Jump to content

एस्पिरितो सांतो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एस्पिरितो सांतो
Espírito Santo
ध्वज
चिन्ह

एस्पिरितो सांतोचे ब्राझील देशाच्या नकाशातील स्थान
एस्पिरितो सांतोचे ब्राझील देशामधील स्थान
देश ब्राझील ध्वज ब्राझील
राजधानी व्हितोरिया
क्षेत्रफळ ४६,०७७ चौ. किमी (१७,७९० चौ. मैल) (क्रम: २३ वा)
लोकसंख्या ३८,८५,०४९ (क्रम: १५ वा)
घनता ८४ /चौ. किमी (२२० /चौ. मैल) (क्रम: ७ वा)
आय.एस.ओ. ३१६६-२ BR-ES
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
संकेतस्थळ http://www.es.gov.br

एस्पिरितो सांतो (पोर्तुगीज: Espírito Santo) हे ब्राझील देशाचे एक राज्य आहे. हे राज्य ब्राझीलच्या आग्नेय भागात स्थित असून त्याच्या पूर्वेला अटलांटिक महासागर तर उर्वरित दिशांना ब्राझीलची इतर राज्ये आहेत. व्हितोरिया ही एस्पिरितो सांतो राज्याची राजधानी आहे. पर्यटन हे येथील मोठे आकर्षण आहे. हे आग्नेय भागात स्थित आहे याची सीमा अटलांटिक महासागर, पूर्वेला बाहीया उत्तरेला मिनास जेराईस व पश्चिम राज्य रियो दि जानेरो दक्षिणेस आहे. हे ब्राझीलमधील चौथे सर्वात लहान राज्य आहे. युरिको दि ॲग्विलार सालेस विमानतळ येथील प्रमुख विमानतळ आहे.

इतिहास

[संपादन]

सुरुवातीला या प्रदेशात अनेक स्थानिक आदिवासींचे वास्तव्य होते. भागातील जमातींना बोटोकुडोस असे म्हणले गेले. ते शेती करत असत आणि यांचे समाज जीवन ही एक उत्क्रान्त समाज रचना होती. त्यांनी १७ व्या शतकाच्या मध्यापर्यंत छोट्या युद्धांसह गनिमी कावा करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आणि युरोपियन वसाहतवादास विरोध केला.

युरोपियन वसाहतवाद

[संपादन]

१५३५ रोजी, पोर्तुगीज कुलीन वास्को फर्नांडिस कौटिन्हो, आफ्रिका आणि भारतातील मोहिमेतील एक अनुभवी असलेला कप्तान या भूमीवर उतरला. पोर्तुगीज आक्रमक एस्परिटो सॅंटो कॅप्टनसीमध्ये आले आणि प्रान्हा प्रदेशात उतरले. त्या वेळी, विला डो एस्परिटो सॅंटो नावाच्या पहिल्या गावात प्रथम स्थाईक होण्याचे काम सुरू झाले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: