डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ
Denver International Airport
261px
DIA Airport Roof.jpg
आहसंवि: DENआप्रविको: KDENFAA LID: DEN
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक डेन्व्हर शहर व काउंटी विमानवाहतूक विभाग
कोण्या शहरास सेवा डेन्व्हर तसेच कॉलोराडो राज्य, पूर्व कॅन्सस, वायोमिंग, ईशान्य नेब्रास्का
स्थळ डेन्व्हर
हब
उन्नतन(एलिव्हेशन)  सरासरी समुद्र- सपाटीच्या वर ५,४३१ फू / १,६५५ मी
गुणक (भौगोलिक) 39°51′42″N 104°40′23″W / 39.86167, -104.67306गुणक: 39°51′42″N 104°40′23″W / 39.86167, -104.67306
संकेतस्थळ www.FlyDenver.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
७/२५ १२,००० ३,६५८ सिमेंट
८/२६ १२,००० ३,६५८ सिमेंट
१६एल/३४आर १२,००० ३,६५८ सिमेंट
१६आर/३४एल १६,००० ४,८७७ सिमेंट
१७एल/३५आर १२,००० ३,६५८ सिमेंट
१७आर/३५एल १२,००० ३,६५८ सिमेंट

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आंहवासंविको: DENआंहप्रवासंविको: KDENएफ.ए.ए. स्थळसूचक: DEN) अमेरिकेच्या डेन्व्हर शहरात आहे. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. ५३ चौरसमैल क्षेत्रफळ असलेला हा विमानतळ अमेरिकेतील सगळ्यात मोठा तर किंग फह्द आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि माँत्रियाल-मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळामागोमाग जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा विमानतळ आहे.[१] येथील १६R/३४L ही धावपट्टी अमेरिकेतील सगळ्यात जास्त लांबीची धावपट्टी आहे.

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फ्रंटियर एरलाइन्स आणि ग्रेट लेक्स एरलाइन्स या विमानकंपन्यांचे मुख्य तळ आहेत तर हा युनायटेड एरलाइन्सचा चौथ्या क्रमांकाचा तळ आहे. ही विमानतळ साउथवेस्ट एरलाइन्सच्या वाहतूककेन्द्रबिंदूपैकी एक असून येथून साउथवेस्ट एरलाइन्स ४०पेक्षा जास्त शहरांना सेवा पुरवते.

[संपादन] इतिहास

सप्टेंबर १९८९मध्ये अमेरिकेच्या केन्द्रीय सरकारने डेन्व्हरसाठी नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यासाठी ६ कोटी अमेरिकन डॉलर मंजूर केले. यासाठी तत्कालीन महापौर फेडरिको पेन्याने मोठे प्रयत्न केले होते. याची जाण म्हणून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याला पेन्या बुलेव्हार्ड असे नाव देण्यात आले आहे. या विमानतळाची उद्घाटन तारीख तेव्हाच ऑक्टोबर २९, इ.स. १९९३ ही ठरवण्यात आली.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

[संपादन] संदर्भ आणि नोंदी

  1. Coventry Airport News: Largest Airport
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये