प्रिया बेर्डे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रिया बेर्डे
जन्म प्रिया बेर्डे
१७ ऑगस्ट १९६७ [१]
इतर नावे प्रिया अरुण
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
वडील अरुण कर्नाटकी
पती लक्ष्मीकांत बेर्डे
अपत्ये अभिनय बेर्डे, स्वानंदी बेर्डे [२]

प्रिया बेर्डे (जन्मदिनांक १७ ऑगस्ट १९६७) ही मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. इ.स. १९८८ साली अशी ही बनवाबनवी या चित्रपटाद्वारे तिने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले.

जीवन[संपादन]

कर्नाटकी या प्रसिद्ध फिल्मी घराण्यात प्रिया बेर्डे यांचा जन्म झाला, त्या काळचे प्रसिद्ध छायालेखक वासुदेव कर्नाटकी यांची नात व मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक अरुण कर्नाटकी यांच्या त्या कन्या होत. पहिल्यापासूनच अभिनयाची आवड म्हणून मराठी सिनेमात त्यांनी प्रवेश केला. विनोदी चित्रपटांच्या त्या जमान्यात लोकप्रिय विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या समवेत त्यांची अशी जोडी जमली कि प्रत्यक्ष जीवनातदेखील ते एकमेकांचे जोडीदार झाले, दोघांचे एकत्र असे अनेक विनोदी सिनेमे गाजले. एक धागा, आम्ही तिघी या दूरदर्शन मालिकांमद्धे त्यांनी काम केले. त्यांना (अभिनय) व (स्वानंदी) अशी दोन मुले आहेत, नुकतेच अभिनय याने ती सध्या काय करते या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटात पदार्पण केले.

चित्रपट-कारकीर्द[संपादन]

 • रंगत संगत
 • अशी हि बनवा बनवी
 • एक गाडी बाकी अनाडी
 • घनचक्कर
 • धरलं तर चावतंय
 • अफलातुन
 • येडा कि खुळा
 • धमाल जोडी
 • बजरंगाची कमाल
 • बेटा
 • जान
 • जत्रा
 • देवा शप्पथ खोट सांगेन खरं सांगणार नाही
 • फुल थ्री धमाल
 • डम डम डिगा डिगा
 • चल धर पकड
 • बोकड
 • द स्ट्रगलर - आम्ही उद्याचे हिरो
 • योद्धा
 • मला अण्णा व्हायचंय
 • प्रेमासाठी
 • तु, का. पाटील [३]
 • रंपाट [४]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.