चर्चा:संभाजी भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संदर्भ देणे आवश्यक केले[संपादन]

मराठी विकिपीडिया सर्वसाधारण वेबसाईट नाही एक ज्ञानकोश आहे. सदर लेखास तब्बल १२ वर्षे होत आली आहेत तरीही लेखात एकसुद्धा संदर्भ नाही आहे. इतिहास विषयक बहुतांश लेखात इतिहास विषयक लेखनात पाळावयाचे संकेत दिले आहेत. प्रमाण ऐतिहासिक साधनांचा वापर करून लेखन करणे आवश्यक असूनही सर्वसाधारण कल दुर्लक्ष करण्याचा आहे. ज्ञानकोशीय दर्जा वृद्धींगत व्हावा ससंदर्भ लेखन व्हावे व चर्चा पानावर मजकुराच्या उल्लेखनीयतेची ससंदर्भ चर्चा व्हावी या दृष्टीने येथून पुढे शुद्ध लेख्नन सुधारणेसाठी आवश्यक असलेले ७० बाईट वगळता अधिकच्या लेखन बदलासाठी मराठी विकिपीडिया पद्धतीने संदर्भ जोडणे आवश्यक केले आहे. संदर्भ कसे जोडावेत याची माहिती या चर्चा पानावर उपलब्ध केली गेली आहे.

ससंदर्भ लेखनासाठी शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:३५, ४ ऑक्टोबर २०१७ (IST)मृत्यूचे ठिकाण[संपादन]

मृत्यूचे ठिकाण लेखात वगवेगळी नमुद झाली आहेत ? लेखास अधिक संदर्भांची आवश्यकता आहे.माहितगार ०८:५७, ६ फेब्रुवारी २०१० (UTC)
संभाजी महाराज-एक उपेक्षित लढवय्या विभागात, विश्वकोशीय लेखन शैलीचे पालन होत नाही तसेच ललीतसाहित्य/कादंबरीतील संदर्भाच्या स्विकार्ह्ते बद्दल साशंक असल्यामुळे उल्लेखनीयता साचा लावला आहे

छत्रपती संभाजी यांच्या अंत्यविधीची माहिती अधिक सविस्तर हवी.[संपादन]

छत्रपती संभाजी यांच्या अंत्यविधीची जबाबदारी जीवावर उदार होऊन महार जातीच्या लोकांनी स्वीकारली . Vijay Gaigawali (चर्चा) १९:४०, ११ जानेवारी २०१७ (IST)

संदर्भ कसे द्यावेत[संपादन]

शेवटी संदर्भ कसे द्यावेत?

१) शक्यतोवर लेखाच्या तळाशी महिरपी कंसातील {{संदर्भयादी}} किंवा {{संदर्भनोंदी}} साचा आहे का याची खात्री करून घ्यावी. नसल्यास लेखाच्या तळाशी {{संदर्भयादी}} किंवा {{संदर्भनोंदी}} पैकी एक साचा लावून घ्यावा.
२) संदर्भ शक्यतोवर लेखातील संबंधीत ओळी नंतर द्यावेत. ते आपोआप लेखाच्या तळाशी {{संदर्भयादी}} किंवा {{संदर्भनोंदी}} जिथे असेल तिथे दिसतील. वस्तुत: संदर्भांचे क्रमांकीकरण आपोआप होते त्यासाठी आपणास काही करावे लागत नाही.
३) दृश्यसंपादन पद्धत (लेखाच्या वर नुसते संपादन लिहिलेले असते-दृष्यसंपादन साहाय्य आपल्या सदस्य चर्चा पानावरही उपलब्ध असते) वापरल्यास 'संदर्भ द्या/उधृत करा' येथून एखादा संदर्भ पहिल्यांदा वापरणे आणि पुन्हा पुन्हा वापरणे सोपे जाते.
४) स्रोत संपादन पद्धत वापरल्यास संपादन खिडकीच्या वरच्या मेनूबार मध्ये एक डावीकडून पाचव्या क्रमांकावर पुस्तकाचे चिन्ह दिसते त्यावर क्लिक केल्यास संदर्भ भरण्यासाठीची एख खिडकी उघडते.
वरचे क्रमांक ३ आणि ४ अधिक सोपे पण प्रत्यक्षात त्यांचे टॅग कसे होतात हे बघण्याची किंवा मॅन्यूअली करण्याची / दुरुस्ती करण्याची इच्छा असेल तर  • एकाच पुस्तकातील वेगवेगळ्या पृष्ठांचे संदर्भ पुन्हा पुन्हा द्यावे लागतात त्यासाठी आणखी काही पद्धती आहेत का ? संदर्भाचा गट बनवणे शक्य आहे का ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:२३, १३ सप्टेंबर २०१७ (IST)

काढलेला मजकूर[संपादन]

प्रारंभी संभाजी महाराजांची समाधी तुळापूर मध्ये आहे असा समज होता. कालांतराने व विषय संदर्भ मिळाल्या नंतर ही मूळ समाधी वढू-बद्रूक येथे असल्याचे वा.सी. बेंद्रे यांच्या ध्यानात आले. व अपार कष्ट करून त्यांनी अखेर संभाजी च्या समाधीचा शोध लावला व आजही तो अनमोल ठेवा फार वाजत गाजत साजरा केला जातो .

हा असलेला मजकूर काढून गोविंद महारांबद्दलचा मजकूर घालण्याचे कारण काय? दोन्ही मजकूर ठेवले पाहिजेत. कृपया पहिला मजकूर पुन्हा घालावा.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १४:५४, ४ जानेवारी २०१८ (IST)

हरकत नाही, करतो. पण संभाजी महाराजांची समाधीचा ठेवा वाजत गाजत साजरा केला जातो??? ते समाधीस्थळ आहे जन्मस्थळ नव्हे.

--संदेश हिवाळेचर्चा १७:३६, ४ जानेवारी २०१८ (IST)

ही हत्या मार्च ११, इ.स. १६८९ रोजी मृत्यूजय अमावस्या भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे करण्यात आली. प्रारंभी संभाजी महाराजांची समाधी तुळापूर मध्ये आहे असा समज होता. कालांतराने व विषय संदर्भ मिळाल्या नंतर ही मूळ समाधी वढू-बद्रूक येथे असल्याचे वा.सी. बेंद्रे यांच्या ध्यानात आले. औरंगजेबाच्या सैन्याद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांची निघृण करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून इतरत्र फेकले. गोविंद गोपाळ गायकवाड (गोविंद महार) या महार सैनिकांने ती फेकलेली तुकडे एकत्र करून, त्यांना शिवून वढू-बद्रूक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते.


हा वरील मजकूर लेखात चढवा, माझ्याकडून अपलोड होत नाही.

--संदेश हिवाळेचर्चा १७:४९, ४ जानेवारी २०१८ (IST)