अमृता खानविलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमृता खानविलकर
जन्म अमृता राजू खानविलकर
नोव्हेंबर २३, इ.स. १९८४
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट),
सूत्रसंचालन (टीव्ही)
कारकीर्दीचा काळ इ.स. २००४ - चालू
भाषा मराठी (स्वभाषा)
मराठी, हिंदी (अभिनय)‌
प्रमुख चित्रपट गोलमाल
साडे माडे तीन
प्रमुख टीव्ही कार्यक्रम कॉमेडी एक्सप्रेस
वडील राजू खानविलकर
आई गौरी खानविलकर
पती
हिमांशु मल्होत्रा (ल. २०१५)

अमृता खानविलकर (नोव्हेंबर २३, इ.स. १९८४; पुणे, महाराष्ट्र - हयात) ही मराठी अभिनेत्री असून तिने मराठीहिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तिने मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील काही कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनही केले आहे.

जीवन[संपादन]

अमृता खानवलकर ही मूळची मुंबई आहे. तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कुलात झाले[१]; तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात झाले.

कारकीर्द[संपादन]

अमृता खानविलकर हिची कारकीर्द झी टीव्ही दूरचित्रवाहिनीच्या इ.स. २००४मधील "झी इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज" या गुणवत्ता-शोधन कार्यक्रमातील सहभागातून सुरू झाली. यात तिने तिसरा क्रमांक पटकावला [ संदर्भ हवा ]. त्यानंतर सहारा वन दूरचित्रवाहिनीवरील "अदा" या मालिकेत तिला भूमिका मिळाली. तिने झी म्युझिक वाहिनीवरील "बॉलिवुड टुनाइट" या चित्रपट संगीतविषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. ई टीव्ही मराठीवरील "कॉमेडी एक्सप्रेस" (इ.स. २०१०) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिने केले. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाच्या पहिल्या कालखंडात तिने सुमारे साडेतीनशे भागांमध्ये संचालनाची सूत्रे सांभाळली. त्यानंतर काही काळाच्या विरामानंतर जुलै इ.स. २०१२मध्ये तिने "कॉमेडी एक्सप्रेस" कार्यक्रमात सूत्रसंचालनासाठी पुनरागमन केले [२] [३].

चित्रपट-कारकीर्द[संपादन]

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा भूमिका टिप्पणी
इ.स. २००६ गोलमाल मराठी पूर्वा, अपूर्वा जुळ्या व्यक्तिरेखा
इ.स. २००७ मुंबई साल्सा हिंदी नेहा
साडे माडे तीन मराठी मधुरा
हॅटट्रिक
इ.स. २००८ कॉंट्रॅक्ट दिव्या
फूंक हिंदी आरती इ.स. २००९ च्या मॅक्स स्टारडस्ट पुरस्कारांतर्गत "एक्सायटिंग न्यू फेस" पुरस्कारासाठी नामांकित
दोघात तिसरा आता सगळे विसरा मराठी पाहुणी कलाकार
इ.स. २००९ गैर मराठी नेहा
बोम्मयी तमिळ "फूंक" या हिंदी चित्रपटाची तमिळ पुनर्निर्मिती
इ.स. २०१० नटरंग मराठी "आता वाजले की बारा" या गाण्यावरील नृत्यामध्ये प्रमुख सहभाग
फूॅंक २ हिंदी आरती "फूॅंक" मालिकेतला दुसरा चित्रपट
फिल्लम सिटी हिंदी मालती निर्मित्योत्तर प्रक्रियेत
इ.स. २०११ अर्जुन मराठी अनुष्का
झकास मराठी मंजुळा
धूसर मराठी
फक्त लढ म्हणा मराठी पाहुणी कलाकार
इ.स. २०१२ सतरंगी रे मराठी आरजे अलीशा
शाळा मराठी परांजपे बाई
आयना का बायना मराठी शिवानी
इ. स. २०१३ हिम्मतवाला हिंदी मराठी मुलगी "धोका धोका" या गाण्यावरील नृत्यामध्ये सहभाग
इ.स. २०१५ बाजी मराठी गौरी
वेलकम   जिंदगी मराठी मीरा
कट्यार  काळजात  घुसली मराठी झरीना
इ. स. २०१६ वन वे तिकीट मराठी शिवानी
इ. स. २०१७


बस स्टॉप मराठी
इ. स. २०१८ राझी हिंदी मुनीरा सहाय्यक व्यक्तिरेखा
डॅमेज हिंदी लविना
सत्यमेव जयते मराठी सरिता
आणि... डॉ. काशीनाथ घाणेकर मराठी संध्या पाहुणी कलाकार
इ. स. २०१९ चोरीचा मामला मराठी श्रद्धा
मलंग हिंदी टेरेसा रोद्रिगेझ

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ धुरी, संजीवनी. "करामती : बचपन के दिन [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २७ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link]
  2. ^ "पुन्हा एक्सप्रेस मध्ये". २७ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "पुन्हा कॉमेडीच्या 'एक्स्प्रेस'मध्ये चढणार अमृता खानविलकर". २७ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]