"जागतिक तापमानवाढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 59.95.49.223 (चर्चा) यांनी केलेले बदल Czeror यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेल
ओळ १३५: ओळ १३५:
* [[द डे आफ्टर टुमॉरो]] हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला. जागतिक तापमानवाढीनंतर येउ शकणार्‍या हिमयुगाची रोमांचक कथा सादर केली आहे.
* [[द डे आफ्टर टुमॉरो]] हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला. जागतिक तापमानवाढीनंतर येउ शकणार्‍या हिमयुगाची रोमांचक कथा सादर केली आहे.

== बाह्य दुवे ==
;वैज्ञानिक
* [http://www.ipcc.ch Intergovernmental Panel on Climate Change] and [http://www.planetark.com/dailynewsstory.cfm/newsid/44456/story.htm यु एन च्या वातावरण आयोगाच्या अहवालाचा प्रमुख गोषवारा]
* [http://www.nature.com/climate/index.html वातावरण बदलावरील नेचर अहवाल ]
* [http://www.marathimati.com/Hiraval/Hiraval.asp हिरवळ]-निसर्गाचे ‌ऋण फेडण्यासाठी हाती घेतलेली मोहीम
* [http://www.metoffice.gov.uk/research/hadleycentre/index.html इंग्लंडचा अहवाल]
* [http://www.ncdc.noaa.gov/oa/climate/globalwarming.html#INTRO एन ओ एए चा जागतिक तापमानवाढ वाविप्र]
* [http://www.aip.org/history/climate Discovery of Global Warming] – An extensive introduction to the topic and the history of its discovery, written by [[Spencer R. Weart]]
* [http://news.bbc.co.uk/1/hi/world/6460635.stm कॉशन अँड अर्जेस ऑन क्लायमेट रिस्क ]
* [http://www.virtualcentre.org/en/library/key_pub/longshad/A0701E00.htm पशुधनावर होणारा परिणाम यु एन चा अहवाल]

; शैक्षणिक
* [http://climate.jpl.nasa.gov/ Global Climate Change: NASA's Eyes on the Earth] - Climate change overviews, key indicators, multimedia and current news.
* [http://green.nationalgeographic.com/environment/global-warming/gw-overview.html What Is Global Warming?] – Shockwave presentation from [[National Geographic]]
* [http://edgcm.columbia.edu/ The EdGCM (Educational Global Climate Modelling) Project] – A free research-quality simulation for students, educators, and scientists alike, with a user-friendly interface that runs on desktop computers
* [http://discover.itsc.uah.edu/ DISCOVER] Satellite-based ocean and climate data since 1979 from [[NASA]]
* [http://www.pewclimate.org/ The Pew Center on global climate change]
* [http://www.globalwarmingart.com/ Global Warming Art]
* [http://osulibrary.oregonstate.edu/specialcollections/events/2007paulingconference/video-s3-4-washington.html Video] of a talk by [[Warren Washington]] titled "The Evolution of Global Warming Science: From Ideas to Scientific Facts"
* [http://demonstrations.wolfram.com/BestEffortGlobalWarmingTrajectories/ Best Effort Global Warming Trajectories] by Harvey Lam (Princeton University), [[The Wolfram Demonstrations Project]].

; इतर
* [http://www.istl.org/01-fall/internet.html Science and Technology Sources on the Internet] – Extensive commented list of Internet resources
* [http://www.ucsusa.org/global_warming/ Union of Concerned Scientists Global Warming page]
* [http://www.abc.net.au/catalyst/stories/s1647466.htm Watch and read 'Tipping Point'], Australian science documentary about effects of global warming on rare, common, and endangered wildlife
* [http://ourworld.unu.edu/en/series/climate/ United Nations University's 'Our World 2' Climate Change Video Briefs]
* [http://www.un.org/climatechange Gateway to the UN System's Work on Climate Change]
{{विस्तार}}
== संदर्भ व नोंदी ==
<references/>

[[वर्ग:वातावरण]]
[[वर्ग:पर्यावरण]]
[[वर्ग:प्रदूषण]]

{{Link FA|de}}
{{Link FA|en}}
{{Link FA|fi}}
{{Link FA|he}}
{{Link FA|hu}}
{{Link FA|id}}
{{Link FA|th}}

