकळी होती. त्याशिवाय तेथे काहीच नव्हते.
नासदीय सूक्ताचे श्री धनंजय यांनी केलेले समश्लोकी भाषांतर उपक्रम या संकेतस्थळावर आहे, ते असे :- 

तेव्हा ना असणे ना नसणे होते,
धूळही नव्हती, ना आकाश पल्याड
कुठे, काय आश्रय, काय आवरण होते?
होते का पाणी गहन आणि गाढ? ||१|

ना होता मृत्यू, ना अमृतत्व तेव्हा
रात्री-दिवसांचे प्रकटणे नव्हते
निर्वाताने एका स्वतःला आणले जेव्हा,
आणिक नव्हते नाही, काहीच नव्हते. ||२||

अंधार होता, अप्रकट पाणीच पाणी
अंधाराने होते ते सगळे लपवले -
हे पोकळ झाकलेले, न-झालेले... आणि
त्यात तपातून एक महान उपजले ||३|

पुढे उद्भवला प्रथम तो काम
काम म्हणजे काय तर रेत मनाचे
मनीषेने हृदयात कवींना ये ठाव -
कळे नसण्याशी नाते असण्याचे ||४||

ओढलेले आडवे किरण... यांपैकी
काय होते खाली नि काय बरे वर?
महिमान होते, होते रेतधारी,
स्वयंसिद्ध येथे, प्रयत्न तेथवर ||५||

कोण बरे जाणतो, कोण सांगतो बोलून
कुठून उद्भवली, ही झाली कुठून?
देवही त्यापुढचे, झाले हे होऊन
कोण मग जाणतो, ही झाली कुठून? ||६||

उद्भवले हे होते होय ज्याच्यापासून धारण याला करतो, का नाहीच मुळी धरत? बघणारा जो आहे परम आकाशातून, तो हे जाणतोच - की नाही तोही जाणत? ।।७।।

पुस्तके[संपादन]

  • नासदीय सूक्त भाष्य. लेखक - शंकर रामचंद्र राजवाडे, प्रकाशन वर्ष १९५५.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.