मँचेस्टर युनायटेड एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मँचेस्टर युनायटेड
Manchester United's emblem
पूर्ण नाव मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लब
टोपणनाव द रेड डेव्हिल्स युनायटेड
मॅन यु, मॅन युनायटेड
स्थापना १८७८, ((न्यूटन हेल्थ एल & वाय आर एफ.सी.)
मैदान ओल्ड ट्रफोर्ड
ट्रॅफोर्ड
मँचेस्टर महानगर
इंग्लंड
(आसनक्षमता ७६,२१२)
व्यवस्थापक स्कॉटलंड ध्वज सर ऍलेक्स फर्ग्युसन
लीग प्रीमियर लीग
२००६–०७ प्रीमियर लीग, १


Team colours Team colours Team colours
Team colours
Team colours
 
यजमान गणवेश रंग
Team colours Team colours Team colours
Team colours
Team colours
 
इतर गणवेश रंग

मँचेस्टर युनायटेड एफ.सी. हा इंग्लंडमधील मॅंचेस्टर या शहरातील ओल्ड ट्रॅफोर्ड या ठिकाणी आहे. हा इंग्लंडचा लिव्हरपूल पाठोपाठ दुसर्‍या क्रमांकाचा यशस्वी क्लब असून क्ल्बने आजवर १७ वेळा इंग्लिश प्रिमियर लीगचे विजेतेपद मिळवले आहे. गेल्या पंधरा वर्षातील संघाची कामगीरी लक्षणीय आहे व त्यामध्ये संघाचे व्यवस्थापक ऍलेक्स फर्ग्युसन यांचा सिंहाचा वाटा आहे. २१ मे २००८ रोजी मॉस्को येथे झालेल्या युरोपीयन चॅंपियन्स लीगचे तिसरे विजेतेपद त्यांनी इंग्लंडच्याच चेल्सी या संघाला पेनाल्टी शूट आउटमध्ये ६-५ असे हरवून मिळवले. या आगोदर हे क्लब फुटबॉलमधील तथाकथित सर्वोच्च यश १९६८ मध्ये व १९९९ मध्ये मिळवले होते. १९९९ त्यांनी शेवटच्या मिनिटात दोन गोल करुन जर्मनीच्या बायर्न म्युनशेन ला हरवले होते. हा सामना आजवरच्या सर्वाधिक उत्कंठावर्धक सामन्यांमध्ये गणला जातो.

गेल्या दशकातील कामगीरी मुळे तसेच इंग्लिश फुटबॉलला असलेले वलय यामुळे हा क्लब जगातील सर्वाधिक चाहते असणारा क्लब बनला आहे[१]. याचे जगभर ३० कोटी पेक्षाही अधिक चाहते असून, अशिया खंडातील कित्येक देशात या क्लबचा प्रभाव आहे. तसेच १९९० नंतरचा सर्वाधिक श्रीमंत फुटबॉल क्लब म्हणून या क्लबने नाव कमवले आहे. अजूनही सर्वात श्रीमंत फुटबॉल क्लब ही ओळख कायम ठेवली मात्र २००७ मध्ये भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने (बी.सी.सी.आय.) सर्वात श्रीमंत क्रिडासंस्था होण्याचा मान मिळवला आहे[२]. क्लबची मालमत्ता १.८ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] क्लबचा इतिहास

[संपादन] स्थापना व सुरुवातीची वर्षे

हा क्लब १८७८ मध्ये न्यूटन हीथ एल अँड वाय आर एफ्.सी म्हणून स्थापन झाला. प्रामुख्याने याचे सदस्य लँकेशायर रेल्वे डेपोचे कामगार होते. काही काळानंतर क्लबने १८९२ मध्ये फुटबॉल लीगमध्ये प्रवेश केला. याच दरम्यान क्लबला आर्थिक नुकसान झाले व कोर्टाद्वारे क्लब बंद पाडण्यात आला. त्याच वेळेस क्लबला लक्षाधीश जॉन डेव्हिस यांच्याकडून भरघोस मदत मिळाली व क्लब तरला. त्यामुळे श्री जॉन डेव्हिस हे क्लबचे आद्य मालक मानले जातात. क्लबने नव्याने सुरुवात करण्यात यावी असे ठरले व २६ एप्रिल १९०२ ला मॅचेस्टर युनायटेड असे नामकरण करण्यात आले व लाल व पांढरे हे क्लबचे अधिकृत रंग म्हणून निवडण्यात आले.

