मदर तेरेसा
| या लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा. |
| या लेख http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=95962:2010-08-25-15-45-43&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7 येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे. या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा. (१४ सप्टेंबर, इ.स. २०११) |
Anjezë Gonxhe Bojaxhiu जन्म (२६ ऑगस्ट, इ.स. १९१० अल्बानिया) या भारत रत्न आणि नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या.
नवीन चावला हे मदर तेरेसा यांचे अधिकृत चरित्रकार
त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा तथ्यहीन होत्या. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते.
इ.स. १९७९ मध्ये त्यांना ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला तेव्हा आणि इ.स. १९८० मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आला, तेव्हाही त्या म्हणाल्या, की आपल्याला दिव्यांच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही.
मदर तेरेसा धाडसीही होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स. १९८२ मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वत: युद्धभूमीवर हिंडल्या. पूर्व युरोप ज्या वेळी अधिक मोकळा व्हायला लागला होता, त्या वेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’चा प्रसार केला. इथिओपियामधल्या भुकेलेल्यांना त्यांनी आधार दिला. त्या तिथे गेल्या, ज्या काळात चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाची घटना घडली तेव्हाही आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा त्यांनी तिथे जाऊन ज्यांना तो त्रास झाला त्यांना आधार दिला.
बाह्यदुवे [संपादन]
- नोबेल फाऊंडेशनच्या संकेतस्थळावरील मदर तेरेसाचे संक्षिप्त चरीत्र (इंग्रजी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |