इ.स. १९६१
Appearance
(ई.स. १९६१ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे |
वर्षे: | १९५८ - १९५९ - १९६० - १९६१ - १९६२ - १९६३ - १९६४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना व घडामोडी
[संपादन]जानेवारी-जून
[संपादन]- जानेवारी ३ - अमेरिकेने क्युबाशी संबंध तोडले.
- जानेवारी २० - जॉन एफ. केनेडी अमेरिकेच्या अध्यक्षपदी.
- फेब्रुवारी १४ - १०३ क्रमांकाचा मूलभूत पदार्थ, लॉरेन्सियमची प्रथमतः निर्मिती.
- फेब्रुवारी १५ - सबिना एर फ्लाइट ५४८ हे विमान बेल्जियममध्ये कोसळले. ७३ ठार. मृतांत अमेरिकेचा संपूर्ण फिगर स्केटिंग संघ व त्यांचे मार्गदर्शक.
- मार्च १ - अमेरिकेत शांति दलाची स्थापना.
- मार्च १ - युगांडात निवडणुका.
- मार्च ३ - हसन दुसरा मोरोक्कोच्या राजेपदी.
- एप्रिल ११ - बॉब डिलनने आपली गायकीची सुरुवात केली.
- एप्रिल १२ - सोवियेत संघाचा युरी गागारिन अंतराळात जाणारा प्रथम माणूस झाला.
- एप्रिल १७ - पिग्सच्या अखातातील आक्रमण - क्युबाच्या फिदेल कास्त्रोची राजवट उलथवण्यासाठी सी.आय.ए. कडून प्रशिक्षित हल्लेखोर क्युबात उतरले.
- एप्रिल १९ - पिग्सच्या अखातातील आक्रमण - घुसखोरांचा पराभव.
- एप्रिल २७ - सियेरा लिओनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- मे ५ -ऍलन बी. शेपार्ड पहिला अमेरिकन अंतराळयात्री.
- मे २५ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीने "दशक संपायच्या आत चंद्रावर माणूस" पाठवण्याची घोषणा केली.
- मे ३१ - दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक झाले.
- मे ३१ - दक्षिण आफ्रिका ब्रिटिश राष्ट्रकुलातून बाहेर.
- जून १९ - कुवैतला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
जुलै-डिसेंबर
[संपादन]- जुलै १२ - पुण्यात पानशेत व खडकवासला धरण फुटल्यामुळे पूर.
- जुलै २० - कुवैतला अरब संघचे सदस्यत्व.
- डिसेंबर १९ - भारतीय लश्कराने गोवा, दमण व दीवची पोर्टुगीझ अमलातून मुक्तता केली.
जन्म
[संपादन]- मार्च ११ - ब्रूस वॅटसन, रॉक गिटारवादक.
- मार्च ११ - माइक पर्सी, रॉकवादक.
- मे ८ - रियाझ पूनावाला, संयुक्त अरब अमिरीतीचा क्रिकेट खेळाडू.
- जून ९ - मायकेल जे. फॉक्स, अमेरिकन अभिनेता.
- जुलै २१ - अमरसिंग चमकीला, पंजाबी गायक.
- ऑगस्ट १ - मायकेल वॅटकिन्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ४ - बराक ओबामा, अमेरिकन राजकारणी.
- सप्टेंबर २५ - टिम झोहरर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २ - ऍलन वेल्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ५ - डेरेक स्टर्लिंग, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- जानेवारी १७ - पॅट्रिस लुमुम्बा, कॉॅंगोचा पंतप्रधान.
- मार्च ७ - गोविंद वल्लभ पंत, भारताचे दुसरे गृहमंत्री.
- मे ३० - रफायेल लिओनिदास त्रुहियो, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा हुकुमशहा.
- जून ६ - कार्ल गुस्टाक युंग, स्विस मानसशास्त्रज्ञ.