या दरम्यान क्लब अजूनही तळातील लीगमध्ये खेळत होता व क्लबचे पहिले लक्ष्य होते की पहिल्या दर्ज्याच्या लीगमध्ये खेळणे. क्लबने अनेक नवीन फुटबॉलपटूंशी भरघोस रक्कम देउन करार केला व त्याचा परीणाम १९०४ मध्ये दिसला. क्लब लीग मध्ये तिसर्‍या स्थानावर आला. १९०६ मध्ये क्लबने दुसर्‍या दर्जाच्या लीगमध्ये दुसरा क्रमांक मिळवला व पहिल्या दर्जाच्या लीगमध्ये प्रवेश केला. पुढील काही वर्षे क्लबने आपला पहिला सुर्वण काळ अनुभवला. १९१२ पर्यंत अनेक विजेतेपदे मिळवली. १९१२ मध्ये क्लबचे सचिव मॅग्नाल यांनी रामराम ठोकला व त्यांनंतर क्लबची अधोगती चालू झाली साधारणपणे ४१ वर्षे क्लबला कोणतेही विजेतेपद मिळवता आले नाही.

[संपादन] बस्बी कालखंड

१९४५ ते १९६९ हा क्लबच्या इतिहासात बस्बी कालखंड (द बस्बी यिअर्स) असे म्हणले जाते. १९४५ मध्ये मॅट बस्बी यांची क्लबचे व्यवस्थापक म्हणून निवड झाली व त्यांनी संघनिवडीची सुत्रे आपल्याकडे ठेवली तसेच प्रशिक्षणादर्म्यान मैदानावर रहात. बस्बी यांच्या अश्या काही नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे काही वर्षातच त्यांना त्याची फळे मिळाली व क्लबचे बरे दिवस पुन्हा चालू झाले. क्लबने १९४७,४८ व ४९ मध्ये सलग तीन वर्षे पहिल्या दर्जाच्या लीगमध्ये दुसरे स्थान पटकावले व १९४८ मध्ये एफ्.ए. कपचे विजेतेपद मिळवले. १९५२ मध्ये क्लबने सरते शेवटी लीगचे विजेतेपद मिळवले. पुढील काही वर्षे क्लबने ठीक ठाक प्रदर्शन केले. १९५६ मध्ये त्यांनी अतिशय तरुण संघाकडून अत्यंत घवघवीत यश प्राप्त करुन घेतले अनेक फुटबॉलपटू उदयास आणले डंकन एडवर्ड यापैकी एक. पुढील दशक मॅचेस्टर युनायटेडचे असेल अशी काळजी घेतली. युनायटेडच्या कामगीरीचा चढता आलेख कायम राहिला. युरोपीयन कप मध्ये पण आता मॅंचेस्टर भरीव कामगीरी करु लागला. परंतु फुटबॉल इतिहासातील अत्यंत धक्कादायक घटनेतून बस्बी यांच्या संघाला जावे लागले. ६ फेब्रुवारी १९५८ रोजी म्युनशेन नजीक मँचेस्टर युनायटेडच्या विमानाला अपघात झाला . एडवर्डसह युनायटेडचे आठ प्रमुख खेळाडू मारले गेले. बस्बी देखील गंभीर जखमी झाले होते परंतु आश्चर्यकारकरित्या अपघातातून बाहेर आले. एवढे प्रचंड नुकसान सोसूनपण युनायटेडने राहिलेल्या मोसमात भरीव कामगीरी केली. एफ.ए. कपची अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले. बस्बींनी ६० च्या दशकात पुन्हा संघाची बांधणी केली व तरुण खेळाडूंचा भरणा हे तत्त्व कायम ठेवले. याच वेळेस जार्ज बेस्ट हा मँचेस्टर कडून उदयास आला. ६० चे दशक हे इंग्लिश फुटबॉलमध्ये मँचेस्टरचे ठरले व यामुळेच बर्‍याच अंशी इंग्लिश फुटबॉललापण चांगले दिवस मिळाले. इंग्लंडने १९६६ मध्ये विश्वकरंडक जिंकला, या विश्वविजेत्या संघातील अनेक जण मँचेस्टरचे खेळाडू होते. क्लबनेही अनेक लीग विजेतेपद व कप विजेतेपदे मिळवली व याचा कळस १९६८ झाला,यावर्षी बेनफिका ला हरवून मँचेस्टर युरोपीअन कप विजेता झाला. १९६९ मध्ये २४ वर्षाच्या यशस्वी कारकीर्दीनंतर बस्बी यांनी व्यवस्थापक पदाचा राजीनामा दिला व मँचेस्टरला सुवर्णकाळ देण्यार्‍या बस्बी कालखंडाचा विराम झाला.

