बॉब डिलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Bob Dylan Barcelona.jpg

बॉब डिलन तथा रॉबर्ट ॲलन झिमरमन (२४ मे, इ.स. १९४१:डुलुथ, मिनेसोटा, अमेरिका - ) हा अमेरिकन गीतकार आणि संगीतकार आहे. पन्नास वर्षांपेक्षा अधिक कारकीर्द असलेला डिलन विसाव्या शतकातील पाश्चात्य संगीतावर प्रभाव असणाऱ्यांपैकी एक गणला जातो. त्यानी रचलेली अनेक गीते अमरिकेतील नागरी हक्क आंदोलन आणि व्हियेतनाम युद्धविरोधी आंदोलनांमध्ये वापरली गेली. डिलनने कंट्री, फोक, ब्लूझ, रॉक अँड रोल, गॉस्पेल अशा अनेक प्रकारचे संगीत रचले आहे. २०१२मध्ये बराक ओबामाच्या हस्ते डिलनला प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम हा अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.