बोईंग ७७७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोईंग ७७७
United Airlines B777-200 N780UA.jpg

युनायटेड एरलाइन्सचे ७७७-२००

प्रकार लांब पल्ल्याचे मोठ्या क्षमतेचे दुहेरी जेट विमान
उत्पादक बोईंग
समावेश जून ७, १९९५
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
उपभोक्ते एमिराट्स एरलाइन्स, सिंगापूर एरलाइन्स, एर फ्रांस, युनायटेड एरलाइन्स
एर इंडिया
उत्पादित संख्या ८६० (एप्रिल २०१०)
प्रति एककी किंमत अमेरिकन डॉलरमध्ये
२० कोटी ५५ लाख - २३ कोटी १० लाख (७७७-२००ईआर)
२३ कोटी ७५ लाख - २६ कोटी ३५ लाख (७७७-२००एलआर)
२५ कोटी ७० लाख - २८ कोटी ६५ लाख (७७७-३००ईआर)
२५ कोटी २५ लाख - २६ कोटी ५ लाख (७७७एफ)

बोईंग ७७७ हे बोईंग कंपनीचे खूप मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. ट्रिपल सेव्हन असे अनधिकृत नाव असलेले हे विमान दोन इंजिने असलेले जगातील सगळ्यात मोठे विमान आहे.[१][२] या विमानातून ३००पेक्षा अधिक प्रवासी ९,३८० किमी अंतर जाऊ शकतात. हे विमान आता मोठ्या आकाराच्या जुन्या विमानां जागा हे हळूहळू घेऊ लागले आहे. बोईंग ७६७ या मध्यम क्षमतेच्या व बोईंग ७४७ या मोठ्या क्षमतेच्या विमानांच्या मध्ये ७७७ची क्षमता बसते.

जगातील सगळ्यात मोठ्या आकाराची इंजिने, प्रत्येकी सहा चाके असलेली लँडिंग गियर्स[मराठी शब्द सुचवा] आणि गोलाकृती क्रॉस सेक्शन[मराठी शब्द सुचवा] ही या विमानाची काही वैशिष्ट्ये आहेत. या विमानाची रचना करताना बोईंगने आठ प्रमुख विमानकंपन्याची मते घेतली. संपूर्ण रचना संगणकावर (पूर्वीप्रमाणे कागदावर न करता) केली गेली.

बोईंगच्या एव्हरेट फॅक्टरीतून बाहेर येणारे एर इंडियाचे ७७७-२००एलआर विमान.

७७७चे लांबीनुसार दोन प्रकार आहेत. १९९५पासून तयार केले गेलेले ७७७-२००, १९९७पासूनचे ७७७-२००ईआर आणि १९९८पासून तयार केले गेलेले ३३.३ फूट अधिक लांबीचे ७७७-३००ईआर. अधिक लांब पल्ला असलेले ७७७-३००ईआर आणि ७७७-२००एलआर अनुक्रमे २००४ आणि २००६ पासून कार्यरत आहेत तर सामानवाहतूकीसाठीचे ७७७एफ २००८पासून सेवेत आहे. मालवाहू तसेच लांब पल्ल्याच्या उपप्रकारांना जी.ई. ९०, प्रॅट अँड व्हिटनी पीडब्ल्यू४००० किंवा रोल्स-रॉइस ट्रेंट ८०० प्रकारची इंजिने लावलेली असतात. ७७७-२००एलआर प्रकारचे विमान जगातील सगळ्यात लांब पल्ल्याच्या प्रवासी विमानांपैकी एक आहे. हवेत इंधन न भरता सगळ्यात लांबचा प्रवास करण्याचा विक्रम याच्या नावावर आहे. हे विमान मुंबई तसेच दिल्लीपासून न्यूअर्क, न्यू जर्सी पर्यंत न थांबता जाते.

१९९५मध्ये युनायटेड एरलाइन्सच्या सेवेत रुजू झाल्यानंतर नोव्हेंबर इ.स. २०१०च्या सुमारास अंदाजे ६० गिर्‍हाइकांनी १,१६० विमानांची मागणी नोंदवली आहे. पैकी ९०२ विमाने त्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.[३] ४१५ विकलेल्या विमानांसह ७००-२००ईआर प्रकाराचा खप सर्वाधिक आहे. एमिराट्स एरलाइन्सकडे सर्वाधिक ८६ ७७७ विमाने आहेत. ऑक्टोबर २०१०पर्यंत ७७७ विमानांना एक मोठा अपघात झाला असून त्यातील विमान नष्ट झाले आहे. हा अपघात ट्रेंट इंजिनात बिघाड झाल्यामुळे घडला. आत्तापर्यंत ७७७ विमानांच्या अपघातांत एकही प्रवासी मृत्यू पावलेला नाही.

ईतर विमानांपेक्षा प्रतीप्रवासी-प्रतीकिलोमीटर कमी इंधनवापर असलेले ७७७ अधिक लोकप्रिय होत आहे व समुद्रापलीकडील लांब पल्ल्यांच्या मार्गांवर याचा वापर सर्वाधिक होतो.

एरबस ए-३३०, एरबस ए-३४० तसेच सध्या रचना होत असलेले एरबस ए-३५० एक्स.डब्ल्यू.बी. या प्रकारची विमाने ७७७चे थेट स्पर्धक आहेत.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Robertson, David (March 13, 2009). Workhorse jet has been huge success with airlines that want to cut costs. The Times. March 20, 2009 रोजी पाहिले.
  2. Grantham, Russell (February 29, 2008). Delta's new Boeing 777 can fly farther, carry more. The Atlanta Journal-Constitution. June 30, 2009 रोजी पाहिले. [मृत दुवा]
  3. 777 Model Orders and Deliveries summary.