Jump to content

सटाणा तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सटाणा तालुका
बागलाण तालुका

20.598224 / 74.203258
राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा नाशिक जिल्हा
जिल्हा उप-विभाग कळवण उपविभाग
मुख्यालय सटाणा

क्षेत्रफळ १४७७ कि.मी.²
लोकसंख्या ३,११,३९५ (२००१)
शहरी लोकसंख्या ३२,०००
साक्षरता दर ५८%

प्रमुख शहरे/खेडी नामपूर, ताहाराबाद, जायखेडा, लखमापूर,डांगसौंदाणे,इ.
तहसीलदार जितेंद्र इंगळे
लोकसभा मतदारसंघ धुळे (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ बागलाण विधानसभा मतदारसंघ
आमदार श्री. दिलीप मंगळु बोरसे
पर्जन्यमान ४२५ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


सटाणा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे.

तालुक्यातील गावे

[संपादन]
  1. आजंदे
  2. अजमीरसौंदाणे
  3. आखतवाडे
  4. आलियाबाद (सटाणा)
  5. अंबापूर (सटाणा)
  6. अंबासन
  7. आनंदपूर (सटाणा)
  8. अंतपूर (सटाणा)
  9. आरई
  10. आसखेडा
  11. औंदाणे
  12. आव्हाटी
  13. बाभुळणे
  14. बहिराणे
  15. भदाणे (सटाणा)
  16. भाक्षी
  17. भावनगर (सटाणा)
  18. भावडे भिलदर भिलवाड भिमखेत भिमनगर (सटाणा) भुयाणे बिजोरसे बिजोटे बिलपुरी बोधारी बोरडईवाट बोऱ्हाटे ब्राम्हणगाव (सटाणा) ब्राम्हणपाडे बुंधाटे चौगाव (सटाणा) चौंढाणे चिराई दगडपाडा दहिंदुळे डांगसौंदाणे दरेगाव (सटाणा) दऱ्हाणे दासणे दासवेल देवलाणे देवपूर (सटाणा) देवठाणदिगर धांदरी ढोलबारे दोधेश्वर डोंगरेज दायणे एकलाहरे (सटाणा) फोपिर गांधीनगर (सटाणा) गणेशनगर (सटाणा) गौतमनगर गोलवड गोराणे हतनूर इजमाणे इंदिरानगर (सटाणा) जद जायखेडा जयपूर (सटाणा) जैतापूर (सटाणा) जाखोड जामोटी जोरण कड्याचामाळा काकडगाव कंधाणे (सटाणा) कपाळेश्वर करंजाड करंजखेड (सटाणा) कऱ्हे कातरवेळ काठागड कौतिकपाडा केळझर (सटाणा) केरोवानगर केरसणे खामलोण खामटणे खराड (सटाणा) खिरमाणी किकवारी बुद्रुक किकवारी खुर्द कोंढाराबाद कोपमाळ कोटबेल कुपखेडे लाडुद लखमापूर (सटाणा) महड (सटाणा) महात्मा फुले नगर माईलवाडे मालेगाव तिळवण माळगावभामेर माळगाव खुर्द मणुर मोहलांगी मोरणेदिगर मोरणेसांदस मोरेनगर मोरकुरे मुलाणे मुल्हेर (सटाणा) मुंगसे मुंजवड नळकस नामपूर नंदीण नारकोळ नवेनिरपूर नवेगाव (सटाणा) नवीशेमळी निकवेल निरपूर निताणे पारनेर (सटाणा) परशुरामनगर पाठावेदिगर पिंपळदर पिंपळकोठे पिंगळवडे पिसोरे राहुड राजपुरपांडे रामतीर रातीर रावेर (सटाणा) साकोडे साल्हेर (सटाणा) सालवण (सटाणा) सारडे (सटाणा) सरपरगाव सरवार (सटाणा) शेमाळी शेवरे (सटाणा) श्रीपुरवडे सोमपूर सुराणे ताहराबाद (सटाणा) तळवडेभामेर तळवडेदिगर तांदुळवाडी (सटाणा) तारसळी ताताणी टेंभे (सटाणा) ठेंगोडे तिळवण तिंघारी तुंगणदिगर उटरणे वडेदिगर वाडेखुर्द वानोळी (सटाणा) वरचेटेंभे वटार वाथोडे वायगाव (सटाणा) विजयनगर (सटाणा) विंचुरे विरगाव (सटाणा) विसापूर (सटाणा) वाडीचौल्हेर वाडीपिसोळ वाघाळे (सटाणा) वाघांबे (सटाणा) यशवंतनगर (सटाणा)

पार्श्वभूमी

[संपादन]

सटाणा हे आराम नदीच्या काठावर बसलेले शहर आहे. या परिसराला बागलाण असेही संबोधले जाते. सटाण्यापासून ४० ते ५० किलोमीटर अंतरावर मालेगाव शहर आहे व ९५ किलोमीटर अंतरावर नासिक शहर आहे.

२००१ च्या जनगणनेनुसार सटाणा शहराची लोकसंख्या ३२५११ इतकी होती आणि त्यात ५२% पुरुष आणि ४८ % स्रिया आहेत. सटाण्याची लोकसाक्षरता ७५% असून ती भारताच्या सरासरी साक्षरतेपेक्षा (५९.९%) जास्त आहे.

सटाणा हे देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचे निवास्थान होते. सटाण्याला देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचे मोठे मंदिर आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी साधारणता डिसेंबर महिन्यामध्ये यशवंतराव महाराजांची यात्रा सटाणा येथे होते. लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी यात्रेला येतात.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

लोकजीवन

[संपादन]

सटाणा एक सांस्कृतिक परंपरेने भरलेले गाव आहे. सटाण्यात सर्व समाजाचे लोक एकत्र राहतात. मग त्यामध्ये मराठा, माळी, सोनार, शिंपी, कासार आणि मुस्लिम अशे वेगवेगळे समाज आहेत. कोणताही सण असो एकजुटीने साजरा करतात. या गावात दर वर्षी डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये देव मामलेदार यशवंत राव महाराज यांची यात्रा भरते. या यात्रेला लाखो लोक हजेरी लावतात आणि यात्रेची शोभा वाढवतात. या यात्रेमध्ये लहान मुलांसाठी खेळणे-पाळणे, महिलांसाठी ज्वेलरी अशा भरपूर वस्तू खरीदारी करू शकता. याचा प्रमाणे सटाण्यामध्ये गणेशोउत्सव, नवरात्र, ईद, दसरा अशे विविध सण खूप आवडीने साजरी केले जातात. नवरात्री मध्ये महालक्षुमी मंदिरात जागरण गोंधळाचे आयोजन केले जाते, गणेशउत्सव मध्ये मोठं मोठे गणपती बसवले जातात, दसऱ्याचा दिवशी पाठक ग्राउंड वर रावण दहन केले जाते. []

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

ऐतिहासिक वैशिष्ट्ये :बागलाण तालुक्याला पुरातन काळापासून ऐतिहासिक महत्त्व आहे.बागलाण तालुक्यात इ.स. १३०० ते १७०० या कालखंडात बागुल घराण्यातील राजे राज्य करीतहोते. त्यांच्या नावावरून या प्रदेशाला बागलाण हे नांव पडले.

छत्रपती शिवाजी महाराज सुरतेची लूट करून या तालुक्यात परतीला निघाले होते. त्यावेळीसाल्हेर मुल्हेरची लढाई झाली. या लढाईचा “Rise of the Maratha Power” या पुस्तकात रानडेंनी उल्लेख केला आहे. बागलाण संतांची भूमी आहे. वैकुंठवासी यशवंतराव महाराजांनी भीषण दुष्काळात दामाजी पंतासारखी भूमिका बजावून भूकेलेल्यांना अन्न दिले, जनावरांचे प्राण वाचविले. त्यांनी देवमामलेदार म्हणून नांव भूषविले.

