आयझॅक न्यूटन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| आयझॅक न्यूटन | |
गॉडफ्री नेलर याने इ.स. १६८९ मध्ये रंगविलेले न्यूटनचे व्यक्तिचित्र |
|
| जन्म | जानेवारी ४, १६४३ वूल्सथॉर्प-बाय-कोल्स्टरवर्थ, लिंकनशायर, इंग्लंड |
| मृत्यू | मार्च ३१, १७२७ केन्सिंग्टन, लंडन, इंग्लंड |
| निवासस्थान | इंग्लंड |
| राष्ट्रीयत्व | इंग्लिश |
| कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ |
| कार्यसंस्था | केंब्रिज विद्यापीठ |
| प्रशिक्षण | ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज विद्यापीठ |
| ख्याती | गुरुत्वाकर्षण, न्यूटनचे यामिक (न्यूटोनियन मेकॅनिक्स), कॅल्क्युलस, प्रकाशविज्ञान (ऑप्टिक्स) |
सर आयझॅक न्यूटन (एफ.आर.एस्.) (४ जानेवारी १६४३ - ३१ मार्च १७२७) हे एक थोर इंग्रज भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी वैश्विक गुरुत्वाकर्शनाचा सिद्धान्त मांडून केप्लर चे नियम सिद्ध केले.
गतिशास्त्र (mechanics) मधे त्यांनी न्यूटनचे तीन गतीचे नियम मांडले. त्यांनी आर्श्याची दुर्बीण (reflecting telescope) बनवली, व प्रकाशाचे रंगात रूपांतर करून दाखविले.
गणितामध्ये त्यांनी गौटफ्रीड लिब्नित्ज़ बरोबर कैलक्युलस निर्माण केले
अनुक्रमणिका |
[संपादन] बालपण
सर आयझॅक न्यूटन जानेवारी ४, १६४३ रोजी इंग्लंडमधील लिंकनशायर काउंटीच्या वूलस्थॉर्प या गावात जन्मला. आयझॅक न्यूटनचे वडील वारल्यानंतर त्याच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे आयझॅक त्याच्या आजीजवळ राहिला. वयाच्या १२ वर्षांपर्यंत आयझॅक जेमतेम दोन वर्षे शाळेत होता. त्याला गणिताची आवड उत्पन्न होऊ लागली होती. तेवढ्यात त्याचे सावत्र वडील स्मिथ वारले. आपल्या नूतन बाळाला घेऊन आयझॅकची आई हाना लिंकनशायरला परत आली. तिने आयझॅकला शाळेतून काढून शेताच्या कामाला लावले. एक दिवस दुपारी आयझॅक दमूनभागून झाडाच्या सावलीत बसला होता. मंद वारा वाहत होता. आयझॅकची तीक्ष्ण बुद्धी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. आयझॅकला वाटले, आपण वार्याचा वेग मोजावा. त्याच्याजवळ वेग मोजायला काही साधन नव्हते. आयझॅकने एकदा वार्याच्या दिशेने उडी मारली. जिथे उडी पडली तिथे एक दगड ठेवला. मग जरा वेळाने वार्याच्या उलट दिशेने उडी मारली व त्या उडीच्या जागी दगड ठेवला. या दोन दगडांतील अंतर एका दोरीच्या साह्याने आयझॅक मोजत असताना त्याचे मामा, विल्यम आयस्कॉफ शेतावर आले. विल्यम आयस्कॉफ केंब्रीजमध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक होते. त्याने विचारले, "हे तू काय करतोस?"
आयझॅक म्हणाला, "मी वार्याचा वेग मोजतो आहे". या उत्तराने मामा अवाक झाले. त्यांना आयझॅकची तीव्र असामान्य बुद्धी कळली. घरी जाऊन त्यांनी हानाला आयझॅकला शाळेत घालायला सांगितले. १६६१ मध्ये आयझॅक ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाला. त्याचा गुरुत्वाकर्षणाचा शोध सर्वांनाच माहीत आहे. १६६८ मध्ये त्यांनी ६ इंच लांब, एक इंच रुंद दुर्बीण शोधून काढली. आजही लंडन म्युझियममध्ये ही दुर्बीण आहे. मार्च ३१, १७२७ ला त्याचा मृत्यू झाला.
[संपादन] न्यूटनचे गती-नियम
[संपादन] प्रथम नियम
कोणतीही स्थिर अथवा स्थिर गतितील वस्तु बाह्य बळ शिवाय आपल्याच स्थितीत राहते.
[संपादन] द्वितीय नियम
कोणत्याही वास्तुच्या (momentum) च्या बदलाचा वेग त्यावरील बळप्रमाने असतो.
[संपादन] तृतीय नियम
कोणत्याही वस्तुवारिल क्रिया व प्रतिक्रिया सामान व विरुद्ध असतात.
[संपादन] न्यूटनचे सफरचंद
अशी कथा सांगितली आते की न्यूटना गुरुत्वाकर्षण सिद्धान्त सफरचंदाच्या झाडाखाली बसले असताना डोक्यावर सफ़र्चन्द पडल्याने सुचला. ज्या विशिष्ठ झाडाखाली हा किस्सा झाल्याचे मानले जाते, तय झाडाचे आज जगभर अनेक वंशज उपलब्ध आहेत. आसेच एक वंशज झाड़ पुणे येथील आयुका या संस्थेत बघायला मिळते.