महाराष्ट्र एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराष्ट्र एक्सप्रेसचा नामफलक
महाराष्ट्र एक्सप्रेस मार्गे

महाराष्ट्र एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान धावणारी रेल्वेगाडी आहे. ही रेल्वे पूर्णपणे महाराष्ट्र राज्यात धावत असून इतर राज्यांची नावे दिल्या गेलेल्या केरळ एक्सप्रेस, तमिळनाडू एक्सप्रेस, कर्नाटक एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस इत्यादी गाड्यांप्रमाणे ती नवी दिल्लीपर्यंत धावत नाही.

मार्ग[संपादन]

महाराष्ट्र एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूरगोंदिया ही आहेत.

रेल्वे क्रमांक[१][संपादन]

  • ११०३९ (डाऊन): कोल्हापूर - १५:३०वा, गोंदिया - २०:१५ वा (दुसरा दिवस)
  • ११०४० (अप): गोंदिया - ८:२०वा, कोल्हापूर - १२:४५ वा (दुसरा दिवस)

संदर्भ[संपादन]