सिमेंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिमेंट प्लांट

प्रामुख्याने चुनखडीपासून बनवलेल्या बांधकामात विटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिश्रणाला सिमेंट असे म्हणतात. B सिमेंट हा पायाभूत सुविधा क्षेत्राचा आधारस्तंभ आहे असे मानले जाते. रस्ते, पुल, घरे, औद्योगिक व व्यावसायिक इमारती, धरण अशा सगळ्या बांधकामांसाठी त्याचा वापर होतो.

यासाठी काँक्रीट वापरले जाते त्यात सिमेंटचा प्रामुख्याने उपयोग होतो. वाळू , खडी, याचे व सिमेंटचे पाण्याबरोबर व इतर काही घटकांबरोबर मिश्रण करून त्यापासून काँक्रीट बनवले जाते. पाण्यामुळे रासायनिक क्रिया होऊन हे अतिशय मजबूत बनते.

चुनखडी, सिलिकॉन ऑक्साईड, ॲल्युमिनियम, आयर्न ऑक्साईड व इतर काही घटक यांचे मिश्रण मोठ्या भट्टीत प्रचंड उष्णतेत जाळून त्यापासून क्लिकर नावाचे मिश्रण बनते. यामध्ये जिप्सम, पोझ्झोलाना (एक प्रकारची चिकणमाती), फ्लायअश, स्लॅग असे आणखी काही घटक मिसळवून व त्याची बारीक भुकटी करून त्यापासून विविध प्रकारचे सिमेंट बनते.

इतिहास[संपादन]

२०१० मधील जागतिक सिमेंट उत्पादन

भारतात इ.स. १९१४ मध्ये पोरबंदर इथे पहिली वार्षिक १००० टन उत्पादनक्षमता असलेली सिमेंट कंपनी स्थापन करण्यात आली.

प्रकार[संपादन]

  1. ऑर्डीनरी पोर्टलँड सिमेंट,
  2. पोर्टलँड पोझ्झोलाना सिमेंट,
  3. व्हाईट सिमेंट
  4. ओईल वेळ सिमेंट
  5. रँँपिड हार्डनिग पोर्टलँड सिमेंट
  6. पोर्टलँड पोझोलोना सिमेंट
  7. सलफेट रेजिस्टीग पोर्टलँड सिमेंट
  8. एकसपांसिव सिमेंट
  9. कलर्ड सिमेंट
  10. हाय अँँल्युमिना सिमेंट अशा १३ प्रकारच्या सिमेंटचे देशात उत्पादन होते.[१]

भारतातील सिमेंट बनवणाऱ्या कंपनी[संपादन]

  1. ए.सी.सी.
  2. बिरला
  3. जे.के.
  4. श्री
  5. प्रिजम
  6. अंबुजा
  7. विक्रम
  8. बिनानी[२]
  9. श्री अल्ट्रा
  10. एल. अँँड टी
  11. सी.सी. आय.
  12. दिग विजय


प्रदूषण[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. युरोपियन सिमेंट असोसिएशन Archived 2010-07-04 at the Wayback Machine.
  2. सिमेंट बनवण्याचे चलचित्र

संदर्भ[संपादन]

  1. ^ Chauhan, Vipin. "14 Types of Cement in hindi". Civil Engineering Hindi Me. 2019-11-05 रोजी पाहिले.
  2. ^ "सीमेंट की खोज किसने की". हिंदी ज्ञान बुक (इंग्रजी भाषेत). 2019-11-05 रोजी पाहिले.