भादवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?भादवे Bhadave
महाराष्ट्र • भारत
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर सफाळे
लोकसंख्या ६३४ (२०११)
भाषा मराठी
सरपंच सौ. चेतना चंद्रकात वैद्य
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०११०२
• +०२५२५
• एमएच४८
http://chetan2thakur.wixsite.com/bhadave

भादवे (Bhadave) हे भारतातल्या महाराष्ट्र राज्याच्या उत्तर कोकणातल्या पालघर जिल्ह्यात, पालघर तालुक्यातल्या सफाळे शहराच्या जवळ असणारे एक गाव आहे. या गावामध्ये पूर्वी भात म्हणजे तांदूळ याचे उत्पादन खूप जास्त असल्याकारणाने गावाचे नाव भादवे असल्याचे म्हंटले जाते.

भौगोलिक स्थान[संपादन]

भादवे हे सफाळे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ४० मार्गाने १२ किमी अंतरावर चटाळे व त्यानंतर उसरणी गावानंतर वसलेले आहे. गावाला लागून खाडीचा समतल खाजण असून ४ किमी अंतरावर अरबी समुद्र आहे.

हवामान[संपादन]

येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.

इतर ठळक माहिती[संपादन]

हवामानाचा विचार करता या गावामध्ये राजने, जांभळे, ताडगोळे, करवंद असा रानमेवा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. गावामधील प्राथमिक जिल्हा परिषद शाळा भादवे स्थापना १७ एप्रिल १९१८ या शाळेने १०० वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. गावामधील विविध व्यक्ती हे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, साहित्यिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात ठसा उमटविलेले आहेत. या गावाला मोठा इतिहास लाभलेला आहे याचे संदर्भ गावातील काही व्यक्तींनी नमूद केलेल्या लिखाणात तसेच गावातील शाहीर श्री. गजानन वैद्य यांच्या काव्य रचनेतून शाहिरीबाण्याद्वारे उमटते.

लोकजीवन[संपादन]

येथे मुख्यतः कुणबी समाजातील लोकांची शतकानुशतके वस्ती आहे. कुणबी समाजातील लोकांबरोबर काही प्रमाणात आदिवासी लोकांची वस्तीसुद्धा फार पूर्वीपासून आहे. येथील साक्षरता ९१ टक्के आहे. पुरुष साक्षरता ९६ टक्के तर महिला साक्षरता ८७ टक्के आहे. गावामधील अनेक लोक उपजीविकेसाठी मुंबई आणि मुबई उपनगरांमध्ये नोकरीसाठी दररोज प्रवास करतात. गावामध्ये भवानी देवीचे मंदिर, शंकराचे मंदिर, हनुमंताचे मंदिर असून गावाच्या वेशीला मड्डोबा, वाकडा आंबा, शेडया ही श्रद्धेची ग्रामदेवतांची मंदिरे आहेत. गावामधील ४०% लोकसंख्या गाव सोडून शहरांमध्ये स्थायिक झाली आहे.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. सार्वजनिक रस्तेवीज,स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा ह्या सोयी ग्रामपंचायत पुरविते. गावामध्ये भादवे गाव - वाचनालय आणि अभ्यासिका नावाचे मोफत वाचनालय उपलब्ध आहे त्याद्वारे तरुणपिढी एकत्र येऊन विविध उपक्रम आयोजित करीत असते. गावामध्ये साजरे होणारे सण पारंपरिक पद्धतीने एकत्रितरीत्या साजरे केले जातात. भातशेती सोबत काहीप्रमाणात भाजीपाला व्यवसाय तसेच जोडधंदा म्हणून मत्स्य व्यवसाय, पशू पालन आणि दुग्ध व्यवसाय गावामध्ये केले जातात. सफाळे रेल्वे स्थानकावरून भादवे गावासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या नियमित बससेवा आहेत. भादवे गावात जाण्यासाठी ऑटोरिक्षा (डमडम) दिवसभर उपलब्ध असतात.

संदर्भ[संपादन]

१. [१]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc

  1. ^ [१]