केळवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

केळवे किंवा केळवा हे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव पालघरपासून १२ किमी दक्षिणेस आहे. येथील पुळण प्रसिद्ध असून तेथे पर्यटकांसाठीच्या सोयी आहेत.

  ?केळवे
महाराष्ट्र • भारत

१९° ३६′ ५३.६४″ N, ७२° ४४′ ०९.९६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पालघर
लोकसंख्या १६,२८९ (२०११)
भाषा मराठी
सरपंच/उपसरपंच भावना किणी /सदानंद राऊत.
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०१
• +०२५२५
• एमएच४८
संकेतस्थळ: goo.gl/maps/qzV5jFzuJMH2

तारापूर अणुऊर्जा केंद्र आणि तारापूर औद्योगिक वसाहत तसेच रिलायन्सचे औष्णिक विद्युत केंद्र येथून ३० किमी अंतरावर आहेत.

नाव[संपादन]

इथे असलेल्या केळीच्या बागांमुळे ह्या गावाला केळवे नाव पडले आहे.

इतिहास[संपादन]

महिकावती उर्फ केळवा-माहीम गावाचा भाग असलेला हा गाव कालांतराने लोकसंख्या वाढल्याने वेगळा केला गेला व केळीच्या बागायती पिकांमुळे केळवा केळवे म्हणून ओळखला जाऊ लागला.

हे गाव शितलादेवी मंदिरासाठी फार प्रसिद्ध अाहे आणि हे मंदिर पुरातन आहे. गावात समुद्र किनाऱ्यावर असलेल्या सुरुच्या बागेत एक भुईकोट आहे. गेली अनेक वर्षे हा किल्ला वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेलेला होता. हल्ली काही दुर्गमित्रांच्या सहकार्याने हा किल्ला वाळूचे ढिग उपसून बाहेर काढण्यात यश मिळालेले आहे.

भुगोल[संपादन]

केळवे गावाच्या दक्षिणेस भादवे, दांडा,मधुकरनगर,भवानगड,चटाळे,एडवण, मथाणे, दातिवरे,उसरणी,आगरवाडी तर्फे माकुणसार, कोरे, गावे तर पूर्वेस माकुणसार, रामबाग गावे व केळवा रोड रेल्वे स्थानक आहे.

लोकजीवन[संपादन]

येथील लोक मेहनती, मनमिळाऊ, एकजुटीने राहणारे, व आदरातिथ्यशील आहेत.सतत नवनवीन प्रयोग करणारे इथले शेतकरी केळीच्या पिकाबरोबर पानवेलीचे पीकही भरपूर प्रमाणात घेतात. आले, हळद,कोनफळ, अनेक प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्या ह्यांचे उत्पादन ही येथे रब्बी हंगामात घेतले जाते. केळवे भुमी कवींची व लेखकांची म्हणून ओळखली जाते.येथे मुख्यतः मराठी प्रमाणभाषेबरोबर वाडवळी, भंडारी, आगरी,मांगेली बोलीभाषा बोलल्या जातात.

लोकसंस्कृती[संपादन]

दरवर्षी येथे केळवे किनारा पर्यटन उत्सव साजरा केला जातो. लोकपरंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती सहजपणे जपल्या जातात आणि त्यांचा पुढील पिढीत प्रचार व प्रसार होतो. समुद्राला लागूनच असलेल्या भव्य पटांगणात महोत्सवाचे आयोजन केले जाते.विविध प्रकारची दुकाने, पर्यटनसंबंधी व सर्व सामान्यांना लागणारी चीजवस्तू,तसेच पारंपरिक खाद्यपदार्थ मंडपात सजवले जातात.स्थानिक खाद्यपदार्थ पोतेंडी, उकडहंडी, ओतवलीरोटी, आळुवडी, पातवडी, मुठे,दुधलाडू, रवळीचीरोटी,खीररोटी,तसेच आगरी-वाडवळी मटण, रस्सा, कोंबडीवडे,ताज्या माश्यांचे विविध प्रकार,गावठी कोंबडी, आणि मुस्लिम, भंडारी, मच्छीमार, आदिवासी समाजातील विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भरपूर प्रमाणात खवैयासाठी उपलब्ध असतात.विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यटन परिसंवाद,लोकनृत्य, लोकगीते,पारंपरिक लग्नगीते असा विविधरंगी कार्यक्रमाने महोत्सव उत्साहपूर्ण आणि जोशात साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी केळवे-माहीम किल्ले विजय दिनसुद्धा साजरा केला जातो.

नागरी सुविधा[संपादन]

इथे ग्रामपंचायत द्वारे सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा,सार्वजनिक प्रकाशव्यवस्था केली जाते. केळवे बाजार ते केळवे रोड रेल्वे स्थानक तसेच पालघर रेल्वे स्थानक जाण्यासाठी नियमित बससेवा व अॉटोरिक्शा उपलब्ध आहेत.येथे बॅंकेतील पैसे काढण्यासाठी स्वयंचलित टेलर मशीनची सोय आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

भवानगड किल्ला

दांडा किल्ला/जंजिरा

संदर्भ[संपादन]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc

३. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

४. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

५.

http://tourism.gov.in/

६. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

७.

https://palghar.gov.in/ ८. https://palghar.gov.in/tourism/