[संपादन] १९६९ ते १९८६

बस्बी यांच्या निवृतीनंतर मँचेस्टरची उतरती कळा चालू झाली. बस्बी यांच्या तोडीचा व्यवस्थापक मिळणे अशक्य होते परंतु मँचेस्टरचा खेळाचा स्तर फारच खालावला. बस्बी यांना पुन्हा आमंत्रण देण्यात आले व काही काळ त्यांनी पुन्हा व्यवस्थापक म्हणून काम केले, परंतु यावेळेस त्यांनी क्लबला कायमचा रामराम ठोकला. पुढील काही वर्षे अनेक व्यवस्थापक बदलण्यात आले. १९७२ मध्ये क्लब रेलीगेट होण्यापासून बचावला यात भरीस भर म्हणून क्लबचे तीनही महान खेळाडू बेस्ट, चार्लटनलॉ यांनीदेखील रामराम ठोकला. ७३-७४च्या मोसमात लॉ ने मँचेस्टर सिटी संघाकडून खेळताना युनायटेड विरुद्ध गोल केला व मँचेस्टरला लीगमधील अधोगती( रेलीगेशनचा) सामना करावा लागला. पुढील अनेक वर्षे मँचेस्टर हा मध्यम दर्जाचाच क्लब म्हणून ओळख राहिली. अनेक प्रशिक्षक नेमले गेले, हाकलले गेले १९८१ मध्ये रॉय अटकिनसन यांची नेमणूक झाली. अनेक महागडे खेळाडूंना विकत घेण्यात आले व बरे दिवस क्लबला आले ८३ व ८५ मध्ये एफ्.ए.कप जिंकले व ८५ मध्ये लीग मध्ये उत्तम कामगीरी केली. ८५-८६ च्या मोसमात सुरुवातीला अतिशय जोरदार कामगीरी करणारा युनायटेडच्या संघ नंतर मात्र ढेपाळला व पुन्हा रेलीगेशनच्या वाटेवर होता. सुमार कामगीरीमुळे अटकिनसन यांना काढण्यात आले.

[संपादन] फर्ग्युसन कालखंड १९८६ ते १९९८

अटकिनसन यांच्या सुमार कामगीरीमुळे हकालपट्टी झाल्यानंतर ऍलेक्स फर्ग्युसन यांची नियुक्ती झाली व संघाला घवघवीत नाही तरी अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढले. पुढील वर्षीच १९८८ मध्ये दुसर्‍या क्रमांकापर्यंत युनायटेडने प्रगती केली. प्रगतीचा आलेख १९९० मध्ये ढेपाळला. फर्ग्युसन देखील हकालपट्टी च्या मार्गावर होते परंतु कसेबसे क्लबने चांगले प्रदर्शन करण्यात यश मिळवले. १९९१ मध्ये युनायटेड ने बार्सिलोनाला हरवून विनर कप जिंकला व फर्ग्युसन यांची यशस्वी कारकीर्द चालू झाली. याच वर्षी क्लब हा पब्लिक लिमिटेड होउन क्लबने इतिहास रचला.

१९९२ मध्ये एरिक कँटोना चे क्लबमध्ये आगमन झाले, कँटोना क्लबसाठी चांगलाच फलदायी ठरला. तसेच पॉल इन्स, डेनिस अरविन, पीटर श्मायकेल या सारख्या खेळांडूनी युनायटेडच्या यशात मोठा वाटा दिला. क्लबच्या ज्युनिअर संघाकडील अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आले. डेव्हिड बेकहॅम, पॉल स्कोल्स, गॅरी नेव्हिल, फिल नेव्हिल इत्यादी. या खेळाडूंनी राष्ट्रीय संघात चांगली कामगीरी केली व इंग्लडच्या संघाला दरारा मिळवून दिला. १९९५ ९६ च्या मोसमात भरीव कामगीरी करत एफ्.ए.कप व लीग चे दुहेरी विजेते पद मिळवले. एरिक कँटोनाने १९९६-९७ च्या मोसमात निवृती जाहिर केली त्याच वर्षी ९७ ची लीग युनायटेडने जिंकली व ९८ मध्ये दुसर्‍या क्रमांकावर राहिले.

