रामबाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामबाग

नाव[संपादन]

भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याच्या पालघर तालुक्यात हे गाव आहे.

इथे असलेल्या राममंदिरामुळे गावाचे नाव रामबाग असे पडले आहे.

  ?रामबाग
रामबाग
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर सफाळे
जिल्हा पालघर
कोड
आरटीओ कोड

• महा४८
अधिकृत भाषा मराठी

इतिहास[संपादन]

माकूणसार गावातील काही लोक शेती बागायती करण्यासाठी हंगामात आपल्या शेतात तात्पुरते निवारे बांधून शेती बागायती व्यवसाय करीत.कालांतराने तात्पुरते निवारे कायम वसतिस्थाने होऊन तिथे सिमेंट कॉन्क्रीटची घरे बांधली गेली. ह्यातील काही पद्मनाभ पंथी सज्जनांनी लक्ष्मण म्हात्रे ह्यांच्या पुढाकाराने रामाचे देऊळ बांधले आणि ते येथे कायमचे रहिवासी झाले.ह्या राममंदिराला सन २०१९ला ५२ वर्षे (१९६७) पूर्ण झाली आहेत. आजूबाजूला वस्ती वाढून माकूणसार गावापासून अलग असे रामबाग गाव तयार झाले.

भुगोल[संपादन]

रामबाग पासून सफाळे रेल्वे स्थानक २ किमीवर आहे.रामबाग सफाळे रस्त्यावर डावीकडे नवीन वळणवाडी गाव वसलेले आहे. रामबाग सफाळे रस्त्यावर उजवीकडे काही अन्य गावे आहेत. रामबाग माकूणसार रस्त्यावर डावीकडे विराथन बुद्रुक, चटाळे गावात जाण्यासाठी कच्च्या सडका आहेत.

लोक जीवन[संपादन]

येथील लोक धार्मिक, कष्टाळू, प्रामाणिक, मेहनती,जिद्दी, समाधानी आहेत. मुख्यतः वाडवळ, भंडारी, मांगेले, कोळी समाजाचे येथे वास्तव्य आहे.

नागरी सुविधा[संपादन]

ग्रामपंचायतीने सार्वजनिक वीजबत्ती,पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारेबांधणी,सार्वजनिक स्वच्छता, प्राथमिक आरोग्य,प्राथमिक शिक्षण व्यवस्था उपलब्ध केलेली आहे.सफाळे रेल्वे स्थानकावरून रामबागला येण्यासाठी एसटी बसेसची सोय आहे.रिक्षानेसुद्धा येथे येता येते. सफाळे स्थानकावरून पश्चिमेला माकूणसार, आगरवाडी,चटाळे, उसरणी, एडवण, मथाणे,केळवे, पालघर ठिकाणी जाणाऱ्या सर्व बसेस रामबागला थांबतात.शिधावाटप केंद्र माकुणसार येथे आहे.

हेही पाहा[संपादन]

वळणवाडी एकवीरा देवी मंदिर.

संदर्भ[संपादन]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc ३. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html ४. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ ५. http://tourism.gov.in/ ६. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 ७. https://palghar.gov.in/ ८. https://palghar.gov.in/tourism/