वाळवंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापि वाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही तर इतर काही भौगोलिक रचनादेखील वाळवंट या संज्ञेत येतात.

प्रकार[संपादन]

वाळवंटांची दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागणी करता येते.

उष्ण वाळवंटे[संपादन]

वाळूने व्यापलेला प्रदेश ही व्याख्या केवळ उष्ण वाळवंटांसाठीच लागू होते. नावाप्रमाणे उष्ण वाळवंटातील तापमान अतिउष्ण ते शीत या पट्ट्यात येते.

वैशिष्ट्ये[संपादन]

सर्वसाधारणपणे उष्ण वाळवंटाची पुढील वैशिष्टे सांगता येतील.

  • भौगोलिक वैशिष्ट्ये
  1. वाळूने व्यापलेला प्रदेश. वाळूच्या टेकड्या आणि त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण अशा वळ्या
  2. हवेतील बाष्पाचे आणि जमिनीतील आर्द्रतेचे अत्यल्प प्रमाण
  3. वर्षभरातील पावसाची अत्यल्प सरासरी
  4. विषम तापमान (कमाल आणि किमान पातळीमधील फरक ३० ते ६० अंश सेल्सिअस पर्यंत)
  5. अत्यंत कमी वेळात निर्माण होणारी आणि नष्ट होणारी वाळूची प्रचंड वादळे
  6. दिवसा अत्यंत उष्ण अशी हवा आणि त्यामुळे होणारे परिणाम उदा. मृगजळ
  7. क्वचितच दिसणारे मरूस्थल किंवा ओऍसिस (Oasis)
  • जैविक वैशिष्ट्ये

अत्यंत विषम आणि प्रतिकूल वातावरणातही टिकून राहणाऱ्या वनस्पती आणि प्राणी हे वाळवंटाचे एक जैविक वैशिष्ट्य.

  1. निवडुंग कुटुंबातील व ताड कुटुंबातील (उदा. खजूर) तसेच काही खुरटी व काटेरी झुडुपे वाळवंटात सर्वत्र आढळतात.
  2. सरडासाप या सारखे सरपटणारे प्राणी.
  3. उंदीरखार या सारखे कृदंत वर्गातील प्राणी.
  4. गिधाडेगरुड यांच्यासारखे उड्डाणाचा लांब पल्ला असणारे पक्षी.
  5. काही वैशिष्ट्यपूर्ण कीटकदेखील मरूस्थलापासून काही अंतरापर्यंत दिसतात.
  6. मरूस्थलाजवळील जैवसंपदा मात्र अनेक प्रकारे वेगळी असू शकते, उदा. बदकासारखे पक्षी.

प्रमुख वाळवंटे[संपादन]

जगातील प्रमुख वाळवंटे
क्रम नाव प्रकार चित्र क्षेत्रफळ
(किमी²)
क्षेत्रफळ
(मैल²)
स्थान
1 अंटार्क्टिक वाळवंट ध्रुवीय १,३८,००,००० 13,829,430[१] ०,५३,४०,००० 5,339,573 अंटार्क्टिका
2 आर्क्टिक ध्रुवीय १,३७,००,००० 13,726,937[२] 5,300,000 अलास्का (अमेरिका), कॅनडा, फिनलंड, ग्रीनलँड (डेन्मार्क), आइसलंड, नॉर्वे, रशियास्वीडन
3 सहारा उष्ण कटिबंधीय ०,९१,००,००० 9,100,000+ ०,३३,२०,००० 3,320,000+ अल्जिरिया, चाड, इजिप्त, इरिट्रिया, लिबिया, माली, मॉरिटानिया, मोरोक्को, नायजर, सुदान, ट्युनिसियापश्चिम सहारा
4 अरबी वाळवंट उष्ण कटिबंधीय ०,२३,३१,००० 2,330,000[३] ०,०९,००,००० 900,000 इराक, जॉर्डन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीयेमेन
5 गोबी वाळवंट शीत कटिबंधीय ०,१३,००,००० 1,300,000 ०,०५,००,००० 500,000 चीनमंगोलिया
6 कालाहारी वाळवंट उष्ण कटिबंधीय ०,०९,००,००० 900,000[४] ०,०३,६०,००० 360,000 अँगोला, बोत्स्वाना, नामिबिया and दक्षिण आफ्रिका
7 पांतागोनिया वाळवंट शीत कटिबंधीय ०,०६,७३,००० 670,000 ०,०२,६०,००० 260,000 आर्जेन्टिनाचिली
8 भव्य व्हिक्टोरिया वाळवंट उष्ण कटिबंधीय ०,०६,४७,००० 647,000[२] ०,०२,५०,००० 250,000 ऑस्ट्रेलिया
9 सीरियन वाळवंट उष्ण कटिबंधीय ०,०५,२०,००० 520,000[२] ०,०२,००,००० 200,000 इराक, जॉर्डनसिरिया
10 Great Basin Desert शीत कटिबंधीय ०,०४,९२,००० 492,000[२] ०,०१,९०,००० 190,000 अमेरिका
  1. ^ Ward, Paul (2001). Antarctica Fact File Archived 2013-04-13 at the Wayback Machine./
  2. ^ a b c d "Largest Desert in the World". 2011-12-27 रोजी पाहिले.
  3. ^ "Arabian Desert". 2007-12-28 रोजी पाहिले.
  4. ^ Bass, Karen (2009-02-01). "Nature's Great Events:The Okavango Delta, Kalahari Desert" (PDF). press.uchicago.edu. 2012-04-26 रोजी पाहिले.