[संपादन] १९९८-९९ युनायटेडचे सुवर्ण वर्ष

९८-९९ च्या मोसमाच्या सुरुवातीला व्हिला व अर्सेनल या क्लबचे गुणतक्त्यावर वर्चस्व होते. परंतु मँचेस्टरने हळूहळू वर प्रगती केली. ९८ च्या डिंसेबर मध्ये युनायटेडची कामगीरी उंचावली व लीगमध्ये एका मागोमाग एक प्रेक्षणीय विजय मिळवत गेले.बेकहॅमच्या सुरेख पासेस वर योर्ककोल या जोडीने गोल करण्याचा धडाका लावला होता. याच सुमारास चँपीयन्स लीग मध्येही काही प्रेक्षणीय विजय मिळवले होते. या सर्वांचा कळस मे ९९ मध्ये झाला दोन आठवड्याच्या अंतरामध्ये युनायटेडने प्रिमिअर लीगएफ.ए.कप चे दुहेरी विजेतेपद मिळवले व २६ मे १९९९ रोजी इतिहास घडवला. बायर्न म्युनशेनला शेवटच्या मिनिटात दोन गोल करुन चँपीयन्स लीग चे विजेतेपद मिळवले व अत्यंत दुर्मिळ असे फुटबॉलमधील तिहेरी विजेतेपद मिळवले. हा सामना आजवरच्या सर्वाधिक उत्कंठावर्धक सामन्यांमध्ये गणला जातो[३]. या मोसमात युनायटेडचा संघ कित्येक वेळा पिछाडीवरुन येत जिंकला होता व त्यासाठी मँचेस्टरच्या खेळाडूंनी दाखवलेली मैदानावरील विजीगीषु वृती ही आजही फुटबॉल जगतात स्मरणीय आहे.

[संपादन] खेळाडू

आजवरचे प्रमुख खेळाडू

[संपादन] प्रथम संघ

२१ मार्च २००८ अधिकृत संकेतस्थळ. [४][५]

क्र. जागा नाव
Flag of the Netherlands गो.र. एड्वीन वॅन डर सार
इंग्लंड ध्वज डिफें गॅरी नेव्हिल (कर्णधार)
फ्रान्स ध्वज डिफें पॅट्रिस एवरा
इंग्लंड ध्वज मि.फि. ओवेन हरग्रेवीज
इंग्लंड ध्वज डिफें रियो फर्डिनांड
इंग्लंड ध्वज डिफें वेस ब्राउन
पोर्तुगाल ध्वज मि.फि. क्रिस्तियानो रोनाल्डो
ब्राझिल ध्वज मि.फि. ऍंडरसन
बल्गेरिया ध्वज फॉर. दिमितर् बेर्बतोव्
१० इंग्लंड ध्वज फॉर. वेन रूनी
११ वेल्स ध्वज मि.फि. रायन गिग्स (उप-कर्णधार)
१२ इंग्लंड ध्वज गो.र. बेन फॉस्टर
१३ दक्षिण कोरिया ध्वज मि.फि. पार्क जी-सुंग
१५ सर्बिया ध्वज डिफें नेमंज विडीक
क्र. जागा नाव
१६ इंग्लंड ध्वज मि.फि. मायकल कर्रिक
१७ पोर्तुगाल ध्वज मि.फि. नानी
१८ इंग्लंड ध्वज मि.फि. पॉल स्कोल्स
१९ इंग्लंड ध्वज फॉर. डॅनी वेल्बेक
२१ ब्राझिल ध्वज डिफें रफाएल् दा सिल्वा
२२ Flag of Ireland डिफें जॉन ओ'शीआ
२३ उत्तर आयर्लंड ध्वज डिफें जॉनी इवान्स
२४ स्कॉटलंड ध्वज मि.फि. डॅरेन फ्लेचर
२६ अँगोला ध्वज फॉर. मनुको
२८ उत्तर आयर्लंड ध्वज मि.फि. डॅरेन गिब्सन्
२९ पोलंड ध्वज गो.र. तोमस्ज़ कुस्जचक
३२ आर्जेन्टिना ध्वज फॉर. कार्लोस तेवेझ
३४ ब्राझिल ध्वज मि.फि. रोद्रिगो पोस्सेबोन्
३८ इंग्लंड ध्वज गो.र. टॉम हिटॉन

[संपादन] On loan

क्र. जागा नाव
२५ इंग्लंड ध्वज मि.फि. डॅनी सिंप्सोन (at Blackburn Rovers until ३० जून २००9)

[संपादन] व्यवस्थापन

[संपादन] प्रायोजक

[संपादन] विजेतेपदे

[संपादन] स्थानिक

इंग्लिश प्रिमियर लीग १९९२- ९३, १९९३-९४, १९९५-९६ ,१९९६-९७ ,१९९८-९९, १९९९-२००० ,२०००-०१ ,२००२-०३ , २००६-०७ , २००७-०८

पहिल्या दर्जा १९०७-०८, १९१०-११, १९५१-५२, १९५५-५६, १९५६-५७,१९६४-६५,१९६६-६७

दुसरा दर्जा १९३५-३६, १९७४-७५

एफ.ए.कप १९०९,१९४८,१९६३,१९७७,१९८३,१९८५,१९९०,१९९४,१९९६,१९९९,२००४

लीग कप १९९२, २००६

[संपादन] युरोपीयन स्तरावर

युरोपीयन कप/ यु.ए.फा. चँपीयन्स लीग

१९६८,१९९९,२००८

यु.ए.फा कप विनर्स कप १९९१

युरोपीयन सुपर कप १९९१

मँचेस्टरने अजूनही यु.ए.फा कप जिंकलेला नाही

[संपादन] जागतिक स्तर

आंतर खंडीय कप

१९९९

[संपादन] References



[संपादन] External links

[संपादन] Official

[संपादन] Independent media sites

साचा:BBC Football Info

[संपादन] Major fan sites


आर्सेनल | ऍस्टन व्हिला | बर्मिंगहॅम सिटी | ब्लॅकबर्न रोव्हर्स | बोल्टन वाँडरर्स | चेल्सी | डर्बी काउंटी | एव्हर्टन
फुलहॅम | लिव्हरपूल | मँचेस्टर सिटी | मँचेस्टर युनायटेड | मिडल्सब्रो | न्यूकॅसल युनायटेड | पोर्टस्मथ
रेडिंग | संडरलँड  | टॉटेनहॅम हॉटस्पर | वेस्टहॅम युनायटेड | विगन ऍथलेटिक

प्रीमियर लीग हंगाम
    सं

१९९२–९३ • १९९३–९४ • १९९४–९५ • १९९५–९६ • १९९६–९७ • १९९७–९८ • १९९८–९९ • १९९९–२००० • २०००–०१
२००१–०२ • २००२–०३ • २००३–०४ • २००४–०५ • २००५–०६ • २००६–०७ • २००७–०८

विजेता
मँचेस्टर युनायटेड
उप-विजेता
चेल्सी
उपांत्य सामन्यांतून बाहेर पडलेले संघ
बार्सेलोनालिव्हरपूल
उपांत्य पूर्व सामन्यांतून बाहेर पडलेले संघ
आर्सेनलफेनर्बाचरोमाशाल्क ०४
प्रथम नॉक आउट फेरीतून बाहेर पडलेले संघ
सेल्टीकइंटर मिलानल्यॉनए.सी. मिलानओलिंपिकॉसपोर्टोरेआल माद्रिदसेविला
गट विभागातून बाहेर पडलेले संघ
शक्थार डोनेत्स्कवेर्डर ब्रेमनरोसेनबॉर्गएंडोवनरेंजर्समार्सेलीलाझियोबेसिक्टासबेनफिकासी.एस.के.ए. मॉस्कोडायनॅमो कीव्हस्लॅविया प्रागस्पोर्टींग सी.पी.स्ट्यूव्हॅलेन्सियावी.एफ.बी. स्ट्टुटगार्ट
जी-१४ सदस्य
    सं

एजॅक्सआर्सेनलबार्सेलोनाबायर लिवरकुसेनबायर्न म्युनिकबोरूस्सीया डोर्टमुंडपी.एस.व्ही. एंडोवनइंटर मिलानयुव्हेन्टसलिव्हरपूलमँचेस्टर युनायटेडए.सी. मिलानलिऑनमार्सेलीपॅरीस सेंट-जर्मनएफ.सी. पोर्टोरेआल माद्रिदव्हॅलेन्सिया