मधुकरनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मधुकरनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातले गाव आहे. हे गाव दांडा गावाला लागूनच आहे.हे गाव उत्तर कोकणात येते.


  ?मधुकरनगर
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
गुणक: 19°36′N 72°50′E / 19.60°N 72.83°E / 19.60; 72.83
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पालघर
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०११०२
• +०२५२५
• महा ४८

गुणक: 19°36′N 72°50′E / 19.60°N 72.83°E / 19.60; 72.83

नाव[संपादन]

मधुकरनगर हे नाव गावातील सामाजिक कार्य करणाऱ्या व गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या मधुकर नावाच्या प्रतिष्ठित समाजसेवकावरून ठेवलेले आहे.

इतिहास[संपादन]

पूर्वी हे गाव भवानगडच्या हद्दीत होते परंतु कालांतराने लोकसंख्या वाढल्याने वेगळ्या गावाचा दर्जा मिळून मधुकरनगर म्हणून नावारूपास आले.

भूगोल[संपादन]

ह्या गावाला लागूनच भवानगड किल्ला आहे.

हवामान[संपादन]

येथील हवामान उन्हाळ्यात उष्ण व दमट असते तर हिवाळ्यात सुखद गार असते. पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडतो, परंतु जमीन जांभा मुरूम मिश्रित असल्याने पाणी साचत नाही. पावसाळ्यातसुद्धा हवामान उष्ण असते.

वाहतूक व्यवस्था[संपादन]

येथे येण्यासाठी सफाळे रेल्वे स्थानकावरून किंवा केळवेवरून एसटी बसची तसेच ऑटोरिक्षाची सोय आहे. सफाळे रेल्वे स्थानकापासून मधुकरनगर १० किमी अंतरावर आहे. केळवे गावापासून दांडा खाडी मार्गाने हे गाव ४ किमीवर येते.

नागरी सुविधा[संपादन]

ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक आरोग्य, रस्ते, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, स्वच्छता इत्यादी गोष्टीची तजवीज केली जाते.गावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी आगरवाडी,सफाळे,केळवे गावी जावे लागते. उच्चमाध्यमिक शिक्षण, न्यायालय, तहसील कार्यालय, जिल्हा कार्यालय, इत्यादी गोष्टींसाठी पालघर या जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते.

लोकजीवन[संपादन]

मधुकरनगर गावात मुख्यतः वाडवळ समाजातील लोक पिढ्यानपिढ्या राहतात. ते खरीप हंगामातील भातशेती बरोबरच रब्बी हंगामात कांदा, आले, हळद, इत्यादींचे तसेच पडवळ, कारले, दुधी भोपळा, इत्यादी फळभाज्यांचे उत्पादन घेतात. बरेच लोक नोकरी, व्यवसाय, धंदा, व्यापार करण्यासाठी मुंबई, पालघर, विरार, वसई, वापी, बोईसर येथे रोज ये-जा करीत असतात; नोकरी सांभाळून सुट्टीच्या दिवशी शेती बागायती करीत असतात.

हे सुद्धा पहा[संपादन]

भवानगड किल्ला

दांडा खाडी किल्ला

पुरातन शिवमंदिर

शितळादेवी मंदिर

संदर्भ[संपादन]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc

बाह्य दुवे[संपादन]