[[af:Aardverwarming]]
[[an:Escalfamiento global]]
[[ang:Ƿoruldlicu ƿearmung]]
[[ar:احترار عالمي]]
[[arz:دفا عالمى]]
[[bat-smg:Gluobalėnis atšėlėms]]
[[be:Глабальнае пацяпленне]]
[[be-x-old:Глябальнае пацяпленьне]]
[[bg:Глобално затопляне]]
[[bn:ভূমণ্ডলীয় উষ্ণতা বৃদ্ধি]]
[[br:Tommadur ar blanedenn]]
[[bs:Globalno zatopljenje]]
[[ca:Escalfament global]]
[[ceb:Kalibotanong pagpanginit]]
[[cs:Globální oteplování]]
[[cy:Cynhesu byd eang]]
[[da:Global opvarmning]]
[[de:Globale Erwärmung]]
[[el:Παγκόσμια θέρμανση]]
[[en:Global warming]]
[[eo:Tutmonda varmiĝo]]
[[es:Calentamiento global]]
[[et:Globaalne soojenemine]]
[[eu:Berotze globala]]
[[fa:گرم‌شدن زمین]]
[[fi:Ilmaston lämpeneminen]]
[[fiu-vro:Ilma lämmämbäsminek üle ilma]]
[[fr:Réchauffement climatique]]
[[fur:Riscjaldament globâl]]
[[ga:Téamh domhanda]]
[[gd:Blàthachadh na cruinne]]
[[gl:Quecemento global]]
[[he:התחממות עולמית]]
[[hi:भूमंडलीय ऊष्मीकरण]]
[[hr:Globalno zatopljenje]]
[[ht:Rechofman atmosferik]]
[[hu:Globális felmelegedés]]
[[hy:Գլոբալ տաքացում]]
[[ia:Calefaction global]]
[[id:Pemanasan global]]
[[is:Heimshlýnun]]
[[it:Riscaldamento globale]]
[[ja:地球温暖化]]
[[jv:Pamanasan global]]
[[ka:გლობალური დათბობა]]
[[kn:ಜಾಗತಿಕ ತಾಪಮಾನ ಏರಿಕೆ]]
[[ko:지구 온난화]]
[[la:Calefactio globalis]]
[[lt:Visuotinis atšilimas]]
[[lv:Globālā sasilšana]]
[[mk:Глобално затоплување]]
[[ml:ആഗോളതാപനം]]
[[mn:Дэлхийн дулаарал]]
[[ms:Pemanasan global]]
[[my:ကမ္ဘာကြီး ပူနွေးလာမှု]]
[[nl:Opwarming van de Aarde]]
[[nn:Global oppvarming]]
[[no:Global oppvarming]]
[[oc:Escalfament global]]
[[pl:Globalne ocieplenie]]
[[pnb:گلوبل وارمنگ]]
[[pt:Aquecimento global]]
[[rm:Stgaudament global]]
[[ro:Încălzirea globală]]
[[ru:Глобальное потепление]]
[[sah:Аан дойду сылыйыыта]]
[[sh:Globalno zatopljenje]]
[[si:ගෝලීය උණුසුම් වීම]]
[[simple:Global warming]]
[[sk:Globálne otepľovanie]]
[[sl:Globalno segrevanje]]
[[sq:Ngrohja globale]]
[[sr:Глобално загревање]]
[[su:Jagat nyongkab]]
[[sv:Global uppvärmning]]
[[sw:Kupanda kwa halijoto duniani]]
[[ta:புவி சூடாதல்]]
[[te:భూగోళం యొక్క వేడిమి]]
[[tg:Гармшавии глобалӣ]]
[[th:ปรากฏการณ์โลกร้อน]]
[[tl:Pag-init ng daigdig]]
[[tr:Küresel ısınma]]
[[uk:Глобальне потепління]]
[[vi:Ấm lên toàn cầu]]
[[war:Pagpaso han kalibutan]]
[[wuu:全球暖化]]
[[yi:גלאבאלע אנווארימונג]]
[[zh:全球变暖]]
[[zh-classical:全球暖化]]
[[zh-min-nan:Choân-kiû sio-lo̍h-hoà]]
[[zh-yue:全球變暖]]

१८:५४, ५ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

जागतिक तापमान नोंद

जागतिक तापमानवाढ (इंग्रजी: Global warming) पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणाच्या सरासरी तापमानवाढीची प्रक्रिया आहे. याचबरोबर सहसा हवामानातील बदल व भविष्यातील त्यामुळे होणारे बदल यांचाही उल्लेख यासंदर्भात करण्यात येतो.

इतिहास

पृथ्वीवर यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिका च्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्यावेळेसची तापमानवाढ हे पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्या ही वेळेस पृथ्वीच्या वातावरणात अमूलाग्र बदल झाले होते.

इतिहास

पृथ्वीवर यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिका च्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्यावेळेसची तापमानवाढ हे पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्या ही वेळेस पृथ्वीच्या वातावरणात अमूलाग्र बदल झाले होते.

सद्य स्थिती

सध्याचे तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून त्यामुळे जर पृथ्वीवर असमतोल निर्माण झाल्यास त्याला केवळ मानवजात जवाबदार असणार आहे. [ संदर्भ हवा ] ही तापमानवाढ मुख्यत्वे हरितवायू परिणामामुळे होत आहे. या लेखात हरितवायू परिणाम म्हणजे काय व नेमकी कश्याने तापमान वाढते हे नमूद केलेच आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अमूलाग्र प्रयत्नांनीच शक्य आहे. क्योटो प्रोटोकॉल हा त्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या प्रोटोकॉलमध्ये अनेक देशांनी मान्य केले आहे की ते इ.स. २०१५ पर्यंत आपापल्या देशातील हरितवायूंचे उत्सर्जन इ.स. १९९० सालच्या पातळीपेक्षा कमी आणतील. कराराप्रमाणे अनेक देशांनी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु जर्मनी सोडता बहुतेक देशांना या कराराचे पालन करणे अवघड जात आहे[१]. हरित वायूंचे उत्सर्जन एवढ्या पटकन कमी केले तर आर्थिक प्रगतीला खीळ बसेल ही भीती याला कारणीभूत आहे. जागतिक तापमानवाढीस मुख्यत्वे अमेरिका, युरोप, चीन, जपान हे जवाबदार देश आहेत. याचे मुख्य कारण त्यांचे मोठ्या प्रमाणावरील उर्जेचा वापर व मोठ्या प्रमाणावरील हरितवायूंचे उत्सर्जन. यातील अमेरिका हा सर्वाधिक हरितवायूंचे उत्सर्जन करणारा देश आहे व या देशाने अजूनही या क्योटो प्रोटोकॉल करारावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे प्रयत्न करणार्‍या देशांच्या प्रयत्नांना कितपत यश येईल या बाबतीत शंका आहेत.

कारणे

हरितगृह परिणाम

हरितगृह हे खास प्रकारच्या वनस्पती वाढवण्यासाठी बनवलेले काचेचे घर असते[२]. हे घर वनस्पतींना बाह्य हवामानाचा परिणाम होउ नये म्हणून बंदिस्त असते व उबदार असते. हे घर काचेचे असून घरात उन येण्यास व्यवस्था असते परंतु घर बंदिस्त असल्याने उन्हाने तापल्यानंतर आतील तापमान कमी होण्यास मज्जाव असतो. आतील तापमान उबदार राहण्याच्या संकल्पनेमुळे ही संज्ञा जागतिक तापमान वाढीत वापरतात[३]. काही वायूंच्या रेणूंची रचना अश्या प्रकारची असते की ते उर्जालहरी परावर्तीत करु शकतात. कार्बन डायॉक्साईड, मिथेन, डायनायट्रोजन ऑक्साईड व पाण्याची वाफ हे प्रमुख वायू असे आहेत जे उर्जालहरी परावर्तीत करु शकतात. या उर्जालहरींना इंग्रजीत इन्फ्रारेड लहरी असे म्हणतात. सूर्यापासून पृथ्वीला मिळणार्‍या ऊर्जेत या इन्फ्रारेड लहरींचा समावेश असतो. पृथ्वीवर येणा-या बहुतेक इन्फ्रारेड लहरी व इतर लहरी दिवसा भुपृष्ठावर शोषल्या जातात. त्यामुळे पृथ्वीवर दिवसा तापमान वाढते. सूर्य मावळल्यावर ही शोषण प्रक्रिया थांबते व उत्सर्जन प्रक्रिया सूरु होते व शोषलेल्या लहरी अंतराळात सोडल्या जातात. परंतु काही प्रमाणातील या लहरी वर नमूद केलेल्या वायूंमुळे पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात परावर्तित होतात व रात्रकाळात पृथ्वीला उर्जा मिळते. या परावर्तीत इन्फ्रारेड लहरींच्या ऊर्जेमुळे पृथ्वीभोवतालचे वातावरण उबदार राहण्यास मदत होते. जर हे वायू वातावरणात नसते तर पृथ्वीचे तापमान रात्रीच्या वेळात भारतासारख्या उबदार देशातही -१८ अंश सेल्सियस इतके असते. जर भारतासारख्या ठिकाणी ही परिस्थिती तर रशिया कॅनडा इत्यादींबाबत अजून कमी तापमान असते. परंतु या वायूंमुळे रात्रीचे तापमान काही प्रमाणापेक्षा कमी होत नाही व पृथ्वीचे सरासरी तापमान -१८ पेक्षा ३३ ° जास्त म्हणजे १५° सेल्सियस इतके रहाते. या परिणामामुळेच मुख्यत्वे पृथ्वीवरील जीवसृष्टी विकसित पावली.

चित्र:सौर उर्जेचा ताळमेळ.JPG
सौर उर्जेचा ताळमेळ

हे वायू मुख्यत्वे पृथ्वीवरील तापमान उबदार ठेवण्यास मदत करतात

क्रं वायू तापमानवाढ
पाण्याची वाफ २०.६°
कार्बन डायॉक्साईड ७.२°
ओझोन २.४°
डायनाट्रोजन ऑक्साईड १.४°
मिथेन ०.८°
इतर वायू ०.६°
एकूण सर्व एकत्रित
हरितवायू मिळून
३३°

तक्ता संदर्भ [४]
वरील तक्त्यात पाहिल्याप्रमाणे वाफ, कार्बन डायॉक्साईड हे प्रमुख वायू आहेत ज्यामुळे हरितगृह परिणाम पहावयास मिळतो. पृथ्वीवर पाणी प्रंचड आहे व त्यामुळे वातावरणातील वाफेचे प्रमाणदेखील खूप आहे व त्यामुळेच हरितगृह परिणामात वाफेचा मोठा वाटा आहे. परंतु वाफेचे अथवा बाष्पाचे प्रमाण हे वातावरणात निसर्ग निर्मित असते. सूर्य समुद्राच्या पाण्याची वाफ तयार करतो व त्या वाफेचा पाउस पडतो. ही प्रक्रिया निसर्गात अव्याहतपणे चालू असते त्यामुळे वातावरणातील वाफेचे प्रमाण हे बर्‍यापैकी एकसारखे असते. तसेच वाफेची हरितगृह वायू म्हणून ताकद इतर वायूंपेक्षा कमीच असते. त्यामुळे सध्याच्या जागतिक तापमानवाढीमध्ये वाफेचा फारसा वाटा नाही[४].

हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ

चित्र:कार्बन डायॉक्साईड व तापमान.gif
कार्बन डायॉक्साईड व तापमानवाढीचा संबंध

वरील तक्यात नमूद केल्याप्रमाणे ह‍रितगृह परिणामात दुसरा महत्वाचा वायू म्हणजे कर्ब वायू (कार्बन डायॉक्साईड) हा आहे. सध्याच्या युगात जग विकसित देश व विकसनशील देश या प्रकारात विभागले आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर विकसित देशात मोठ्या प्रमाणावर कोळसाखनिज तेलावर आधारित उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर सूरु झाला व ज्वलन प्रकियेमुळे कार्बन डायॉक्साईडचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन सुरु झाले. इ.स. १९७० च्या दशकानंतर विकसनशील देशांनीही विकसित देशांच्या पावलांवर पाउल टाकून उर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर सूरू केला. मोठ्या प्रमाणावरील कोळसापेट्रोलचा वापर व त्याचवेळेस कमी झालेली जंगले यामुळे वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण अजून जोमाने वाढण्यास मदत झाली. औद्योगिक क्रांती युरोपमध्ये इ.स. १७६० च्या सुमारास झाली[५] त्यावेळेस वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण २६० पीपीएम इतके होते. इ.स. १९९८ मध्ये हेच प्रमाण ३६५ इतके होते व आज इ.स. २००९ मध्ये ४०० पीपीएम च्या जवळ पोहोचले आहे[६]. हे प्रमाण वाढण्यास दुसरे तिसरे कोणीही नसून केवळ मानव जवाबदार आहे. करोडो वर्षाच्या प्रकाशसंश्च्लेषणा नंतर तयार झालेला कोळसाखनिज तेल गेल्या शंभर वर्षात अव्यहावतपणे जमीनीतून बाहेर काढून वापरले आहेत. मुख्यत्वे वाहनांच्या पेट्रोलडिझेल साठी किंवा कोळसा वीजनिर्मितीसाठी व इतर अनेक कारणांसाठी आपण मोठ्या प्रमाणावर खनिज पदार्थ वापरत आहोत व त्याचा धूर करुन कार्बन डायॉक्साईड वातावरणात पाठवत आहोत. वरच्या तक्त्यातील कार्बन डायॉक्साईडचा वाटा २६० पीपीएम च्या प्रमाणात आहे. हे प्रमाण वाढल्यास पृथ्वीचे सरासरी तापमान वाढणार हे स्पष्ट आहे व सध्या हेच होत आहे. शेजारील आकृतीत पाहिल्याप्रमाणे जशी कार्बन डायॉक्साईडची पातळी गेल्या शतकापासून वाढत गेली आहे त्याच प्रमाणात पृथ्वीचे सरासरी तापमान देखील वाढले आहे. म्हणूनच हरितवायूंनीच पृथ्वीचे सरासरी तापमान वाढवले या विधानाला ही आकृती जोरदार पुरावा आहे.

केवळ कार्बन डायॉक्साईड नव्हे तर मानवी प्रयत्नांमुळे मिथेनचेही वाताव‍रणातील प्रमाण वाढत आहे. १८६० मधील मिथेनचे प्रमाण हे ०.७ पीपीएम इतके होते व आज २ पीपीएम [४]इतके आहे. मिथेन हा कार्बन डायॉक्साईडपेक्षा २१ पटीने जहाल हरितवायू आहे. [७]त्यामुळे वातावरणातील प्रमाण कमी असले तरी त्याची परिणामकारकता बरीच आहे. या सर्व वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणाचे सरासरी तापमानही वाढले आहे आणि ही प्रक्रिया सुरूच आहे. याच प्रक्रियेस जागतिक तापमानवाढ असे म्हणतात.

इतर कारणे

सूर्याकिरणांची दाहकता- सूर्यकिरणांची दाहकता (solar radiation)वाढल्यास जागतिक तापमान वाढ होण्याची शक्यता असते. परंतु सध्याच्या परिस्थितीत सूर्य किरणांचे उत्सर्जन हे नेहेमीप्रमाणे आहे. किरणांची दाहकता कमी जास्त झाल्यास जागतिक तापमान तात्कालिन कमी जास्त होते, दीर्घकालीन दाहकता कमी अथवा जास्त झालेली नाही,त्यामुळे सध्याच्या तापमान वाढीस हरितगृह परिणामच जवाबदार आहे.

ज्वालामुखींचे उत्सर्जन- ज्वालामुखींच्या उत्सर्जनाने देखील जागतिक तापमान बदलू शकते. त्यांचा परिणाम तापमान कमी होण्यात देखील होऊ शकतो. कारण वातावरणातील धुलिकणांचे प्रमाण वाढते जे अल्ट्राव्हायोलेट लहरी शोषून घेण्यात कार्यक्षम असतात. ज्वालामुखींच्या उत्सर्जनाने तापमान एखाद दुसरे वर्षच कमी जास्त होउ शकते. त्यामुळे ज्वालामुखीचा तापमानावर परिणाम तात्कालिन असतो.


एल्-निनो परिणाम- पेरु व चिली देशांच्या किनारपट्टीवर हा परिणाम दिसतो. विषुववृतालगत पाण्याखालून वाहणारा प्रवाह कधी कधी पाण्यावर येतो. असे झाल्यास पृथ्वीवर हवामानात मोठे बदल होतात व त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढीवरही होतो. एल्-निनो परिणाम चालू मोसमी वार्‍यांना अवरोध निर्माण होउन भारतात दुष्काळ पडतो.[८]. या परिणामामुळे पृथ्वीवर १ ते ५ वर्षापर्यंत सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवले जाउ शकते. मागील एल्-निनो परिणाम १९९७ - ९८ साली नोंदवला गेला होता.[९]

तापमानवाढ

चित्र:तापमानवाढ १५० वर्षे.JPG
गेल्या १५० वर्षात झालेली तापमानवाढ

इतिहासातील तापमानवाढीच्या घटना

चित्र:तापमानवाढ १००० वर्षे.JPG
मागील १००० वर्षातील पृथ्वीचे तापमान

तापमानवाढीची भाकिते

तापमानवाढीची भाकिते ही अनेक अंदाजांवर आधारित आहे. आय.पी.सी.सी ने व विविध तज्ञांनी अनेक भाकिते प्रदर्शित केलेली आहेत. अनेक तज्ञांचे अंदाज जुळत आहेत तर काही बाबतीत बरीच तफावत आहे. खालिल अंदाजांवर विविध भाकिते शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत.


  1. सर्व देशांकडून अनिर्बंध उर्जावापर व हरितवायूंचे कोणत्याही उपाययोजना न करता उत्सर्जन
  2. विकसित देशांकडून उर्जावापरा वरील कडक नियंत्रण व विकसनशील देशांना काही प्रमाणात जास्त उर्जावापराची संधी
  3. सर्वच देशांकडून उर्जावापरावर कडक नियंत्रण.


चित्रे संदर्भ आय.पी.सी.सी. [१०]

परिणाम

सरासरी तापमान वाढ ही केवळ २ ते ३ अंशांची दिसत असली तरी पृथ्वीवर महाकाय बदल घडवून आणण्यास सक्षम आहेत. पुर्वीच्या तापमानवाढीतही पृथ्वीवर अश्याच प्रकारचे महाकाय बदल घडून आले होते. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे हवामानातील बदल. सध्या हे बदल दिसणे चालू झाले असून हे बदल जागतिक तापमानवाढीमुळे आहे का? अशी विचारणा सामान्य नागरिकाकडून होत आहे.

हिमनद्यांचे वितळणे

चित्र:वितळणारी हिमनदी.JPG
जागतिक तापमानवाढीने हिमनद्यांचे वितळणे चिंतेची बाब बनली आहे

इ.स. १९६० च्या दशकात जागतिक तापमानवाढीचा शोध लागला[११] परंतु नेमके परिणाम कोणते याचा थांग त्याकाळी लागणे अवघड होते. इ.स १९९० च्या दशकात ओझोनच्या प्रश्णाने जगाचे लक्ष वेधल्यावर तापमानवाढीचे परिणाम काय असतील काय झाले आहेत याचा मागोवा घेणे चालू झाले. जगातील विविध भागातील होणारे बदल तपासण्यात आले. सर्वात दृश्य परिणाम दिसला तो हिमनद्यांवर गेल्या शंभर वर्षात जगातील सर्वच भागातील हिमनद्यांचा आकार कमी होणे चालू झाले. कारण सोपे आहे, तापमान वाढीने पडणार्‍या बर्फापेक्षा वितळाणार्‍या बर्फाचे प्रमाण जास्ती झाले व हिमनद्या मागे हटू लागल्या. इ.स. १९६० पर्यंत अफ्रिकेतील माउंट किलीमांजारो या पर्वतावर मुबलक बर्फ होता व आज अतिशय नगण्य बर्फ आहे[१२]. [१३]हिमालय, आल्प्स, अँडिजरॉकि या महत्वाच्या बर्फाच्छदित पर्वतरांगामध्येही असेच आढळून आले आहे. या हिमनद्या पाणी पुरवठा म्हणून अतिशय महत्वाच्या आहेत. हया हिमनद्या नष्ट पावल्या तर या नद्यावर अवलंबून असणार्‍यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल.

हिमनद्यांच्या वितळण्याबरोबर आर्टिक व अंटार्टिका व ग्रीनलँडमधील या ध्रुवीय प्रदेशात प्रचंड मोठे हिमनगांचेही वितळणे चालू झाले आहे[१४]. खरेतर जागतिक तापमानवाढी आगोदरही वितळ्याची प्रक्रिया चालू होती. परंतु जागतिक तापमानवाढीनंतर बर्फ पडण्याचे प्रमाण कमी झाले व वितळण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. हे वितळलेले पाणी समुद्राच्या पाण्यात मिसळून जाते परिणामतः पाण्याची पातळी वाढते. आर्टिक व अंटार्टिका व ग्रीनलँडमध्ये असे प्रचंड् हिमनग आहे. येथील हिमनग दोन प्रकारात विभागता येतील. पाण्यावरील हिमनग, व जमीनीवरील हिमनग. आर्टिकमधील हिमनग मुख्यत्वे पाण्यावरील आहेत. तर ग्रीनलँड व अंटार्टिकामधील हिमनग हे मुख्यत्वे जमीनीवरील आहेत. या हिमनगांनी पृथ्वीवरील जवळपास ३ टक्के पाणी सामावले आहे. पाण्यावरील हिमनगांचा साधारणपणे बहुतांशी भाग पाण्याखाली असतो व फारच थोडा आपणास पाण्यावरती दिसतो. हे हिमनग जर वितळले तर पाण्याची पातळी वाढत नाही. पण जर जमीनीवरील हिमनग वितळले तर ते पाणी सरतेशेवटी महासागरात येते व पाण्याची पातळी वाढवते. एकट्या ग्रीनलँडमधील बर्फ वितळला तर पृथ्वीवरील पाण्याची पातळी २ ते ३ मीटरने वाढेल. व अंटार्टिकावरील संपूर्ण बर्फ वितळला तर पृथ्वीची महासागराची पातळी २० मीटरने वाढेल [४]व असे झाल्यास आज दिसत असलेला कोणताही समुद्रकिनारा अस्तित्वात रहाणार नाही. मुंबई, कलकत्ता चेन्नई, न्यूयोर्क लॉस अँजेलिस व इतर शेकडो समुद्राकाठची शहरे पाण्याखाली जातील. बांग्लादेश व नेदरलँड सारखे देश ज्यांची बहुतांश देशाची समुद्रासपाटीपासून ०-५ मीटर इतकी आहे ह्या देशांम्धील बहुतेक् भाग पाण्याखालीच असेल. परिणामी येथील जनतेला इतर भागात स्थलांतर करावे लागणार.

हवामानातील बदल

चित्र:मुंबई महापूर.jpg
२६ जुलै २००५ मुंबई

हवामानातील बदल हा जागतिक तापवाढीमुळे होणारा सर्वात चिंताजनक परिणाम आहे. गेल्या काही वर्षात या बदलांचे स्वरुप स्पष्ट पणे दिसत आहे व त्याचे परिणाम अनेक देशातील लोकांनी अनुभवले/ अनुभवत आहेत. पृथ्वीवरील हवामान हे अनेक घटकांवर अवलंबून असते. समुद्राच्या पाण्याचे तापमान हा एक महत्वाचा घटक आहे. या घटकामुळेच खंडाच्या एखाद्या भागात किती पाउस पडणार, कधी पडणार हे ठरते. तसेच त्या खंडाचे तापमान किती रहाणार हेदेखील ठरते. महासागरातील गरम व थंड पाण्याचे प्रवाह या तापमान घटकामुळे काम करतात. युरोपला अटलांटिकमधील गल्फ-स्ट्रीम या प्रवाहामुळे उबदार हवामान लाभले आहे. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याचेही सरासरी तापमान वाढले आहे. पाण्याचे तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते, यामुळे पावसाचे प्रमाण, चक्रि वादळांची संख्या व त्यांची तीव्रता वाढलेली आहे. २००५ मध्ये अमेरिकेत आलेल्या कतरिना या चक्रिवादळाने हाहाकार माजवला. याच वर्षी २६ जुलै रोजी मुंबईतमहाराष्ट्रात न: भूतो अश्या प्रकारचा पाउस पडला होता[१५]. युरोपअमेरिकेत देखील पावसाचे प्रमाण वाढलेले आहे परंतु बर्फ पडण्याचे प्रमाण लाक्षणीय रित्या कमी झालेले आहे व पूर्वीप्रमाणे थंडी अनुभवायास मिळत नाही हा तेथिल लोकांचा अनुभव आहे[४]. पावसाचे प्रमाण सगळीकडेच वाढलेले नाही. तर काही ठिकाणी लाक्षणीय रित्या कमी झालेले आहे जगातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी होउन त्या भागात दुष्काळांचे प्रमाण वाढेल. अफ्रिकेचा पश्चिम किनार्‍यावर असे परिणाम दिसत आहे तर इशान्य भारतात देखील पावसाचे प्रमाण कमी होण्याचे भाकित आहे तर थारच्या वाळवंटात पावसाचे प्रमाण वाढेल असे भाकित आहे. थोडक्यात हवामानात बदल आपेक्षित आहेत.

हवामानातील बदल युरोप व अमेरिकेसारख्या देशात स्पष्टपणे दिसून् येतील. इटली मध्ये मूमध्य समुद्रीय वातावरण आहे असेच वातावरण तापमानवाढीमुळे फ्रान्स व जर्मनीमध्ये पश्चिम युरोपीय हवामान प्रकारच्या देशात अनुभवणे शक्य आहे तर. टुंड्रा प्रकारच्या अतिथंड प्रदेशात पश्चिम युरोपीय प्रकारचे हवामान अनुभवणे शक्य आहे. वाळवटांचीही व्याप्ती वाढणे हवामानातील बदलांमुळे आपेक्षित आहे.


महासागराच्या पाण्याच्या तापमानात बदल झाल्याने महासागरातील महाप्रचंड प्रवाहांच्या दिशा बदलण्याची शक्यता आहे. जर प्रवाहांची दिशा बदलेल की नाही? बदल्यास कशी बदलेल? हे अत्ताच भाकित करणे अवघड आहे व हे प्रवाह बदल्यास पृथ्वीवर पूर्वीप्रमाणेच महाकाय बदल होतील. त्यातील एक बदल शास्त्रज्ञ नेहेमी विचारात घेतात तो म्हणजे गल्फ स्ट्रिम प्रवाहउत्तर अटलांटिक प्रवाह. या प्रवाहांमध्ये बदल झाल्यास युरोप व अमेरिकेचे तापमानात अचानक बदल घडून तेथे हिमयुग अवतरण्याची शक्यता आहे. या शक्यते वर हॉलिवूडमध्ये द डे आफ्टर टुमॉरो हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

उपाय.

सध्याच्या युगात कोणताही देश उर्जेचा वापर कमी करुन आपली प्रगती खोळंबून घेणार नाही. अभ्यासातील पहाणीनुसार विकसित देशांचा उ‍र्जेचा वापर हा विकसनशील देशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.[१६] परंतु वापराचे प्रमाण स्थिरावले आहे. या देशांपुढील मोठा प्रश्ण आहे तो म्हणजे उर्जेचा वापर कमी कसा करायचा जेणेकरुन हरितवायूंचे प्रमाण कमी होईल. भारत , चीन या देशात दरडोई वापर कमी असला तरी वापराचे प्रमाण हे दरवर्षी लाक्षणीय रित्या वाढते आहे. वापर गुणिले लोकसंख्या यांचा विचार करता काही वर्षातच हे देश जगातील इतर देशांना हरितवायूंच्या उत्सर्जनात मागे टाकतील. जगातील इतर विकसनशील देशांच्या बाबतीत हेच लागू होते. म्हणून सध्या उर्जेचा वापर कमी करुन व जागतिक तापमानवाढीवर मात करता येणे अवघड आहे. यावर मात करण्यासाठी तज्ञांचे असे मत आहे की अत्ता लगेच कार्बन डायॉक्साईड या मुख्य हरितवायूला वातावरणात सोडण्यापासून रोखणे. त्यामुळे शास्त्रज्ञ ज्वलनाच्या अश्या प्रक्रिया शोधत आहेत ज्यामुळे वातावरणात कार्बन डायॉक्साईड सोडला जाणार नाही व उर्जेचे उत्पादन खोळंबणार नाही. मध्यम स्वरुपातील उपायांमध्ये वाहनांसाठी व वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी नवीन प्रकरचे इंधन शोधून काढणे हे आहे. कायमस्वरुपी उपायांमध्ये तंत्रज्ञे विकसित करणे जेणेकरुन मानवाचे खनिज व निसर्गातील अमूल्य ठेव्यावर अवलंबून रहाणे कमी होईल असे उदेश्य आहे.


कार्बन डायॉक्साईडचे रोखणे व साठवण

(English : CO2 capture and storage) उर्जा निर्मिती साठी मग ती कारखान्यातील कामांसाठी असो, की घरगुती विजेसाठी असो की वाहने चालवणार्‍यासाठी असोत. यासाठी मुख्यत्वे कोळसा व पेट्रोल यांचे ज्वलन केले जाते. (अपवाद म्हणजे वीजनिर्मिती ही जलविद्युत अथवा पवनचक्यांमधील असली तर). या ज्वलनातून कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन होते. सध्या शास्त्रज्ञांकडून सुचवलेल्या उपायांवर ज्वलन प्रक्रिया व कार्बन डायॉक्साईड वातावरणात जाण्यापासून रोखणार्‍या प्रक्रियांचा विकास चालू आहे. या प्रक्रियांमध्ये मुख्यत्वे कोळश्याच्या ज्वलनानंतर त्यांतील कार्बन डायॉक्साईड वेगळा करायचा व वेगळा झालेला कार्बन डायॉक्साईड भूगर्भातील मोकळ्या खाणींमध्ये साठवून ठेवायचा. कार्बन डायॉक्साईड वेगळे करण्यासाठी विविध तंत्रे आहेत.[१७]

  1. कोळश्याला हवेच्या ऍवजी फक्त ऑक्सिजनने ज्वलन करणे. जेणेकरुन ज्वलनानंतर फक्त कार्बन डायॉक्साईड तयार होईल व तो लगेच साठवणीसाठी तयार होईल. याला ऑक्सिफ्युएल फायरिंग (oxyfuel firing) असे म्हणतात.[१८]
  2. केमिकल लूपींग ज्वलन
  3. अमिन च्या विविध द्र्व्यामध्ये कार्बनडायॉक्साईड विरघळते. ज्वलनानंतर धूराला अमिनच्या द्र्व्याम्ध्ये धुतल्यास त्यातील कार्बन डायॉक्साईड वेगळा होता नंतर अमिनला गरम करुन कार्बन डायॉक्साईड वेगळे करणे सोपे जाते. या प्रक्रियेला अमिन स्र्कबिंग (Amine scrubbing)असे म्हणतात.[१९]

वरील प्रक्रिया आज औद्योगिक स्तरावर प्रचलित आहेत. परंतु आर्थिक दृष्ट्या सोयीस्कर नाहीत. त्यामुळे अजून स्वस्त प्रक्रियांचा शोध लावणे चालू आहे.

कार्बन डायॉक्साईडची साठवण- पहा: सी.ओ.२ स्टोरेजहा प्रकार विज्ञानाला अतिशय नवीन् आहे. वरील प्रक्रियेतून वेगळ्या केलेल्या कार्बन डायॉक्साईड ला जमीनीखाली पुरणे अथवा खोल समुद्रात सोडणे हा पर्याय आहे. सध्या शास्त्रज्ञ याला कश्या प्रकारे जमीनीत पुरता येईल. पुरणे सुरक्षित असेल का? त्याला सीलबंद कसे करता येईल. इत्यादी प्रश्णांची उत्तरे शोधण्याचे काम चालू आहे. कार्बन डायॉक्साईडला, पेट्रोल अथवा नैसर्गिक वायूंच्या रिकाम्या खाणींमध्ये पुरणे सर्वात रास्त मार्ग आहे. या प्रकारे अश्या रिकाम्या खाणींचा पुन्हा वापर होईल.

कार्बन डायॉक्साईडला रोखून साठवण करायची असल्यास सध्या कार्यरत असणार्‍या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये योग्य ते बदल करावे लागतील. भविष्यात तयार होणार्‍या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये हा मुद्दा लक्षात घेउनच त्याचे नियोजन करावे लागेल.

नवीन प्रकारची इंधने

कार्बन् डायॉक्साईडला ज्वलनानंतर रोखणे व त्याची साठवण करणे हे वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये शक्य आहे कारण तेथे मोठ्या प्रमाणावर (एकूण ४० टक्के)प्रदूषकांची निर्मिती होते[४][२०]. ही निर्मिती केंद्रीय प्रकारची असल्याने त्यावर उपाय शोधणे सोपे आहे. परंतु वाहनांमध्येही ज्वलन होत असते व तेही कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन करतात. अभ्यासातील पहाणी नुसार ३३- ३७ टक्के कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन हे वाहनांमुळे होत आहे[२०]. परंतु वीजप्रकल्पांप्रमाणे त्याचे उत्सर्जन केंद्रीय नसल्याने प्रत्येक वाहनातील सी.ओ.२ रोखून त्याची साठवण करणे महाकठीण काम आहे. यावर उपाय म्हणजे नवीन प्रकारची इंधने शोधणे जेणेकरुन या इंधनातून कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन् होणारच नाही.

हायड्रोजन हे एक प्रभावी इंधन् आहे. हायड्रोजनच्या ज्वलनाने फक्त पाण्याची निर्मिती होते.[२१] पाण्याच्या विघटनातून, पेट्रोलियम पदार्थांतून तसेच जैविक पदार्थांमधून हायड्रोजनची निर्मिती करता येते. सध्या हायड्रोजनचे नियोजन कसे करायचे याचे उत्तर शास्त्रज्ञ शोधत आहेत.[२२]कारण हायड्रोजन हा हलका वायू असल्याने त्याला केवळ दाबाखाली (Pressurised)साठवता येते. अतिशय ज्वालाग्राही असल्याने याचे इंधन म्हणून वापरण्यावर बंधने आहेत.

जैविक इंधने- शेतीत निर्माण होणार्‍या उत्पादनांतून निर्माण होणार्‍या इंधनांना जैविक इंधने म्हणतात. हि इंधने मुख्यत्वे सूर्य प्रकाशापासून होणार्‍या प्रकाश संश्लेशणातून तयार होता. या इंधनातून कार्बन डायॉक्साईडची निर्मिती अटळ असले तरी आपणास खनिज तेलांपासून अथवा कोळश्यापासून कार्बन डायॉक्साईडची निर्मिती टाळता येते. अशी इंधने सी.ओ.२ न्यूट्रल मानण्यात येतात[२३]. भाताचे तूस, उसाचे चिपाड ही काही जैविक इंधनांची उदाहरणे आहेत.


अपारंपारिक उर्जास्त्रोत-
पहा अपारंपारिक उर्जास्त्रोत
सध्या अपारंपारित उर्जास्त्रोताच्या निर्मितीवर बहुतांशी देशांचा भर आहे. अपारंपारिक स्त्रोत म्हणजे ज्यात खनिज संप्पतीचा वापर केला जात नाही असे स्त्रोत. जलविद्युत, पवनचक्क्या, सौरउर्जेचा विविध प्रकारे वापर, बायोगॅस निर्मिती, शेतीमालाचे वायूकरण (Gasification), भरती ओहोटीपासून जलविद्युत,हे काही अपारंपारिक उर्जास्त्रोत आहेत.

अणूउर्जा अणूशक्तीपासून मिळवलेली उर्जा म्हणजे अणूउर्जा. अणूउर्जेत हरितवायूंचे उत्सर्जन होत नाही. परंतु किरणोत्सर्गांचा त्रास, अणुभट्यांची सुरक्षितता तसेच अणूउर्जेच्या नावाखाली अण्वस्त्रांचा होणारा विकास अणूउर्जेसाठी लागणारे इंधन व हे इंधन बनवताना होणारे हरितवायूंचे उत्सर्जन यामुळे हा विषय नेहेमीच वादात रहातो व सध्या अणूउर्जा हा जागतिक तापमानवाढीवर पर्याय नकोच असा सूर आहे. [२४]

सस्टेनेबल इकॉनॉमी व इकोसिस्टीम

आर्थिक, कायदेशीर व सामाजिक उपाय

उत्सर्जनावर कर- हरितवायूंच्या जादा उत्सर्जनावर कर लावणे हा उत्तम आहे. हा कर सरळपणे इंधनावर लावला जाउ शकतो. किंवा इंधनाच्या वापरानंतर एखाद्या उद्योगाने किती हरितवायूंचे उत्सर्जन केले याचे गणित मांडून केला जाउ शकतो. ज्यादा कराने इंधनाच्या वापरावर बंधने येतील असा अंदाज आहे व उद्योगधंदे नविन प्रकारच्या हरितवायूरहित इंधनामध्ये जास्त गुंतवणूक करतील असा अंदाज आहे. ज्यादा कराने अर्थव्यवस्था संथ होण्याची शक्यता आहे असे दुसर्‍या बाजून सूर आहे.

निर्बंध लादणे- हरितवायूंचे उत्सर्जनांची पर्वा न करणारे देश अथवा उद्योग धंदे यांच्यावर आर्थिक निर्बंध लादणे जेणेकरुन त्यांना हरितवायूंची पर्वा करणे भाग पडेल असे काहीसे करणे.

कार्बन क्रेडिट - विकसित देशांमध्ये क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत हरित वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी देशांतर्गत मोठे बदलाव करावे लागत आहेत. विकासाची भूक प्रचंड असताना असे बदल काही देशांसाठी दिवाळखोरीचे कारण बनू शकते. तसेच सामाजिक प्रश्णही उदभवण्याची शक्यता आहे. यासाठी क्योटो प्रोटोकॉलमध्ये क्लिन डेव्हलपमेंट मेकॅनिसम (सी.डी.एम्)अंतर्गत कार्बन क्रेडिटची सोय केली आहे.[२५][२६] या कलमानुसार विकसित देशांनी अविकसित देशात विकास केल्यास त्याचा फायदा त्यांना मिळतो. उदाहरणार्थ अफ्रिकेतील एखाद्या देशात फ्रान्सने पवनचक्यांची निर्मिती केली व त्या देशाच्या विकासात हातभार लावला तर पवनचक्यांनी जेवढे हरितवायूंचे उत्सर्जन वाचवले ते फ्रान्स या देशाच्या खात्यात जमा होते[२७]. अथवा एखादा आजारी उद्योग समूह जर कारखाने बंद करत असेल तर त्या कारखान्याकडून होणारे उत्सर्जनाचे प्रमाणपत्र इतर देश अथवा इतर कंपनी विकत घेउ शकते. पूर्व युरोपात असे बरेच उद्योगसमूह होते ते १९९० च्या सुमारास चांगली कामगीरी करत होते व सोविएत संघाच्या पतना नंतर हे उद्योग समूह ढेपाळले. परिणामतः रशियामधील व पूर्व युरोपातील अश्या बर्‍याच कंपन्यांनी आपले उत्सर्जनाचे प्रमाणपत्र श्रीमंत कंपन्यांना विकणे चालू केले आहे[२८]. याला कार्बन क्रेडिट असे म्हणतात. काही टिकाकारांच्या मते ही पद्धत जवाबदारीतून पळवाट आहे व गंभीर विषयाचे बाजारुकरण केले आहे[२९].

चित्रपटात

  • जागतिक तापमानवाढ हा केंद्रिय विषय ठेउन अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती अल् गोर यांनी ऍन इनकनव्हिनियंट ट्रूथ हा डॉक्युमेंटरी प्रकारचा चित्रपट काढला. या चित्रपटात जागतिक तापमानवाढ म्हणजे काय यापासून त्याचे परिणाम काय व अमेरिका व जगाने कोणकोणत्या प्रकारचे उपाय अमलात आणण्याची गरज आहे यावर सविस्तर सर्वांना समजेल अश्या भाषेत विवेचन केले आहे.[३०] या चित्रपटाला २००७ मधील सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा (डॉक्युमेंटरी)ऑस्कर पुरस्कार मिळाला होता[३१]. अल गोर यांचे जागतिक तापमानवाढी बद्द्ल जागृतीचे कार्य लक्षात घेउन २००८ मध्ये त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले[३२].
  • द डे आफ्टर टुमॉरो हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला. जागतिक तापमानवाढीनंतर येउ शकणार्‍या हिमयुगाची रोमांचक कथा सादर केली आहे.

बाह्य दुवे

वैज्ञानिक
शैक्षणिक
इतर

संदर्भ व नोंदी

  1. ^ [German response to Kyoto Protocol| जर्मनीचे क्योटो प्रोटोकॉल चे पालन विकी लेख]
  2. ^ [http://en.wikipedia.org/wiki/Greenhouse%7C विकिपीडिया ग्रीनहाउस लेख|
  3. ^ यु.एस. इ.पी.ए चे संकेतस्थळ
  4. ^ a b c d e f Air pollution control strategies - Author Rainer Friedrich - University Stuttgart
  5. ^ औद्योगीक क्रांतीचा इतिहास
  6. ^ वर्षानुसार कार्बन डायॉक्साईडचे वातावरणातील प्रमाण
  7. ^ मिथेन एक हरितवायू
  8. ^ एल्-निनो चे परिणाम
  9. ^ latest el-nino
  10. ^ IPCC
  11. ^ discovery of global warming
  12. ^ अर्थ ऑबरव्हेटरी माउंट किलिमांजारो
  13. ^ किलिमांजारो १९१२ ते २०००
  14. ^ वॉशिंग्टन पोस्ट बातमी
  15. ^ नेशन मास्टर २००५ मुंबई व महाराष्ट्र पूर
  16. ^ Combustion and firing systems- Chapter 2 world Energy scenario By Prof. G. Scheffknecht - University Stuttgart
  17. ^ कार्बन कॅप्चरसाठी विविध प्रक्रिया-स्लाईड शो
  18. ^ ऑक्सिफ्युएल फायरिंग बद्दल् शास्त्रीय निबंध
  19. ^ अमिन स्क्रबिंग व इतर कार्बन कॅप्चर प्रक्रिया
  20. ^ a b http://www.ecobridge.org/content/g_cse.htm
  21. ^ हायड्रोजन
  22. ^ An overview of hydrogen production technologies, By JD Halladay, J.HU, D.L.King, Y.Wang, Catalysis today 139 (2009)
  23. ^ जैविक इंधने सी.ओ.२ न्यूट्रल का?
  24. ^ http://www.citizen.org/documents/GroupNuclearStmt.pdf
  25. ^ सी.डि.एम् ग्लोसरी
  26. ^ लेख कार्बन क्रेडिट
  27. ^ http://www.ctrade.org/re.pdf
  28. ^ http://www.mnweekly.ru/national/20080131/55306791.html
  29. ^ कार्बन क्रेडिट टिका
  30. ^ गोर यांचे क्लायमेट क्रायसिस् चे संकेतस्थळ
  31. ^ २००७ ऑस्कर विजेते
  32. ^ नोबेल विजेते अल् गोर

साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA