आयरिन जोलिये-क्युरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयरिन जोलिये-क्युरी

नोबेल परोतोषिक मिळविणाऱ्या रेडीअम धातूचा शोध लावणाऱ्या प्रख्यात विज्ञानिक प्येअर व मारी क्युरी यांची मुलगी इरिन ज्योलीयो क्युरी या सुद्धा भौतिक विज्ञानिक होत्या .त्यांनी आपल्या आई वडिलांचा उज्ज्वल वारसा तेवढ्याच सामर्थ्याने चालवून आपले नाव अजरामर करून ठेवले .

इरींचा जन्म पॅरिस येथे १२/सप्टेंबर /१८९७ रोजी झाला .सॉरबोन विद्यापीठात व पॅरिस विद्यापीठात रेडीअम इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतल्यानंतर आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केले .१९२६ साली त्या फ्रेड्रिक यांचाबरोबर विवाह झाला .फ्रेड्रिकणी किरणोत्सर्गी धातूचे विद्युत रसायन या विषयावर प्रबंध लिहून डॉक्टरेत मिळविली होती .रेडिओ ऑकतीव्ह अलीमेंत्स वर या दांपत्याचे संशोधन चालू होते .कृत्रिम किरणोत्सर्गीकंच्या सहाय्याने जीवनाच्या विविध अंगोपांचा सखोल अभ्यास करता येतो .पहिल्या महायुद्धात त्यांनी परिचारिका म्हणून काम केले होते .व सैनिकांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्यांच्या जागा नक्की करण्यासाठी रेडीओलोजिक मोटारकार याचा शोध लावला .

कृत्रिम किरणोत्सर्गी(कण वा किरण बाहेर टाकणारी ) मुलदव्ये तयार करण्यात इरीनने पतीबरोबर कार्य केले .या साठी दोघांना १९३५ साली रसायनशास्त्रचे नोबेल पुरस्कार मिळाले .१९४७ मध्ये सॉरबोन विद्यापीठात प्राध्यापक व तेथील रेडीअम प्रयोगशाळेच्या संचालिका म्हणून नेमणूक झाली .बरीच वर्षे किरणोत्सर्गी हताळल्यामुळे त्यांना रक्ताचा कर्करोग होऊन १७ मार्च १९५६ रोजी इरिन यांचा मृत्यू झाला .