चिंतामणी नागेश रामचंद्र राव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चिंतामणी नागेश रामचंद्र राव (इ.स. २००४च्या सुमारास)

चिंतामणी नागेश रामचंद्र राव, ऊर्फ सी.एन.आर. राव (कन्नड: ಚಿಂತಾಮಣಿ ನಾಗೇಶ ರಾಮಚಂದ್ರ ರಾಯ ; रोमन लिपी: Chintamani Nagesa Ramachandra Rao / C.N. R. Rao ;) (३० जून, इ.स. १९३४; बंगळूर; कर्नाटक - हयात) हे एक कन्नडभाषक भारतीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. घन-स्थिती रसायनशास्त्र व संरचनात्मक रसायनशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत.

[संपादन] जीवन

रावांनी इ.स. १९५१ साली म्हैसूर विद्यापीठातून बॅचलर पदवी मिळवली. पुढील दोन वर्षांत त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर ते पीएच.डी. अभ्याक्रमासाठी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात प्रवेश घेतला व इ.स. १९५८ साली पीएच.डी मिळवली. त्यांनी इ.स. १९६३ ते इ.स. १९७६ या काळात कानपुरातील भारतीय प्रौद्योगिकी संस्थेच्या रसायनशास्त्र विभागात, तर इ.स. १९८४ ते इ.स. १९९४ या काळात बंगळुरातील भारतीय विज्ञान संस्थेत अध्यापन केले.

सध्या (इ.स. २०११) ते बंगळुरातील जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्र येथे संशोधक प्राध्यापक व मानद अध्यक्ष म्हणून काम करतात.

[संपादन] पुरस्कार

भारतीय केंद्रशासनाने रावांना पद्मश्रीपद्मविभूषण पुरस्कारांनी गौरवले आहे.

[संपादन] बाह्य दुवे



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये