Jump to content

तुम्मलपल्ले युरेनियम खाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुमलापल्ली युरेनियम खाण ही आंध्र प्रदेशातील वाय्‌एस्‌आर जिल्हात असलेली युरेनियमची खाण आहे. सन २०११ च्या सुधारित सुरुवातीच्या सर्वेक्षणात येथे दीड लाख टन युरेनियम-२३८चा साठा असल्याचे अंदाज आहे. हा अंदाज खरा ठरल्यास ही खाण जगातील सर्वात मोठी युरेनियम खाण ठरेल.[१]

मात्र या युरेनियमचा दर्जा ऑस्ट्रेलियातील युरेनियम-२३५ च्या दर्जाचा नाही. तरी हा साठा आठ हजार मेगॅवॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प एकूण ४० वर्षे चालवू शकेल.


संदर्भ[संपादन]