Jump to content

सौर ऊर्जा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूर्यापासून उष्णताप्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानात बदल घडतात. सूर्यापासून पृथ्वीला १७४ पेटावॅट ऊर्जा मिळते. यातली सुमारे ३०% ऊर्जा परावर्तित होते तर उरलेली ऊर्जा वातावरणात शोषली जाते. या ऊर्जेमुळे वातावरणजमीन तापते. वातावरण तापल्यामुळे समुद्र तापतो व पाण्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणाचे चक्र सुरू राहते. सूर्यप्रकाश हा पृथ्वीवर प्रकाश मिळवण्यासाठीचा मुख्य स्रोत आहे.

विषुववृत्ताच्या उत्तरेकडे  आणि दक्षिणेकडे  २३.५° अंशांमधील म्हणजे  कर्कवृत्त आणि मकरवृत्त यातील प्रदेशाला उष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणतात. आपला भारत देश उष्णकटिबंधीय प्रदेशात येतो. इथे वर्षभर सूर्य तळपतो त्यामुळे सौर ऊर्जा बऱ्याच मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.

सौर ऊर्जेचा उपयोग माणसे रोजच्या व्यवहारांमध्ये नेमाने करत नसल्याने तिला अपारंपरिक ऊर्जा म्हणतात. असे असले तरी, सौर ऊर्जा हे अक्षय ऊर्जाचा एक मोलाचा स्रोत आहे. सौर ऊर्जा मिळवण्यासाठी फोटोव्होल्टेइक सिस्टिम, केंद्रीकृत सौर ऊर्जा आणि सौर वॉटर हीटरचा वापर होतो.

सौर ऊर्जेचा प्रकल्प भांडवली गुंतवणुकीचा विचार करता महाग पडतो. पण जास्त काळ टिकतो आणि तिचा दुरुस्ती खर्च कमी असतो.

[Ministry] सोलर मिशन अंतर्गत २०२२ पर्यंत २०,००० मेगावॅट वीज उत्पन्न व्हावी असा उद्देश आहे. सौर ऊर्जा उपयोगात आणण्यासाठी योजना आखताना सर्वप्रथम तिची उपलधता कुठे  आणि किती आहे हे विचारात घ्यावे लागते . भारतातील वेधशाळांत अनेक दशकांपासून सूर्यप्रकाशाचा अवधी, सौर विकरण आणि दिशा यांच्या नोंदी केल्या गेल्या आहेत .त्यांचे विश्लेषण करून सौर प्रकल्पासाठी जागा ठरवली जाते.

महाराष्ट्रात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी भरपूर वाव आहे . सोलापूर, उस्मानाबाद आणि सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सौर ऊजचा वापर करणारे  वीज निर्मिती प्रकल्प उभारले  गेले आहेत. नागपूर, चंद्रपूर, लातूर, अहमदनगर, जळगाव, धुळे ,

पुणे या जिल्ह्यातही काही ठिकाणी असे प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची एकूण वीज निर्मिती क्षमता ४०० मेगावॅट असली तर ती २०२० पर्यंत ती ७,५०० मेगावॅट इतकी वाढवायची योजना आहे .


आंतरराष्ट्रीय मानक संघटनेने सौर ऊर्जा उपकरणासंबंधित अनेक मानके ठरवली आहेत. उदाहरणार्थ, आयएसओ क्र. 9 050 हे इमारतींमध्ये काचेच्या भिंतींसंबंधित आहे तर आयएसओ क्र.10217 सोलर वॉटर हीटर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या सामग्रीशी संबंधित आहे.

चित्र दालन

[संपादन]

नगर विकास नियोजन

[संपादन]
ड‍र्मस्टेट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी

[]

गढूळ पाणी स्थिर करण्यासाठी तळ्यांमध्ये रसायने किंवा विजेऐवजी सौर उर्जेचा वापर केला जाऊ शकतो. अशा तलावांमधील शेवाळी वाढतात आणि प्रकाश संश्लेषण करून कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात. जरी शेंगा विषारी रसायने तयार करू शकतात जे पाणी वापरण्यायोग्य बनवतात.(????)

एम आय टीचे सोलर हाऊस<ref>

असंबद्ध मजकूर

[संपादन]

१९३९ साली उभारलेले एम आय टीचे सोलर हाऊस थर्मल संग्राहक म्हणून वर्षभर वापरात. एम.आय.टी.च्या सोलर हाऊस # 1, यू.एस. मधील 1 9 3 9 मध्ये बांधण्यात आलेल्या, वर्षभरात गरम होण्याकरिता मौसमी थर्मल एनर्जी स्टोरेजचा वापर करतात. थर्मल मास ही अशी कोणतीही सामग्री आहे ज्याचा उपयोग सौर उर्जेच्या बाबतीत सूर्यपासून उष्मा-उष्मा साठविण्यासाठी केला जाऊ शकतो. सामान्य थर्मल मास सामग्रीमध्ये दगड, सिमेंट आणि पाणी समाविष्ट असते. ऐतिहासिकदृष्ट्या ते शुष्क हवामानात किंवा उष्ण समशीतोष्ण भागात वापरले जातात जेणेकरून दिवसात सौर उर्जेचा अवशोषण करून आणि रात्री उष्ण वातावरणात साठवून ठेवलेल्या उष्णता वितरीत करून इमारती थंड ठेवतात. सोडिस SODIS तंत्रज्ञान इंडोनेशिया येथे पाणी शुद्धीकरणासाठी वापरात.<ref> सौर पाणी निर्जंतुकीकरण (एसओडीआयएस) मध्ये जल-भरलेल्या प्लास्टिक पॉलिथिलीन टीरेफथलेट (पीईटी) बाटल्यांना सूर्यप्रकाशात अनेक तासांनी उघड करणे समाविष्ट आहे. बारामती तालुक्यामध्ये शिर्सुफळ याठिकाणी १४ मे. वॅ. क्षमता असलेला सौर ऊर्जा प्रकल्प मार्च २०१५ मध्ये कार्यान्वित झालेला आहे. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचा सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहणे म्हणजे तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिने ते महत्त्वाचे पाऊल ठरलेले आहे. आज बारामती तालुक्यामध्ये अनेक संस्थांच्या माध्यमातून, एन्. जी. ओ.च्या माध्यमातून तसेच ॲग्रिकल्चरल डेव्ह्लपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहेत. आज गावखेड्यांमध्ये सौर ऊर्जेचा वापर केला जात आहे.


संदर्भ सुची

[संपादन]
  1. ^ "ड‍र्मस्टेट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी चे संकेतस्थळ".

बाह्य दुवे

[संपादन]