Jump to content

चार दिवस सासूचे (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चार दिवस सासूचे
निर्माता बाबुराव बोर्डे, नरेश बोर्डे
निर्मिती संस्था सिद्धिविनायक प्रोडक्शन
कलाकार रोहिणी हट्टंगडी, कविता लाड, पंकज विष्णू
आवाज महालक्ष्मी अय्यर
संगीतकार कौशल इनामदार
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या ११
एपिसोड संख्या ३,१४७
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी ई टीव्ही मराठी
प्रथम प्रसारण २६ नोव्हेंबर २००१ – ५ जानेवारी २०१३
अधिक माहिती
आधी लेक लाडकी ह्या घरची
नंतर ह्या गोजिरवाण्या घरात

चार दिवस सासूचे ही ई टीव्ही मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली आणि सर्वाधिक काळ चाललेली मराठी मालिका आहे. या मालिकेने ३,१४७ एपिसोड पूर्ण करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ३००० पेक्षा जास्त एपिसोड चालणारी पहिली मालिका म्हणून नोंद मिळवली. ही मालिका टाळेबंदीच्या काळात म्हणजेच ३ ऑगस्ट २०२० पासून कलर्स मराठी वाहिनीवर पुनःप्रसारित करण्यात आली.[]

कलाकार

[संपादन]

२०१२ साली कविता लाड यांनी ई टीव्ही मराठीच्या प्रतिस्पर्धी वाहिनी झी मराठीवर समान वेळेची म्हणजेच रात्री ८ची मालिका उंच माझा झोकामध्ये काम करायला सुरुवात केली. यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे त्यांच्याशी त्या मालिकेत काम करण्यावरून काही वाद झाले. त्यामुळे मालिकेची मुख्य नायिका अनुराधा देशमुख म्हणजेच कविता यांनी ही मालिका सोडली. त्यानंतर मालिकेचा टीआरपी कमीकमी होत गेल्यामुळे वाहिनीने ११ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मालिका बंद करायचा निर्णय घेतला. तेव्हा मालिकेच्या अंतिम भागांमुळे कविता यांनी मालिकेत पुन्हा एन्ट्री घेतली.[]

टीआरपी

[संपादन]
आठवडा वर्ष TAM TVT क्रमांक
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा ४६ २००८ ०.८ ८१
आठवडा ४७ २००८ ०.७८ ७२
आठवडा ४९ २००८ ०.८५ ७९
आठवडा ५० २००८ ०.७८ ९७
आठवडा १ २००९ ०.८२ ९२
आठवडा ३ २००९ ०.९८ ७३
आठवडा ४ २००९ ०.८७ ९३
आठवडा ५ २००९ १.० ६९
आठवडा ६ २००९ ०.८७ ८०
आठवडा ९ २००९ ०.९ ८१
आठवडा ११ २००९ ०.७५ ९७
आठवडा १२ २००९ ०.८ ८९
आठवडा १४ २००९ ०.९ ७४
आठवडा १५ २००९ ०.८१ ८६
आठवडा १६ २००९ ०.८१ ९२
आठवडा १७ २००९ ०.७८ ९४
आठवडा १८ २००९ ०.८ ८९
आठवडा १९ २००९ ०.७ ९४
आठवडा २१ २००९ ०.८ ७७
आठवडा २२ २००९ ०.७८ ८९
आठवडा २६ २००९ ०.७८ ८२
आठवडा ३१ २००९ ०.७९ ८०
आठवडा ३३ २००९ ०.८ ८४
आठवडा ५० २००९ ०.७ ९६
आठवडा १७ २०११ १.१५ ९५

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'चार दिवस सासूचे' पुन्हा एकदा..." लोकसत्ता.
  2. ^ "'चार दिवस सासूचे'ला कविताचा रामराम!". दिव्य मराठी.