सौर ऊर्जा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


सूर्यापासून उष्णताप्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानात बदल घडतात. सूर्यापासून पृथ्वीला १७४ पेटावॅट ऊर्जा मिळते. यातली सुमारे ३०% परावर्तित होते तर उरलेली वातावरणात शोषली जाते. या ऊर्जेमुळे वातावरणजमीन तापते. वातावरण तापल्यामुळे समुद्र तापतो व पाण्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणाचे चक्र सुरू राहते. सूर्यप्रकाश हे पृथ्वीवर प्रकाश मिळवण्यासाठीचा मुख्य स्रोत आहे

सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचे उपयोग[संपादन]

सौर तंत्रज्ञानाचे अनेक उपयोग आहेत.

Average insolation सौर पत्रे लावलेली जमीन(small black dots) required to replace the total world energy supply with solar electricity. Insolation for most people is from 150 to 300 W/m^2 or 3.5 to 7.0 kWh/m^2/day.
सौरचूल किंवा सौरकूकर
सौरचूल सूर्यप्रकाश परावर्तित करून एका ठिकाणी आणते व तयार झालेल्या वाफेने अन्न शिजवले जाते. सौरचुली भारतात वापरल्या जातात.

सौर बंब
पाणी गरम करण्यासाठीच्या या उपकरणात टाकी तसेच सूर्याची उष्णता गोळा करणारा पॅनल यांचा समावेश असतो. हे उपकरण सामान्यतः छपरावरती किंवा मोकळ्या मैदानात पॅनलचे तोंड दिवस भरातील सूर्याची जास्तीतजास्त उष्णता मिळेल अशा बेताने बसविले जाते. पॅनलमध्ये काळ्या रंगाचा उच्च क्षमतेचा उष्णता शोषक थर असलेल्या पाणी खेळवणाऱ्या तांब्याच्या नळ्या असतात. पॅनलमधील या नळ्यांना टाकीतून सातत्यानं पाण्याचा पुरवठा केलेला असतो. सूर्यापासून येणारी किरणे पाणी खेळवणाऱ्या पॅनल वर पाडून थंड पाणी ८० अंश से.पर्यंत उष्ण करता येते. तापलेल पाणी नंतर उष्णताविरोधी केलेल्या टाकीत साठवलं जाते. टाकी उष्णताविरोधी असल्यामुळे टाकीत साठवलेलं पाणी रात्रभर गरम राहते. या उपकरणाला अतिशय कमी देखभाल लागते. सुरुवातीला एकदाच गुंतवणुकीची गरज असते. हे घरगुती स्वरूपातही बनवता येते. काळ्या रंगाचा पाईप सदैव उन्हात राहील असे पाहावे आणि त्यातून पाण्याचा प्रवाह अतिशय हळू स्वरूपात सोडला तरी पाण्याचे तापमान वाढते. हीच नळी जर एका काचेच्या पेटीत बंदिस्त केली तर वातावणातील हवेमुळे नळीचे थंड होण्याचे प्रमाण कमी होउन परिणामी उष्णता अजून वाढते.
solar cooker bareepada
सौर कंदील
एल.ई.डी. वापरून निर्मिती केलेला सौर कंदील
सौर-कंदिलात फोटोव्होल्टाइक(पीव्ही) पॅनेलद्वारे विद्युतऊर्जा कंदिलातील विद्युतघटात(बॅटरी) साठवली जाते. सौर कंदीलातील दिव्यापासून सुमारे चार ते पाच तास प्रकाश मिळतो. भारतात विद्युतपुरवठा नसलेल्या अथवा कमी असलेल्या ग्रामीण भागात तर भारनियमन होत असलेल्या शहरांमध्येही प्रकाश मिळविण्यासाठी सौर कंदील वापरले जाते. काही सौर कंदीलात कमी उर्जेत अधिक काळ प्रकाश मिळविण्यासाठी वीद्युत दिव्यां ऐवजी एल ई डी वापरून कंदीलांची निर्मिती केली जाते.

सौर वाळवण यंत्र : ग्रामीण भागात सौर वाळवण यंत्रांनी क्रांती केली आहे .

सौर पथ दीप
रस्त्यांवरच्या दिव्यांसाठी सौर ऊर्जेचा वापर करता येतो. सोलर पॅनल वापरून बॅटरी चार्ज करतात व त्यातून वीजपुरवठा केला जातो.

शेती

विहिरीतून पाणी उपसण्यासाठी सौर उर्जेचा वापर करणे शक्य आहे. उजेडासाठीच्या सौर उर्जेचा वापरापेक्षा मात्र ते निश्चितच महाग आहे.

सौर वीज प्रकल्प[संपादन]

सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागतो. सौर ऊर्जेचा प्रकल्प भांडवली गुंतवणुकीचा विचार करता महाग पडतो.

चित्र दालन[संपादन]

नगर विकास नियोजन[संपादन]

ड‍र्मस्टेट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी

[१]

संदर्भ[संपादन]

  1. ड‍र्मस्टेट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी चे संकेतस्थळ.

बाह्य दुवे[संपादन]

  • ग्रामीण ऊर्जा. सीड्याक. (मराठी,मळ्याळम,कन्न्ड,तेलगू,तमिळ,बंगाली,इंग्रजी मजकूर)