वढु बुद्रुक
?वढु बुद्रुक महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | शिरूर |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
वढु बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे.
हवामान
[संपादन]येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते.
भौगोलिक स्थान आणि लोकसंख्या
[संपादन]हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील १४७७.७४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १०५६ कुटुंबे व एकूण ५७०० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ३४ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २९५५ पुरुष आणि २७४५ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ३५२ असून अनुसूचित जमातीचे ७५ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५५६३२ [१] आहे.
साक्षरता
[संपादन]- एकूण साक्षर लोकसंख्या: ४१७० (७३.१६%)
- साक्षर पुरुष लोकसंख्या: २२९७ (७७.७३%)
- साक्षर स्त्री लोकसंख्या: १८७३ (६८.२३%)
वढू बुद्रुक १६८९ पूर्वीचे
[संपादन]वढू या गावी छत्रपती शंभूराजांची ११ मार्च १६८९ रोजी हत्या झाली त्या साली वढू गाव कसे होते या बद्दलची माहिती :-
कोरेगावपासून आपटीपर्यतच्या बरोबर मध्यभागी वढू हे गाव येते. याच ठिकाणी औरंगजेबाने एक कारागृह बांधले होते. या कारागृहात छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना ठेवले होते. औरंगजेबचा सरदार सिकंदरखान या कारागृहावर पहारा देत असे (अ. ख.) वढू हे चोहोबाजूंनी २० फुटी उंचीचे दगडी भिंतीची तटबंदी असलेले भुईकोट किल्ल्याप्रमाणे असलेले एक गढीवजा एक गाव होते. गावाच्या पूर्वेला वेस होती, पण गावचा राबता हा मुख्यतः उत्तरेकडील खिडकी दरवाजातून होऊन पाबळ रस्त्यला मिळत असे. आता याचे नाल्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे या भागाला खोलवट म्हणतात. भीमा नदीच्या काठी वसलेले हे गाव. या गावाला वडेश्वर नावाचे प्राचीन यादवकालीन शिवमंदिर होते. या प्राचीन मंदिराचे अवशेष आजही वढू गावच्या पश्चिमेला असणाऱ्या भीमा नदीच्या १५ ते २० फूट पाण्यात खोलवर पाहायला मिळतात. पण आता भीमा नदीवर शंभूसागर या छोट्या धरणामुळे शिवमंदिराचे हे अवशेष पाण्यात बुडालेले आहेत. औरंगजेबच्या अतिक्रमणात हा प्राचीन ठेवा नष्ट झाला आहे. वढू हे गाव साधरण बाराव्या शतकापासून पाबळ सुभ्याचा पुणे व इतर प्रांतांशी व्यापार करणाऱ्या लोकांचे राहण्याचे ठिकाण होते. जवळ असलेल्या पाणवठ्यावर व रोजच्या गरजा भागवण्यासाठी पाणी आणण्यासाठी तसेच वडेश्वर मंदिरात पूजा अशी कामे करण्यासाठी कुंभार वेशीतून एक दरवाजा होता. याच दरवाजातून उन्हाळ्यात भीमा नदीला पाणी नसल्याने, व्यापाराला व दळणवळण चालायला मदत व्हायची पावसाळयात पूर्व दरवाजाचा वापर व्हायचा; पश्चिमेलाही एक दरवाजा होता. तटबंदीच्या आतमध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, भैरवनाथ मंदिर व उधोवाबावा महाराजांसारख्या युगपुरुषाची समाधी आहे. तटबंदीच्या आतच सारा राबता असायचा. रात्री चोहूबाजूचे दरवाजे बंद झाले की सारा गाव पेटीत बंद झाल्याप्रमाणे बंद असायचा. संध्याकाळी खांबांवरील दिवेलागण झाली की गावाला ऐश्वर्य प्राप्त व्हायचे. तटबंदीच्या बाहेरून ओढा वाहत असे. ओढ्याकाठी हजारो वर्षांपूर्वीची वडाची झाडे वाटसरूंना व व्यापार करणाऱ्यांना सावली द्यायचे काम करायची. याच वडांच्या झाडावरूनच गावातील शिवमंदिराचे वडेश्वर हे नाव रूढ झाले. गावात सतीचे मंदिर आहे, या सती विषयी जास्त माहिती उपलब्ध नाही. वढूच्या परिसरात पिरांची थडगी आहेत. गावात छत्रपती संभाजी महाराजांच्या चितेला अग्नी देणाऱ्या वीरांचे स्मारक (वृंदावन) उभारलेले आहे व वीरगळही आहेत.
संदर्भ : शिवछावा संभाजी महाराज
लेखन : श्री संभाजी शिवले
प्रथम आवृत्ती २०१२
वीज
[संपादन]प्रतिदिवस १२ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे.
जमिनीचा वापर
[संपादन]या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
- वन: ६५.५५
- बिगरशेती वापरात असलेली जमीन: ८
- ओसाड व लागवडीला अयोग्य जमीन: १६.७८
- कुरणे व इतर चराऊ जमीन: ४.३९
- फुटकळ झाडीखालची जमीन: ८.१
- लागवडीयोग्य पडीक जमीन: १५.१
- कायमस्वरूपी पडीक जमीन: २२
- सद्यस्थितीतील पडीक जमीन: १२४.८
- पिकांखालची जमीन: १२१३.०२
- एकूण कोरडवाहू जमीन: ८१९.३५
- एकूण बागायती जमीन: ३९३.६७
सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
- कालवे: ११९.२८
- विहिरी / कूप नलिका: १७५.२
- ओढे: ५१४.८७
- इतर: १०
उत्पादन
[संपादन]या गावात वस्तूंचे उत्पादन होते: