कश्यप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आंध्र प्रदेशातील कश्यप पुतळा

कश्यप हे वैदिक आणि हिंदू पौराणिक साहित्यात निर्देशिलेला एक सुविख्यात ऋषी होते. ब्रह्मदेवाच्या अष्टमानसपुत्रांपैकी एक असलेल्या मरीचि ऋषींचा ते पुत्र होते. दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांशी याचा विवाह झाला होता आणि त्यांच्यापासून देव, असुर, दानव, नाग, मानव यासारख्या सृष्टीतील सर्व व्यक्तिमात्रांची उत्पत्ती झाल्याची कथा ब्रह्माण्ड पुराणात व भागवत् पुराणात सापडते. कश्यप हे कश्यपवंशीय आणि कश्यपगोत्रीय ब्राह्मणांचा मूळपुरुष मानला जातात. कश्यप हे हिंदू पौराणिक कथांमध्ये उल्लेखलेल्या सप्तर्षींपैकी एक ऋषी होते.

नामव्युत्पत्ती[संपादन]

अथर्ववेदाच्या मते 'कश्यप' या नावाचा अर्थ शब्दशः 'कासव' असा होतो. शतपथ ब्राह्मणात 'कूर्म' म्हणजेच 'कासव' या अर्थाने 'प्रजापति' अशा कश्यपाचा निर्देश आढळतो. या ब्राह्मणात, तसेच अथर्ववेद, सामवेद या उत्तरकालीन वैदिक साहित्यात कश्यपाचा 'प्रजापति', सृष्टीतील प्राणिमात्रांचा आद्य जनक मानले आहे.

कश्यपाविषयीचे वैदिक, पौराणिक उल्लेख[संपादन]

उत्पत्ती[संपादन]

महाभारतातील आदिपर्वानुसार कश्यप हा मरीचि ऋषी आणि कर्दमाची कन्या कला यांचा पुत्र होता. मरीचि ऋषी आणि कला यांच्या कश्यप व पूर्णिमा या दोन पुत्रांपैकी कश्यप थोरला होता. वायुपुराणात कश्यपाला ऊर्णा नामक सावत्र आईपासून झालेले अन्य सहा सावत्र भाऊ होते असा उल्लेख आहे. अग्निष्वात्त पितर हेदेखील त्याचे भाऊ होते. याखेरीज त्याला सुरूपा नावाची एक बहीण असून तिचा विवाह अंगिर‍स्‌ ऋषींशी झाला होता.

गरुड आणि अरुण यांची जन्मकथा[संपादन]

कश्यप पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला, तेव्हा त्या यज्ञास देव, गंधर्व ऋषी यांनी साह्य केले. या कार्यात उत्साहाने साह्य करीत असलेल्या वाल्यखिल्य ऋषींचा इंद्राने उपमर्द केला. त्यामुळे वाल्यखिल्यांनी नवा इंद्र निर्माण करण्यासाठी तपश्चर्या आरंभली. तेव्हा इंद्र कश्यपाला शरण गेला. कश्यपाने वाल्यखिल्यांची समजूत घातली. कश्यपाच्या प्रयत्नांमुळे वाल्यखिल्यांचे मन वळले आणि त्यांनी नव्या इंद्राच्या निर्मितीसाठी जमवेलेले तपोबल कश्यपास दिले. त्या तपोबलामधून कश्यपपुत्र गरुड आणि अरुण यांची उत्पत्ती झाली.

सर्पसत्र शापामुळे दुःख[संपादन]

अकरा रुद्रांची अवतारकथा[संपादन]

शिवपुराणाच्या शतरुद्रसंहितेत कश्यपाखातर शंकराने अकरा रुद्रावतार धारण केल्याची कथा आहे. देव-दैत्य युद्धात एकदा दैत्यांनी इंद्रादि देवांचा पराभव केला, तेव्हा सर्व देव कश्यपास शरण गेले. कश्यपाने देवांच्या संरक्षणार्थ शंकराची तपस्या केली. शंकरास प्रसन्न करून त्यांनी देवांना रक्षण करण्याची विनंती केली. तेव्हा शंकराने कश्यपाची पत्नी सुरभि हिच्या पोटी अकरा अवतार घेऊन दैत्यांचा संहार केला.

पद्म पुराणातील गंगावतरण आख्यायिका[संपादन]

पद्म पुराणाच्या उत्तरखंडात गंगा नदी कश्यपामुळे भूतलावरील अवतरल्याची आख्यायिका दिली आहे. अर्बुद पर्वतावर कश्यप तपश्चर्या करत होते तेव्हा तेथील ऋषिवृंदाने त्यांना भूतलावर गंगा नदी आणण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी शिवाची आराधना करून गंगा पृथ्वीवर आणली. पृथ्वीवर गंगा जिथे अवतरली ते स्थान 'कश्यपतीर्थ' या नावाने ओळखले जाते. गंगेच्या अवतरणानंतर ते गंगेला स्वतःच्या आश्रमस्थानी घेऊन गेले. आश्रमाजवळील ते स्थान 'केशवरंध्रतीर्थ' या नावाने ओळखले जाते.
कश्यपाने गंगेला भूतलावर आणले म्हणून ती कश्यपाची कन्या आहे असे मानून तिला 'काश्यपी' हे नामाभिधान प्राप्त झाले. पुढील युगांत हीच नदी 'कृतवती', 'गिरिकर्णिका', 'चंदना', 'साभ्रमती' या नावांनी ओळखली जाऊ लागली.

पृथ्वीरक्षण[संपादन]

पौराणिक साहित्यातील संवाद[संपादन]

परिवार[संपादन]

कश्यपाने दक्ष प्राचेतस प्रजापतीच्या तेरा कन्यांशी विवाह केला होता. महाभारतानुसार त्यांची नावे अशी आहेत:
अदिति, दिति, दनु, काला, दनायु, सिंहिका, क्रोधा, प्राधा, विश्वा, विनता, कपिला, मुनि, कद्रू

संदर्भ[संपादन]

  • 'भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (खंड १) - डॉ. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव - 'भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे ४'

सप्तर्षी
अत्रीभारद्वाजगौतमजमदग्नीकश्यपवसिष्ठविश्वामित्र