कोनवडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?कोनवडे
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —

१६° २२′ १५.९६″ N, ७४° ०८′ १८.९६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
३.३४१७ चौ. किमी[१]
• ५६९ मी
जिल्हा कोल्हापूर
लोकसंख्या
घनता
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
२,२८२[२] (२०११)
• ६८३/किमी
८०.९५ %
• ९०.८१ %
• ७०.२८ %
सरपंच सौ. राणी स. पाटील
उपसरपंच प्रा. श्री. हिंदुराव रा. पाटील
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१६२०९
• +०२३१
• MH-09

गुणक: 16°22′16″N 74°08′19″E / 16.371111°N 74.138611°E / 16.371111; 74.138611{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.

कोनवडे हे कोल्हापूर जिल्ह्यामधील भुदरगड तालुक्यातील एक गाव आहे.[३] २०११च्या जनगणनेनुसार २२८२ लोकसंख्या असलेले हे गाव वेदगंगा नदीच्या किनारी वसले आहे.[४]

लोकसंख्या[संपादन]

कोनवडे हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातील ३३४.१७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ४७५ कुटुंबे व एकूण २२८२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर मुरगुड ११ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ११९० पुरुष आणि १०९२ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक २०८ आहेत.ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५६७७५३ [५] आहे.

साक्षरता[संपादन]

 • एकूण साक्षर लोकसंख्या: १६७८
 • साक्षर पुरुष लोकसंख्या: ९७८ (८२.१८%)
 • साक्षर स्त्री लोकसंख्या: ७०० (६४.१%)

शैक्षणिक सुविधा[संपादन]

गावात दोन शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, एक शासकीय प्राथमिक शाळा व एक शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. सर्वात जवळील माध्यमिक शाळा ही मुधाळ येथे ४ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळाही मुधाळ येथेच असून सर्वात जवळील पदवी महाविद्यालय बिद्री येथे सुमारे ८ किलोमीटर अंतरावर आहे.

प्रमुख व्यवसाय[संपादन]

शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय असून नानाविध प्रकारची पिके येथे घेतली जातात. पाण्याची मुबलक उपलब्धता आणि सुपीक जमिन यामुळे प्रामुख्याने ऊस हे पीक येथे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पशुपालनही मोठ्या प्रमाणात असून विशेषतः गाय, म्हैस आणि शेळी यांसारखे दुभते प्राणी मोठ्या प्रमाणात पाळले जातात. या प्राण्यांपासून दररोज हजारो लिटर दूध उत्पादित केले जाते.[६] शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने येथे शेतीपूरक व्यवसाय जसे की गूळ निर्मिती, दुग्धजन्य पदार्थ बनविणे, फळांचे विविध पदार्थ बनवणे यांसारखे कुटिरोद्योग/लघुउद्योग अल्प प्रमाणात दिसून येतात. दक्षिणेकडे बारमाही वाहणारी वेदगंगा नदी आणि उत्तरकडे असलेला कालवा यामुळे वर्षभर शेतीसाठी आणि पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते. त्याचप्रमाणे विहिरी आणि तलाव यांच्या माध्यमातून केलेले भूजलाचे उपयोजनही काही ठिकाणी दिसून येते. पक्क्या विटा बनविण्यासाठी आवश्यक असणारी मृदा उपलब्ध असल्याने वीट निर्मितीचा व्यवसायही येथे काही प्रमाणात दिसून येतो.

सांस्कृतिक[संपादन]

यमाई मंदिर.jpg

विविध सांस्कृतिक आणि परंपरागत चालत आलेले सण येथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. विशेषतः येथील स्थानिक देवता असलेल्या 'यमाईदेवी'ची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, त्याचप्रमाणे घोडे, बैल यांसारख्या जनावरांच्या शर्यतींचेही आयोजनही केले जाते. दसऱ्याच्या काळात पत्ते आणि जुगार खेळण्याची आगळीवेगळी आणि इतरत्र फारशी न आढळणारी अनोखी अशी प्रथा येथे बऱ्याच काळापासून चालत आली आहे. या काळात लोक एकत्र येऊन विविथ प्रकारचे पत्यांचे खेळ खेळतात.

जमिनीचा वापर[संपादन]

कोनवडे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):

 • वन: ९.६३
 • बिगरशेती वापरात असलेली जमीन: २.७
 • ओसाड व लागवडीला अयोग्य जमीन: १८.३६
 • कुरणे व इतर चराऊ जमीन: ५.२९
 • लागवडीयोग्य पडीक जमीन: १२.२४
 • पिकांखालची जमीन: २८५.९५
 • एकूण कोरडवाहू जमीन: ८१.८२
 • एकूण बागायती जमीन: २०४.१३

सिंचन सुविधा[संपादन]

सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):

 • कालवे: १
 • विहिरी / कूप नलिका: १२
 • इतर: ४९.८२

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "Konvade Population - Kolhapur, Maharashtra".
 2. ^ "Konvade Population - Kolhapur, Maharashtra".
 3. ^ "Konvade".
 4. ^ "Konvade Population - Kolhapur, Maharashtra".
 5. ^ http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/DCHB.html
 6. ^ "Agricultural status of Konvade village".