ए.पी.जे. अब्दुल कलाम
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| ए.पी.जे. अब्दुल कलाम | |
| पूर्ण नाव | अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम |
| जन्म | १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर |
| नागरिकत्व | भारतीय |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| धर्म | मुस्लिम |
| पुरस्कार | पद्मभूषण', 'पद्मविभूषण', 'भारतरत्न |
| वडील | जैनुलाबदिन अब्दुल |
अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत, ज्यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते, हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २००२ ते २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतिमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपति' म्हणून लोकप्रिय झाले.
त्यांचे पूर्ण नाव डॉ अबुल फकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असे आहे. त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरुंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या आनण्याचा व्यवसाय करीत. या कुटूबांची रामेश्वर खुप श्रध्दा आहे. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. शाळेत शिक्षकांकडून जातिभेदाचे काही कटू अनुभव त्यांना आले. शाळेत असतनाच गणिताची त्यांना विशेष आवड होती. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिलेे आणि तेव्हापासूनच डॉ. कलाम यांना पैशाचे महत्त्व पटले. या संस्थेतून एहोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी त्यांचे नाते जूळले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले.
पुढे प्रख्यात शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले, अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीच्या प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी त्यांना मिळाली. मुळातच चाणाक्ष, अभ्यासू व परिश्रमाची सवय असणाऱ्या डॉ. कलाम यांनी अल्पावधीतच या विषयातील तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यानंतर प्रशिक्षणासाठी ते पुन्हा कधीही परदेशी गेले नाहीत.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. १९६३ नंतर ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) मध्ये दाखल झाले. सॅटेलाईट लॉंच व्हेईकल ३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे त्यांनी सार्थ करून दाखविले. नंतर साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.
वैयक्तिक कामपेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. विज्ञानाचापरमभोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खुप संवेदनशील, साधे व सरळ आहेत. त्यांना रुदवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने 'पद्मभुषण', 'पद्यविभुषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. येत्या वीस वर्षात विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतित करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगून जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] शिक्षण
कलाम हे निर्भयपणे जगाला सामोरे जाणारे आहेत.त्यांनी त्यांच्या बालपणातील बहुतांशी काळ आर्थिक समस्यांना तोंड देण्यात घालवला आणि अगदी लहान वयापासूनच त्यांनी कुटुंबाच्या अर्थार्जनासाठी पूरक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.त्यांचे शालेय शिक्षण रामनाथपुरम ला पूर्ण झाले. तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. संस्थेतून एरोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी संपर्कात आले. त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण पूर्णं केले.
[संपादन] कार्य
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही संशोधन मध्ये कार्य केले. 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार, डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.रणगाडा व लाइट काफॅंबॅं एअरक्राफट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
[संपादन] गौरव
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
| Year of Award or Honor | Name of Award or Honor | Awarding Organization |
|---|---|---|
| 2011 | आय ई ई ई सभासद पद | IEEE[१] |
| 2010 | डॉक्टर ऑफ इंजीनीरिंग | वाटरलू विद्यापीठ[२] |
| 2009 | हूवर पदक | ASME Foundation, USA[३] |
| 2009 | International von Kármán Wings Award | California Institute of Technology, U.S.A[४] |
| 2008 | Doctor of Engineering (Honoris Causa) | Nanyang Technological University, Singapore[५] |
| 2007 | King Charles II Medal | Royal Society, U.K[६][७] |
| 2007 | Honorary Doctorate of Science | University of Wolverhampton, U.K[८] |
| 2000 | Ramanujan Award | Alwars Research Centre, Chennai[९] |
| 1998 | Veer Savarkar Award | भारत सरकार [१०] |
| 1997 | Indira Gandhi Award for National Integration | भारत सरकार [१०][९] |
| 1997 | Bharat Ratna | भारत सरकार[११][९] |
| 1990 | Padma Vibhushan | भारत सरकार [१२][९] |
| 1981 | Padma Bhushan | भारत सरकार [१२][९] |
[संपादन] डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकिर्द
जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे. शिक्षण श्वात्र्झ हायस्कूल, रामनाथपुरम. पदवी, सेंट जोसेफ कॉलेज, तिरूची येथे पदविका (एरोनॉटिकल इंजिनियरींग)ं चेन्नई घेतली . १९५८ सिनियर सायंटिफिक असिस्टंट, डृडै(प्रोटोटाईप हॉवरक्रॉफट तयार केले.) संचालक डृडै हैद्राबाद. १९६२ भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी, बंगलोरस्थित च्या कार्यक्रमात एरोडायनॅमिक्स डिझाइन, फायबर रिईन्फोर्सड प्लास्टिक (फ्ृऋ) या प्रकल्पात सहभागी. १९६३ ते ७१ विक्रम साराभाई यांच्याबरोबर कार्यरत. सॅटेलाईट लॉंच व्हेईकल प्रोग्रॅम प्रमुख, विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर, थिरूवंतपुरम(ीश्ृड) १९७८ ते ८६ प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर कार्यरत. १९७९ संचालक श्र्ळद्यी ी ी उड्डाण कार्यक्रम १९७९ ते ८० थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्ट. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी उपग्रह प्रक्षेपित) १९८१ पद्मभूषण. १९८५ त्रिशुल या अग्नीबाणाची निर्मिती. १९८८ पृथ्वी अग्नीबाणाची व रिसर्च सेंटर इमारतीची निर्मिती. १९८९ अग्नी या अग्नीबाणाची निर्मिती. १९९० आकाश व नाग या अग्नीबाणाची निर्मिती. १९९१ वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री डी. आर.डी. ओ. चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम. बी. टी.रणगाडा व लाइट काफॅंबॅं एअरक्राफट (एल. सी. ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. १९९४ 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित. २५ नोव्हें. १९९८ भारतरत्न बहुमान प्राप्त. २००१ सेवेतून निवृत्त. २००२ भारताच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार.
| मागील: के.आर. नारायणन |
भारतीय राष्ट्रपती जुलै २५, २००२ - जुलै २५, २००७ |
पुढील: प्रतिभा पाटील |
[संपादन] संदर्भ
- ↑ Error on call to साचा:संकेतस्थळ स्रोत: दुवा आणि शीर्षक हे रकाने अनिवार्य आहेत..
- ↑ Error on call to साचा:संकेतस्थळ स्रोत: दुवा आणि शीर्षक हे रकाने अनिवार्य आहेत..
- ↑ Template error: argument शीर्षक is required.
- ↑ Error on call to साचा:संकेतस्थळ स्रोत: दुवा आणि शीर्षक हे रकाने अनिवार्य आहेत..
- ↑ Error on call to साचा:संकेतस्थळ स्रोत: दुवा आणि शीर्षक हे रकाने अनिवार्य आहेत..
- ↑ Template error: argument शीर्षक is required.
- ↑ Template error: argument शीर्षक is required.
- ↑ Template error: argument शीर्षक is required.
- ↑ ९.० ९.१ ९.२ ९.३ ९.४ Error on call to साचा:संकेतस्थळ स्रोत: दुवा आणि शीर्षक हे रकाने अनिवार्य आहेत..
- ↑ त्रूटी उधृत करा:
<ref>चुकीचा कोड;PIB01march12नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ↑ Error on call to साचा:संकेतस्थळ स्रोत: दुवा आणि शीर्षक हे रकाने अनिवार्य आहेत..
- ↑ १२.० १२.१ Template error: argument शीर्षक is required.
|
|||||||