मानसरोवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मानसरोवर

मानसरोवर(मानससरोवर) हा तिबेट मधील गोड्या पाण्याचा तलाव आहे.तो ल्हासा पासून २००० कि.मी. वर कैलास पर्वताच्या दक्षिणेस आहे.

भौगोलिक माहिती [संपादन]

मानसरोवर समुद्र सपाटी पासून ४,५५६ मीटर वर आहे. जगातील हे सर्वात उंचीवर असलेले गोड पाण्याचे तळे आहे. मानसरोवर आकाराने साधारण वर्तुळाकार आहे. मानसरोवरचा घेरा ८८ किमी तर क्षेत्रफळ ३२० किमी. इतके आहे. हिवाळ्यात या तळ्यातील पाणी गोठून बर्फ होतो. मानसरोवाराच्या सानिध्यात सतलज, सिंधु, ब्रह्मपुत्रा (जी तिबेटमध्ये यार्लुंग संग्पो या नावाने ओळखली जाते) व कर्नाली नद्यांचा उगम आहे.

सांस्कृतिक महत्व [संपादन]

कैलाश पर्वताप्रमाणे, मानसरोवरही तीर्थस्थळ असून, भारत व इतर देशातील भाविक इथे येतात. मानसरोवरात स्नान करून तेथील पाणी प्यायल्यास सर्व पापे माफ होतात असा विश्वास आहे. दरवर्षी भारतातून कैलास मानसरोवर यात्रा आयोजित केली जाते. हिंदू धर्मातील कथांनुसार या तळ्याचे निर्माण ब्रह्मदेव यांनी आपल्या मनात केले त्यामुळे याचे नाव मानसरोवर आहे (संस्कृत मध्ये मानस = मन) + सरोवर= तळे).


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.