अंतापूर येथे दावल मलिक बाबांची दर गुरुवारी यात्रा भरते. यावेळी हिंदू मुस्लिम भाविक अजा पीर, पाच पीर यांचे दर्शन घेऊन डोंगरावरील दावल मलिक बाबांच्या मजारीचे दर्शन घेतात. झोळी-पावडी घेऊन किमान पाच घरे पीठाची भिक्षा मागणे, भाजी-भाकरीचा व गूळ-भाकरीचा नैवेद्य अर्पण करणे व कंदोरी करणे हे प्रमुख विधी केले जातात. त्यासाठी महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून भाविक येत असतात.

अंतापूर येथेच सद्गुरू शंकर बाबा (धनकवडी पुणे) यांचा गरीब शेतकऱ्याच्या मुलाच्या रुपाने अवतार झाला. रानात वाघिणीच्या जवळ एक तान्हे बाळ खेळताना आढळले. आधी निपुत्रिक असलेल्या शेतकऱ्याने व त्याच्या पत्नीने हे बाळ पोटच्या मुलासारखे वाढवले. हे बाळ अष्टावक्र, तोतरे असले तरी बालपणापासून विविध चमत्कार दाखवू लागले. आपले पालनपोषण करणाऱ्या मातापित्यांना त्यांच्या कृपेने बाळे झाली. शंकर बाबा तपश्चर्येसाठी निघून भारतभर फिरले. त्यांचे उत्तरायुष्य धनकवडी, पुणे येथे गेले व तेथेच त्यांची समाधी आहे. श्री स्वामी समर्थ यांना परम गुरू मानणाऱ्या शंकर बाबांची लोकप्रियता अफाट आहे.

साल्हेर मुल्हेर येथे उगम पावणाऱ्या मोसम नदीवर हरण बारी येथे धरण बांधण्यात आले असून ते अंतापूर जवळच आहे.

सामाजिक वैशिष्ट्ये :बागलाण तालुक्यातील समाज १७१ गावांमध्ये विखूरला आहे. सामाजिक रचनेनुसार ६६ गावातील आदिवासी समाजामुळे आदिवासी गावे १०५ गावात बिगर आदिवासी समाज असे दोन विभाग पडले आहेत. बागलाणची प्रमुख बोलीभाषा अहिराणी आहे. आदिवासी भागात आदिवासी, कोकणी, भिल्ल इ. पोटभाषा आहेत.

बागलाण तालुक्यात प्रामुख्याने शेती हा मुख्य व्यवसाय आहे तसेच पशुपालन, कुक्कुट पालन, घोंगड्या विणने, फडक्या रंगविणे हेव्यवसाय परंपरागत आहेत. बागलाणचे प्रमुख स्वातंत्र्य सैनिक नरहर गोपाळ शेठ व त्यांचे सहकारीयांनी सामाजिक परंपरा जिवंत ठेवल्या आहेत.

बागलाण तालुक्यात ठेंगोडा येथे सूतगिरणी, शेवरे येथे साखर कारखाना कार्यरत आहेत.बागलाण तालुक्यात हिंदू, मुसलमान, जैन इ. मुख्य धर्मातील लोक गुण्या गोविंदाने एकत्र वास्तव्य करतात. सामाजिक परंपरेनुसार सण व उत्सव साजरे केले जातात. त्यात सटाणा येथे देवमामलेदार, मुल्हेर येथे “रासक्रिडा” हे उत्सव होतात.

मांगी तुंगी येथे जैन लेणी आहेत.

नागरी सुविधा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
नाशिक जिल्ह्यातील तालुके
नाशिक तालुका | इगतपुरी तालुका | दिंडोरी तालुका | पेठ तालुका | त्र्यंबकेश्वर तालुका | कळवण तालुका | देवळा तालुका | सुरगाणा तालुका | सटाणा तालुका | मालेगाव तालुका | नांदगाव तालुका | चांदवड तालुका | निफाड तालुका | सिन्नर तालुका | येवला तालुका
  1. ^ "Satana". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2023-08-05.